मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम कसे ठरवाल?

मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम कसे ठरवाल?


सध्याचे जग हे धावते आहे.अशा वेळी प्रत्येक पालकांच्या मनात संभ्रम आढळून येतो की,आपण आपल्या मुलाला शाळा किंवा शिक्षण देताना कोणत्या मिडीयम।माध्यम मधून दिले तर,त्याच्या पुढील आऊष्यात फायदा होईल.पालकांच्या मनात खालील प्रश्न निर्माण झालेले असतात.


मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम कसे ठरवाल?


आपल्या मुलाला जर मराठी मिडीयम मध्ये शिकवले तर त्याला इंग्रजी येणार नाही?आपल्या मुलाला सध्या इंग्रजी मध्ये बोलण्याची आवश्यकता आहे,कारण जगात इंग्लिश सर्वात जास्त बोलली जाते?आपल्या मुलाला इंग्रजी आली नाही तर त्याला नोकरी मिळणार नाही?मराठी ही आपली भाषा आहे त्यामुळे ती शिकणे आवश्यक आहे?इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले तर मराठी येणार नाही?सेमी हे माध्यम चांगले आहे कारण त्यात दोन्हीही भाषा मध्ये शिकवले जाते?असे विविध प्रकारचे प्रश्न पालकांच्या मनात येतात. 



मुलांना शिक्षण इंग्लिश मिडीयम मधून द्यावे की मराठी माध्यमातून द्यावे हे एकाच गोष्टीवर अवलंबून नसून त्यात वेगवेगळ्या मुद्याचा विचार करणे सोयीचे ठरते.याठिकाणी कोणत्याही भाषेला,माध्यमाला,अथवा गुणवत्तेला दोष द्यायचा नाही तर आपल्या स्वत:ची परिस्थिति,आपल्या सभोवताली असणार्‍या सर्व गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.पालक कोणता व्यवसाय करतात की शेती करतात,की नोकरी करतात.या सर्व बाबी याठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे.भविष्यासाठी कोणत्या माध्यमातील शिक्षण योग्य रथील इंग्रजी की मराठी माध्यम? आपल्याला वाटतो तेव्हढं हे ठरवणे सोपे नाही. 


सर्वात प्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की इंग्रजी ही एक भाषा आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.काही पालक आपल्या मुलाला इंग्रजी चांगली बोलता यावी यासाठी इंग्लिश मिडीयम मध्ये मुलांचे प्रवेश करतात.जेव्हा आपण इंग्रजी माध्यम विषयी बोलतो तेव्हा आपण कोठे राहतो ग्रामीण भागात की शहरी भागात?तसेच ग्रामीण भागात राहत असाल तर तेथे सर्वच इंग्लिश टु इंग्लिश शिकवणारे शिक्षक आहेत का हे लक्षात घेणे आवश्यक आहे.



आपला व्यवसाय मंजूरी,शेती,किंवा आपली आर्थिक परिस्थिति कशी आहे हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.शहरी भागातील मुलांसाठी शाळेत इंग्रजी माध्यमातील शिक्षक उपलब्ध असतात.ते त्यांना सर्व इंग्रजीतून शिकवू शकतात.तसेच शाळेची गुणवत्ता काशी आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. 


मोठ्या शहर मधील मुलांचे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचे कारण वेगळे असू शकेल. कारण शहरात मोठे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून पालकांना नोकरी निमित्त एक्का शहरातून दुसर्‍या शहरात,एका देशातून दुसर्‍या देशात जावे लागत असेल तर त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा फायद्याच्या ठरतात.


इंग्रजी भाषा महत्वाची का इंग्रजी माध्यमातील शिक्षण.

आपण सर्वप्रथम एका गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजी भाषा ही इंटरनॅशनल स्तरावरील भाषा असून तिचा वाढता प्रभाव लक्षात घेता मुलांना ती येणे आवश्यकच आहे,ती कधीही शिकता येऊ शकते.वास्तविकता अशी असते की शालेय शिक्षणात इंग्रजी विषय असूनही मुले ती चांगली शिकू किंवा बोलू शकत नाही.म्हणजे ग्रामीण भागात इंग्रजी विषयाला शिकवणारे शिक्षक,मुलांच्या घरचे वातावरण व इंग्रजीचा वापर हे लक्षात घेणे आवश्यक आहे.



