Marathi Story -वाचन मित्र गोष्ट क्रं.4
विचार केला तर,सर्व समस्या सुटतात.
भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सोबत बसले होते.शिष्य त्यांना बघून चकित झाले. कारण बुद्ध आज पहिल्यांदा आपल्या हातात काहीतरी घेऊन आले होते. जवळ आल्यावर शिष्यांनी बघितलं की त्यांच्या हातात एक दूरी आहे.
बुद्ध आसनावर बसून दोरीला गाठी मारत होते. तेव्हाच बुद्धाने सर्वांना एक प्रश्न केला, मी या दोरीला तीन गाठी मारल्या आहेत.
मला हे जाणून घ्यायचं आहे की,काय हि ती दोरी आहे? एक शिष्य म्हणाला गुरुजी उत्तर देणे थोडे अवघड आहे. हे आपल्याला बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. एका दृष्टीने बघितले तर दोरी तर तीच आहे. यात काहीच बदल नाही, परंतु या तीन व गाठी सुद्धा मारलेल्या आहेत. त्यामुळे ही दोरी बदललेली आहे असे आपण म्हणू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे बाहेरुन ती बदललेली दिसते परंतु आतून मात्र तीच आहे.
बुद्ध म्हणाले,सत्य आहे. "आता मी या गाठी सोडतो." असं म्हणत म्हणत ते त्या दोरीची दोन्ही टोके एकमेकापासून दूर ओढू लागले व म्हणाले या प्रकारे गाठी सुटू शकतील का?
"नाही ,नाही, यामुळे आणखी घट्ट होतील,एका शिष्याने लगेच उत्तर दिले. "
बुद्ध म्हणाले ठीक आहे. मग सांग की या गाठी सोडवण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल?
शिष्य म्हणाला, "आपल्याला या गाठी लक्षपूर्वक बांधावे लागतील. हे जाणून घ्यावे लागेल की या कशा बांधल्या आहेत."
बुद्ध म्हणाले मला हेच ऐकायचं होतं. मूळ प्रश्न हा आहे की, तुम्ही ज्या समस्या मध्ये अडकला आहात,त्याचं कारण काय आहे ? कारण जाणून घेतल्याशिवाय समस्या सोडवणं अशक्य आहे.जास्त लोक कारण जाणून न घेता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. कोणी मला हे विचारत नाही की, मला राग का येतो?लोक विचारतात की, मी क्रोध कसा नष्ट करू? कोणीही विचारत नाही की, माझ्यात अहंकाराचा बीज कुठून आलं? लोक हेच विचारतात की, अहंकार कसा नष्ट करू?
बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे गाठी पडल्यावर ती बदलली तरी पण बाहेरून स्वतःचे स्वरूप बदलत नाही, तसेच माणसात सुद्धा विकार असल्यामुळे आतून चांगले बीज नष्ट होत नाहीत. या प्रकारे विचार केला तर,आपण सर्व समस्या सोडवू शकतो.फक्त सर्वांना विचार करणे आवश्यक असते.
तात्पर्य - शांत डोक्याने एखाद्या समस्येवर विचार केलं तर, समस्येचे मूळ कारण समजू शकेल आणि समस्येचे कारण एकदा समजले कि, त्या समस्येवर आपण नक्कीच मार्ग काढू शकतो.