SwavlambanCard |
युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड म्हणजे काय?
अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, सरकार भारतातील प्रत्येक अपंग व्यक्तीला एक अद्वितीय अपंगत्व ID (UDID) देते. युनिक डिसॅबिलिटी आय डी अपंग व्यक्तीची अनन्यपणे ओळख म्हणून वापरता येते.
"अपंग व्यक्तींसाठी युनिक आयडी" हा प्रकल्प अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी आणि प्रत्येक अपंग व्यक्तीला एक अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र जारी करण्याच्या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आला आहे."
ही योजना केवळ पारदर्शकता, कार्यक्षमता आणि दिव्यांग व्यक्तींना सरकारी लाभ वितरणात सुलभतेला प्रोत्साहन देणार नाही तर एकसमानता देखील सुनिश्चित करेल.
गाव स्तर, ब्लॉक स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर अंमलबजावणीच्या पातळीवर लाभार्थ्यांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा मागोवा सुव्यवस्थित करण्यात देखील प्रकल्प मदत होणार आहे.
आता भारत सरकारने युनिक अपंगत्व ओळखपत्रासाठी नोंदणी सुरू केली आहे, मोठ्या संख्येने लोक त्यांचे अर्ज सादर करत आहेत. सरकारने एक ऑनलाइन पोर्टल तयार केले आहे.
अपंग व्यक्तींना इंटरनेट वापरून सहज नोंदणी करून देते. हे दिव्यांग ओळखपत्र आपण भारतात कोणत्याही राज्यात वापरू शकता.हे कार्ड ऑनलाईन असते ते तुम्ही कोठेही प्रिंट काढू शकता.तसेच हे कार्ड काढल्यानंतर अपंगत्व कार्ड काढण्यासाठी सोपे होते.हे कार्ड तुमचा सर्व डेटा जतन करून ठेवते.
- UDID कार्डच्या ऑनलाइन फॉर्ममध्ये खालील भाग असतात.
- वैयक्तिक माहिती
- अपंगत्व तपशील
- कामाचे स्वरूप
- ओळख तपशील
UDID कार्ड अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने लाँच केले आहे.अपंगांच्या संख्येची पडताळणी होत असल्याची वस्तुस्थिती या विभागाला समजू शकते आणि येथून त्यांचे फॉर्म भरू शकतात.
आता, येथे आम्ही तुम्हाला सांगू की अपंगत्व प्रमाणपत्रामध्ये कोणत्या प्रकारचे तपशील नमूद केले पाहिजेत. तपशील खालीलप्रमाणे आहेत.दिव्यांगांना त्यांचे प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्राशी संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळेल.
तुम्ही आता अपंगत्व प्रमाणपत्र आणि UDID कार्डसाठी ऑनलाइन फॉर्म डाउनलोड आणि भरू शकता, तसेच फॉर्म ऑनलाइन सबमिट करू शकता.
जर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा हे माहित नसेल, तर तुम्ही तो ऑफलाइन फॉर्ममध्ये देखील सबमिट करू शकता, फक्त यासाठी तुम्हाला एजन्सीकडे जावे लागेल.
एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वाची टक्केवारी मोजण्यासाठी हे विविध रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचारी वापरतात. ही प्रक्रिया अतिशय वेगवान होणार आहे. यात कोणताही डुप्लिकेट Pwd डेटा आणि माहिती भरू शकत नाही.
तुम्हाला विविध माहितीचे ऑनलाइन अपडेट, नूतनीकरण करायचे असल्यास तुम्ही ही अधिकृत वेबसाइट वापरून करू शकता. त्यासाठी पुढील साईट ला क्लिक करा . https://www.swavlambancard.gov.in
दिव्यांग।अपंगत्वाचे सर्टिफिकेट, Online UDID Card Disability Certificate कसे काढावे?
दिव्यांग।अपंग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात येतो.आता नवीन पद्धती सुरू करण्यात आलेली आहे.ती म्हणजे ती कोणती याबाबत सविस्तर माहिती घेऊया.
02ऑक्टोबर 2018 पासून भारत सरकारच्या https://www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे UDID Card ( यू डी आय डी कार्ड )दिले जाते.
RPWD Act 2016 नुसार 21 दिव्यांग प्रकार पैकी एखाद्या व्यक्तिला जर दिव्यांग किंवा अपंगत्व असेल तर ती व्यक्ति अर्ज करू शकते.
दिव्यांग प्रमाणपत्र,Online UDID Card Disability Certificate नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे
- 1.आधार कार्ड,मतदान कार्ड,पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स,किंवा अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एकाची प्रत.
- 2.रहिवाशी अथवा निवासाबाबत पुरावा ,लाइट बिल ,ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगर पालिका किंवा छावणी मंडळाने दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र रेशनकार्ड इत्यादि.
- 3.पासपोर्ट आकाराचे 2 फोटो ,हे फोटो अलीकडील काळातच काढलेले असावे.
- टिप.यापूर्वी तुम्ही जर दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले असेल तर ते प्रमाणपत्र अपलोड केले तरी चालेल.