कोणतीही भाषा मुलांना शिकवण्यासाठी त्या भाषेचा सराव होणे आवश्यक आहे. दुसर्‍या बाजूने विचार केला तर इंग्रजी हे एक माध्यम आहे.यासाठी आपल्या घरातील वातावरण तसेच आर्थिक परिस्थिति,पुढे लागणार्‍या सुविधा,यांचा विचार करणे आवश्यक असते.


इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेणार्‍या मुलांना जगभरात कुठेही करिअरची संधि उपलब्ध होते.असे काही नसते.करिअर हा आपल्या कौशल्यावर आधारित असतो.आपली परिस्थिति नसताना आणि मुलांची मानसिकता नसताना आपण माध्यम निवडणे योग्य असते.भाषा कधीही शिकता येते. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी निवडणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते. 


प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी माध्यमाची निवड कशी आणि कोणती करावी?

प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी माध्यमाची निवड करताना प्रथम मातृभाषा मधील शिक्षण सोयीचे ठरते.कारण बालकाचे वाढ व विकास होताना मातृभाषेचा प्रभाव मुलांवर पडत असतो त्याच्या सभोवताली असणारे सामाजिक,सांस्कृतिक वातावरण हे सर्व मातृभाषा मराठी मधून असते.

पालकांची व्यावहारिक भाषा मराठी असल्याने तसेच समाजात संवाद साधण्यासाठी मराठीचा वापर होत असल्याने मराठी माध्यम प्राथमिक शिक्षणासाठी योग्य आहे असे माझे मत आहे.



प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पार केल्यावर तुम्ही से मी सारखे माध्यम निवडले तर मुलांना सोपे जाते,तसेच इंग्रजी बद्दल ज्ञान वाढत जाते,त्याची बुद्धीची क्षमता वाढत जाते.जसे जसे पुढे वर्ग वाढत जटिल तसे मुलांमध्ये इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता वाटत नाही.

मी माझेच उदाहरण याठिकाणी सांगू शकतो पूर्वी प्राथमिक शिक्षण हे मराठीतुनच दिले जात होते.त्यावेळी प्राथमिक शिक्षणात इंग्रजी विषय नव्हता,आता पहिलीपासून इंग्रजी विषय अभ्यासक्रमात सामविष्ट करण्यात आलेला आहे.


त्यावेळी इयत्ता पाचवी नंतर इंग्रजी Alphabet शिकवले जात होते.तरीही त्या काळातील लोक सध्या इंग्रजी भाषा बोलू,वाचू,शकतात.त्यामुळे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी निवडणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते.खेडेगावातील दळणवळण तसेच व्यवहारातील भाषा खूप महत्वाची असते. 


प्राथमिक शिक्षणातील सेमी हा एक चांगला पर्याय असून यात खेडेगावातील मुले सुद्धा शिकतात.परंतु यात काही मुलांचा गोंधळ निर्माण होऊ शकतो,कारण यात प्रामुख्याने इंग्रजी ही निट अभ्यासता येत नाही आणि मराठी ही नाही,यासाठी मुलांना जास्त त्रास होतो,माझ्या मते इयत्ता 5 वी नंतर सेमी हा पर्याय चांगला असेल. 


जर मुलाच्या घरी सर्व सुशिक्षित आणि नोकरी करणारे तसेच मोठ्या शहर मध्ये राहणारे कुटुंब असेल तर त्यांनी आपल्या मुलाची शिक्षणासाठी इंग्रजी भाषा निवडली तरी फायद्याचे असेल कारण मुलाच्या सभोवताली सर्व बोलली जाणारी भाषा इंग्रजीचा जास्त वापर असेल तर ,तसेच नोकरी साठी सतत या शहरातून दुसर्‍या शहर मध्ये जावे लागत असेल तर इंग्रजी माध्यम निवडणे योग्य असेल असे मला वाटते. 


याठिकाणी मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोणते माध्यम निवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि आवड निवड आहे.परंतु वरील सर्व बाबी पडताळून पाहणे व योग्य निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. 


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने