10 वी च्या अभ्यासाचे नियोजन कसे कराल?
10th Exam Study : शाळेतील विद्यार्थी मित्रांना नेहमी परीक्षा जवळ आल्यानंतर एक प्रश्न पडत असतो. तो म्हणजे आता परीक्षा जवळ आल्या आहेत,आता मी अभ्यास कसा करू? हा प्रश्न आपल्यालाही आपण ज्यावेळी शाळेत होतो, त्यावेळी प्रत्येकाला पडलेला असतो.
Join : Whats App Channel
10 वी च्या अभ्यासाचे नियोजन कसे कराल?
परीक्षा मध्ये नेहमी पाठववर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि त्याचे उत्तर आपल्याला आपल्या मनाने लिहायचे असतात. आपण पाठ्यपुस्तकाखालील स्वाध्याय असतो त्याचे प्रश्न उत्तरे पाठांमध्ये वाचून सोडत असतो, परंतु फरक एवढाच असतो की, परीक्षा मध्ये आपल्याला मनाने उत्तरे लिहायची असतात.
पुस्तकाचे सखोल वाचन करणे:
आपण ज्या विषयाची वर्षभर वाचन,लेखन करतो, अभ्यास, सराव, पाठांतर करत असतो, त्याचा उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना करायचा असतो. एमपीएससी, यूपीएससी इतर स्पर्धा परीक्षा जरी असल्या तरी त्याचा ही एक विशिष्ट असा अभ्यासक्रम ठरलेला असतो, की त्या त्या विषयावर ते ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात.
या सर्वांसाठी अभ्यासाचे नियोजन करणे खूप आवश्यक असते. परंतु नियोजनाअभावी आपल्याला परीक्षा आणि उत्तर सोडवताना अनेक अडचणी येत असतात. कारण आपण जो अभ्यास करत असतो.त्याचे योग्य नियोजन करत नाहीत. त्यामुळे आपल्याला परीक्षा ही अवघड जात असते.
आपला अभ्यासाचे नियोजन हे व्यवस्थित असेल तर आपल्याला परीक्षांमधील प्रश्न सोडवायला काही अडचण येत नाही.म्हणून आपण पुढील प्रमाणे काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते.आपल्या अभ्यासक्रमाचे जे पाठ्यपुस्तक असते त्याचे ओळ ना ओळ वाचून त्याचे आकलन होणे आवश्यक असते.
ज्याचा आपल्याला वाचताना अवघड वाटणारा किंवा न समजणाऱ्या पॉइंट ची विचारणा शिक्षक किंवा आपल्यापेक्षा अनुभवी, अभासू व्यक्तीला विचारणे आवश्यक असते.त्यामुळे आशय नीट समजायला मदत होईल.वाचानुळे आपल्या ज्ञानात सतत भर पडत असते.म्हणून वाचनाला खूप महत्व आहे.
पाठांतर कसे करावे?
पाठांतर करत असताना पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे, की पूर्ण धड्याचे पाठांतर न करता पाठांमध्ये आलेल्या व्याख्या, सूत्र, कविता, व्याकरणविषयक भागांमध्ये व्याकरणातील काही व्याख्या, गणितातील सूत्रे,इतिहासातील सनावळ्या, हा पाठांतराचा भाग म्हणून निवड निवडणे आवश्यक असते.विज्ञानामधील काही सूत्रे, व्याख्या यांचा समावेश पाठांतर असणे आवश्यक असते.
जेणेकरून पाठांतर केकेले असल्याने परीक्षेमध्ये आपल्याला लवकर उत्तर लिहिता येते. तसेच पाठांतर केल्याने आपल्या उत्तर मधील अचूकता वाढण्यास मदत होते. कारण पाठांतर केल्यामुळे त्यामधील आशयाचे किंवा शब्दाची वाक्य यामध्ये बदल होत नाही. त्यामुळे उत्तराची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते.परीक्षेचा वेळ जास्त विचार करण्यात खर्च होत नाही.पाठांतर करण्यासाठी मनाची एकाग्रता असावी लागते.
सराव करणे:
एखाद्या गोष्टीत यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सराव खूप महत्वाचा असतो. "Practice man make a Perfect." ही गोष्ट महत्त्वाची आहे.सराव करून करून आपण आपल्यामधील चुका सहजपणे दुरुस्त करू शकतो.त्यासाठी आपण ज्या ठिकाणी चुकत असतो,त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेस जागृत राहून चूक लक्षात चकित सुधारणा करून पुढे जाणे सर्वात महत्त्वाचे असते.सरावासाठी आपण गणित,विज्ञान, भूमिती, इ विषयाला सराव खूप महत्वाचा आहे.
स्वाध्याय सोडवणे:
परीक्षासाठी पाठाखालील स्वाध्याय सोडवणे आणि त्याचा वेळोवेळी सराव करणे खूप महत्त्वाचे आहे.कारण स्वाध्याय मध्ये ज्या धर्तीवर प्रश्न उत्तरे असतात त्याच धर्तीवर प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षासाठी प्रश्न विचारले जातात. तसेच कधीकधी स्वतः यातील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षा मध्ये विचारले जातात.एक वाक्यात उत्तरे, जोड्या लावा असे प्रश्न किंवा कारणे द्या अशा प्रकारचे प्रश्न किंवा त्यांचा सराव करणे आवश्यक असते.परीक्षेसाठी स्वाध्याय चा अभ्यास करणे आवश्यक असते.पाठ शिकवून झाल्यावर त्याचा अभ्यास करणे महत्वाचे असते.त्याचा उपयोग परीक्षेतील प्रश्नाचे उत्तर लिहण्यासाठी उपयोगी पडतात.
लघोत्तरी प्रश्न:
या प्रश्न प्रकारातील प्रश्नाचे उत्तर हे सात ते आठ वाक्यात लिहिणे अपेक्षित असते. यालाच लघुत्तरी प्रश्न असे म्हणतात. सात ते आठ वाक्यात उत्तरे लिहिताना प्रश्न कोणत्या विषयाला अनुसरून आहे म्हणजेच प्रश्नाला अनुसरून उत्तर देणे अपेक्षित असते मोजके आणि ठळक शब्दांमध्ये प्रश्नाचे उत्तर लिहिलेस गुणदान चांगल्या प्रकारे होते म्हणून हे प्रश्न लिहिताना प्रश्नाला अनुसरून ठळक आणि स्वच्छ अक्षरांमध्ये उत्तरे लिहिणे अपेक्षित असते.त्यासाठी परीक्षेच्या अगोदर अशा प्रकारचे प्रश्न सोडणे महत्वाचे आहे.
दीर्घोत्तरी प्रश्न:
दीर्घोत्तरी प्रश्न मध्ये उत्तर देत असताना या प्रश्नाचे उत्तर प्रश्नाला अनुसरून तुम्ही कितीही मोठे उत्तर लिहू शकता. यामध्ये उत्तर लिहिण्यासाठी बंधन नाही. तुम्हाला जर वाटत असेल की दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर मी पंचवीस ते तीस ओळीत लिहाव तर तुम्ही ते लिहू शकता.
या प्रश्नाचे उत्तर लिहिताना खूप मोठा अर्थ स्पष्ट करून सांगणे आवश्यक असते. तसेच दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरांमध्ये वाक्यरचना, उत्तरातील घटना क्रमबद्धता याला खूप महत्त्व असते. एखाद्या घटनेचे प्रसंगाचे वर्णन करा असे जर सांगितले असेल तर त्या घटनांचा क्रम किंवा त्याचे वर्णन योग्य त्या क्रम पद्धतीने घेणे आवश्यक आहे.परीक्षेच्या अगोदर अशा प्रकारचे प्रश्न सोडणे महत्वाचे आहे.
उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहणे:
परीक्षमध्ये इंग्रजी तसेच मराठी विषय इतर भाषेचे विषयांमध्ये उतारा वाचन आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. त्यासाठी निरीक्षण आणि बारकाईने उतारा वाचन करणे अपेक्षित असते. कारण खाली विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर वरती दिलेल्या उताऱ्यात असतात. विद्यार्थ्यांना चकवा देण्यासारखे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे उताराचा वाचत बारकाईने करणे आवश्यक आहे. आणि प्रश्नाला समर्पक उत्तर शोधून लिहणे आवश्यक असते.
वस्तुनिष्ठ प्रश्न:
वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या जुळवा, पर्याय प्रश्नाचे उत्तरे शोधा, एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा भाषेच्या विषयांमध्ये व्याकरण विषयक काही वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले असतात. इतिहासा सारख्या विषयांमध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न समाविष्ट केले जातात. म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न हे अगदी सोपे आणि थोडक्यात हे प्रश्न लिहिताना वेळेची खूप बचत होते. त्यामुळे परीक्षांमध्ये अशा प्रश्नांना खूप महत्त्व आहे.
अभ्यासामध्ये वेळेचे नियोजन:
कोणतीही गोष्ट करताना वेळेला फार महत्त्व दिले जाते.त्यामुळे अभ्यासामध्ये सुद्धा वेळेची खूप महत्त्व आहे. अभ्यासासाठी सकाळची पहाटेची वेळ ही खूप शांत आणि खूप महत्त्वाची असते.
पहाटे अभ्यास केलेला हा दीर्घकाळ लक्षांमध्ये राहतो असे म्हटले जाते. त्या पाठीमागे शा स्त्रीय कारण म्हणजे रात्रभर झोप घेऊन आपले शरीर मन,शांत,ताजेतवाने झाले असल्याने मन प्रसन्न असते आणि अशा वेळेला आपण केलेला अभ्यास हा आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतो. म्हणून सकाळी पहाटे लवकर उठून काही विद्यार्थी अभ्यास करत असतात.
तसेच आपण दिवसभराचा वेळा मध्ये आपल्याला अभ्यास किती करायचा आहे. त्यासाठी वेळ किती लागणार आहे. याचे नियोजन अगोदरच करून ठेवली असली पाहिजे. प्रत्येक विषयासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे म्हणून रोजच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून ठेवणे फायद्याचे ठरते.
सभोवतालचे वातावरण:
अभ्यास करत असताना शक्यतो शांत एकाग्र चित्ताने आणि प्रसन्न मनाने अभ्यास करणे आवश्यक आहे अभ्यासाची जागा निवडताना ज्या ठिकाणी आपल्याला इतर घुंगट त्यांचा त्रास होणार नाही आपले लक्ष विचलित होणार नाही अशी जागा निवडणे योग्य ठरते. जागा हे घरात असू शकते किंवा बाहेर बागेमध्ये किंवा शेतामध्ये ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्या सभोवताली आपलं मन विचलित करणारे आवाज असू नये म्हणून आपण त्यासाठी योग्य जागा निवडावी.
अभ्यास करताना आपले मन एकाग्र ,लक्षपूर्वक वाचन, लेखन तसेच केलेल्या अभ्यासाचे मनन, चिंतन करणे आवश्यक आहे. आपल्याला किती भाग समजला, किती भागाची आकलन झाली. आपल्याला कोणता फरक समजला नाही याची नोंद ठेवणे त्यावर वेगवेगळ्या नोट्स तयार करणे आवश्यक ठरते.
जो भाग समजला आहे त्याच बरोबर ज्यात अडचण निर्माण होते अशा भागाचा सराव करून घेणे पाठांतरावर जोर देणे आवश्यक ठरते. अभ्यासासाठी मनातील शंका आपल्या शिक्षकांना किंवा वरिष्ठांना विचारणे फायद्याचे असते.