Online UDID Card Disability Certificate SwavlambanCard।दिव्यांग।अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी Online Registration कसे करावे.
समाजकल्याण आणि आरोग्य विभाग माहितीची सत्यता पडताळून जिल्हा शल्य चिकस्तक यांची स्वाक्षरी करून पोस्टाद्वारे कार्ड पाठवण्यात येते. UDID CARD भारत सरकारच्या https://www.swavlambancard.gov.in या साईट वरुन ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दिले जाते.
दिव्यांग।अपंग प्रमाणपत्र UDID Card काढण्यासाठी साठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल.
Apply for Disability Certificate & UDID Card यावर क्लिक केल्यावर लगेचच नवीन पान दिसेल त्याठिकाणी असलेल्या Apply for disability certificate &UDID Card ला click करून यात आणखी 4 वेगवेगळे भाग दिसतील.
आधार कार्ड वरील नाव आपल्या आधार कार्ड वर प्रत्यक्ष बघून बारा इंग्लिश स्पेलिंग मध्ये जर काही चूक झाली तर समस्या येऊ शकतात. म्हणून ती बरोबर आहे की नाही याची खात्री करावी.
तुम्ही जो फोटो अपलोड करणार आहात त्या फोटोची साईज 15 KB ते 30 KB, gif, jpeg, p n g format मध्ये तयार करून ठेवलेली असावी.
आपली स्वतःची सही एका स्वच्छ कागदावर स्कॅन करून त्याची साईज 3kb ते 30kb,jpj,gif,jpeg,png मध्ये असावी.
पर्सनल डिटेल्स या सेक्शनमध्ये पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती कायमचा पत्ता व सध्याचा पत्ता भरावा. शैक्षणिक माहिती भरल्यावर Next बटणावर क्लिक करावे.
Disability Details मध्ये माहिती भरताना ज्यांच्याकडे ऑनलाईन काढलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी Do You Disability Certificate या ऑप्शन वर क्लिक YES करावी. कॉपी स्कॅन करून अपलोड करावी. अपंगत्व प्रमाणपत्र नसेल तर NO वर क्लिक करा.
अपंगत्व।दिव्यांग प्रकार मध्ये आपणास जो 21 दिव्यांग प्रकारातील प्रकार लागू असेल तो सिलेक्ट करावा.तसेच आधीचे जुने दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यावर सुद्धा आपला अपंगत्वाचा प्रकार दिलेला असतो. त्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करावा.
आपल्याला अपंगत्व कधीपासून आलेली आहे. याची माहिती नमूद करावी. Disability Area म्हणजे शरीराच्या कोणत्या भागामध्ये अपंगत्व आहे ती निवडावे.
यात आपले Employment Details भरावे.तसेच BPL/APL माहिती भरून आपले वार्षिक इन्कम भरावे.
त्यानंतर पुढील NEXT बटणावर क्लिक करून आधार कार्ड स्कॅन करून त्याची साईज 10 kb ते 100 kb करून upload करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
I Agreed म्हणजे( मी सहमत आहे.) बॉक्स वर check box ला click करा.
यानंतर confirm application वर क्लिक करा, काही माहिती भरायची राहिली असेल तर एडिट ॲप्लिकेशन वर क्लिक करून भरून घेऊ शकता अन्यथा कन्फर्म एप्लीकेशन वर क्लिक करा.
आपल्या स्क्रीनवर एक नोंदणी क्रमांक येईल त्याची प्रिंट काढून घ्या. ती प्रिंट मेडिकल तपासणीच्या वेळेस तुम्हाला दाखवावी लागेल.
त्यासाठी ती व्यवस्थित आपल्याजवळ ठेवा. जिल्हा रुग्णालय या ठिकाणी नोंदणी क्रमांकानुसार प्राधान्यक्रमाने तालुका तसेच जिल्हास्तरीय मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात.
त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून दिव्यांग|अपंग प्रमाणपत्र पडताळणी करून आपल्याला UDID CARD ( यू डी आय डी कार्ड ) प्राप्त होईल.तसेच आधीचे ऑनलाइन प्रकारातील दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांना पोस्टाद्वारे UDID CARD आपण भरलेल्या पत्त्यावर मिळेल.
टिप-सध्या सुरू असलेल्या प्रोसेस नुसार वरील माहिती लिहली असून त्यात बदल होऊ शकतात.त्यासाठी आपण आपल्या जिल्हा रुग्णालय याठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता.तसेच अधिक माहितीसाठी साठी संबंधित विभागात जाऊन प्रत्यक्ष माहिती मिळवावी.
UDID Card।दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी कोणाला अर्ज करता येईल.
स्वावलंबन कार्ड (Unique Disability ID Card) काढण्यासाठी https://www.swavlambancard.gov.in/ या साईट वरुन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.
वेबसाईट ओपेन झाल्यावर वरील उजव्या बाजूला पुढील काही Option दिसतील.
आता याठिकाणी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे त्याचे डिटेल माहिती भरून घ्यावी. यामध्ये माहिती भरत असताना ही काळजीपूर्वक भरावी लागते म्हणून काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
वाचा:
पदभरती..