नवरात्री सण: घटस्थापना, पूजा, उपवास, महत्व.

नवरात्र उत्सवाची संपूर्ण मराठी माहिती.

अश्विन शुध्द 1.पासून शरद ऋतूचे आगमन होताच,शारदीय नवरात्र सुरू होते. हे नवरात्र नऊ दिवसाचे असल्याने त्याला "नवरात्र" असे म्हणतात.दहाव्या दिवशी विजयादशमी च्या "दसरा" या सणाने नवरात्र उत्सवाची समाप्ती होते.नवरात्र हा वर्षातून एकदा येणारा हा उत्सव आहे.नवरात्र हा सण संपूर्ण भारतामध्ये तसेच हिंदू धरणांमध्ये खूप पवित्र असा उत्सव समजला जातो.



नवरात्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी लाईटी चा प्रकाशामध्ये  दांडिया खेळायला जातात. तसेच गरबा खेळला जातात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे खेळ लहान मोठ्यांपर्यंत खेळले जातात.नवरात्र हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो. 


नवरात्र मध्ये देवीची उपासना केली जाते.आपल्या कुलदेवतेला मनोभावे पूजा करून रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. तसेच आपल्या घरावर व कुटुंबीयांवर देवीचे कृपा च्या कृपाछत्र असावे आणि वेगवेगळ्या अदृष्य शक्तीपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे या भावनेने नवरात्र व्रत सांगितले जाते. 

Join : Whats App Channel

नवरात्र व्रत जितके आवडीने भक्तीने आणि  मनःपूर्वक केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्याचा घरामध्ये एकोपा, शांती, सुख, समाधान मिळत असते. नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजेच "शक्ती" उपासनेचा असल्याने त्याला खूप महत्त्व आहे.तो सगळ्यांकडे पाळला जातो. आपण कुटुंबातून विभक्त झालो. आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवतो, अशा सर्वांना हा कुळधर्म पाळावा लागतो.


नवरात्र उपवासाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी फायदे:

नवरात्र चे उपवास हा नऊ दिवसाचा असून दहाव्या दिवशी दसरा असतो. त्या दिवशी उपवास सोडला जातो उपवासाचा अर्थ उप म्हणजे जवळ वास म्हणजे रहाणे, भगवंताच्या जवळ रहाणे, त्याची सतत आठवण करणे, त्यासाठी सात्त्विक शुद्ध आहार घेतला जातो.नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची पूर्वीपासून एक प्रथा आहे. 


घरातील थोर व्यक्ती हा उपास करतात. त्या व्यक्तीच्या नंतर घरातील सूत्र जे व्यक्ती येतात, तिने उपवास करावा असा समज आहेत. परंतु आता नवरात्रीचा उपवास अनेक जण करू लागले आहेत. शक्ती देवतेची उपासना करताना मन प्रसन्न,शुद्ध, आणि चांगले रहावे. 


परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि त्याची सतत आठवण करत राहावे. हा या मागे उद्देश असतो. उपवास हा नऊ दिवसाचा असल्याने उपवासामध्ये खिचडी, साबुदाणा, बटाटा, दूध इत्यादी पदार्थ आहारात घेतले जातात.


आयुर्वेदाने पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीमध्ये उपवाशी राहिल्याने अन्नपचनाचे आग आणि भूक पुन्हा प्रज्वलित करणारे प्रभावी साधन मानले जाते. हे सर्वसाधारणपणे आपण सर्वजण चांगली भूक लागण्याची शक्यतो वाट पाहत नाही, जेव्हा शरीरानं पचविण्यास तयार असते, ते भुकेच्या माध्यमातून दर्शवते. 


भुक लागण्याचे आधी आपण सारखे काही ना काही खात असतो आणि ते पचनसंस्थेवर  ताण निर्माण करते.मग पचन संस्था दुर्बल बनत असते. तसेच भूक लागण्याचे अगोदर खात असल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती टिकून राहत नाही. 


याउलट आपण जर काही ठराविक दिवसांच्या अंतराने उपवास केले तर आपली प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपल्या उपवास केल्यानंतर आपल्याला टवटवीत, हलके वाटते कारण शरीरातील प्रत्येक पेशी जिवंत आणि ताजेतवाने होण्यास उपवासामुळे मदत होते. उपवास हे एक आरोग्याच्या दृष्टीने उत्तम उपचार तंत्र आहे. उपवासाचे फायदे फक्त शारीरिक पातळीवर न होता, आपल्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आपल्या मनाला उपवासा मधून शांतता मिळत असते.


उपवासाच्या दिवशी ध्यान करणे ,ध्यान केल्याने आपले मन शुद्ध आणि शांत राहते.आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात. तसेच जप करणे, मंत्र हे उर्जेने युक्त असतात ,सर्व शब्दांशी शक्ती ऊर्जा सलग्न असते. जर तुमचा कोणी एखाद्या शब्दाने अपमान केलात, तर तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो. 


मंत्र सुद्धा याचप्रकारे आपल्या शरीरावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करत असतात. मंत्रातील शब्द उच्चार यामुळे आपल्या वाग्येंद्रिय हालचाल, व्यायाम घडून येतो. तसेच मंत्र उच्चारण ह्या अतिशय प्राचीन ध्वनिलहरी आहेत, त्यांच्या बरोबर  परिवर्तन करणारी ऊर्जा घेऊन येतात.


नवरात्र मध्ये काही ठराविक नियम पाळले जातात. त्यामध्ये केशकर्तन करू नये, गादीवर किंवा पलंगावर झोपू नये, दुसऱ्याच्या घरी झोपू ,बसूही नये , पायात चप्पल घालून फिरू नये, इत्यादी. वेगवेगळे नियम पाळले जातात. 


नवरात्र सुरू होण्याच्या अगोदर संपूर्ण घर परिसर स्वच्छ केला जातो.घरोघरी सर्व कपडे, भांडी, स्वच्छ केले जातात. कारण नऊ दिवस शक्ती माता आपल्या घरांमध्ये वास्तव्यास असते असा समज आहे. म्हणून घरातील सर्व वातावरण शांत ,स्वच्छ ,सुंदर आणि मन प्रसन्न करणारे असते.


घटस्थापना करण्याची सोपी पद्धत:

नवरात्रीची पहिला दिवस हा घटस्थापनेचा असतो.अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होते.अनेकजणांना घटस्थापना कशी करावी हे माहिती नसते.त्यामुळे घटस्थापना करायची इच्छा असूनही त्यांना व्यवस्थित घटस्थापना करता येत नाही. म्हणून घटस्थापनेचा विधीसाठी आपण पूर्वतयारी करणे आवश्यक असते. 


घट बसते वेळी देवीची पूजा करावी.पूजा साठी देवीचा केलेला टाक घेणे आवश्यक असते.नंतर अभिषेक करून स्थापना करावी लागते. स्थापना करण्याच्या अगोदर प्रथम पाठ घ्यावा. शेतातील काळी माती अगोदरच आणून ठेवावी लागते. त्या पाटावर माती पसरून ठेवावी मातीमध्ये धान म्हणजेच गहू आणि इतर सहा असे एकूण सात धान कालवून त्या माती मध्ये कलश ठेवला जातो. त्यात सुट्टे पैसे, सुपारी घालावी. 


कलशात तांब्याचा धातूचा असावा.त्या तांब्याच्या कलशावर नगिनीचे पाच पाने ठेऊन,नारळ ठेवून,  हळद-कुंकू वाहून,मातीच्या गोल आणि उंच ढीग करून त्या वर कुंभारकडील टाक मातीच्या वर ठेवावा.टाकात सुट्टे पैसे,सुपारी,पाणी भरून ठेवावे.टाक ठेवताना तो सरळ उभा ठेवावा जेणेकरून त्याखाली असणारी सात धान कालवून ठेवलेली माती व्यवस्थित राहील परत टाक हलवू नये. 


खाली पळसाच्या पानांची पत्रावळी ठेवणे आवश्यक असते ,जेणेकरून मातीमध्ये पेरलेले गव्हाचे धान हे व्यवस्थित रित्या उगवले जाईल त्यानंतर त्या बाजूला कलशा ला फुले वाहून, आरस करणे आवश्यक असते .अगरबत्ती लावून,दिवे लावून किंवा समई लावून नऊ दिवस समय लावून नऊ दिवस त्यामध्ये तेल सोडत राहणे आवश्यक असते. जेणेकरून नऊ दिवस दिवा विझणार नाही. 


सकाळी घटाला माळ घालून  पूजा करावी आणि  वेगवेगळ्या रानातील किंवा आपल्या परिसरातील फुलांची किंवा झाडांच्या पानाची माळ घातली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस हे वेगवेगळ्या माळी ने पूजा केली जाते.नऊ दिवस कोणकोणत्या वनस्पती व फुले ची माळ घालायची ते ठरलेले असते.त्याची माहिती पुढे पाहूया.


नवरात्र मध्ये नऊ दिवस नऊ प्रकारच्या पानं फुलांच्या माळी विषयी माहिती.

  • पहिल्या दिवशी नागिणीचे पान 
  • दुसऱ्या दिवशी झेंडू पाने किंवा फुले 
  • तिसऱ्या दिवशी बेलाच्या पानाची 
  • चौथ्या दिवशी तुळशीच्या पानाची 
  • पाचव्या दिवशी झेंडूच्या पानाची 
  • सहाव्या दिवशी बकवानच्या पानाची 
  • सातव्या दिवशी चंदनाच्या पानाची 
  • आठव्या दिवशी मोगऱ्याच्या पानाफुलांची 
  • नवव्या दिवशी  जाई जुई किंवा आपल्या परिसरातील पाना फुलांच्या माळी घातले तरी चालतात. 

तसेच मळ घालण्यासाठी क्रम बदलले तरी चालतील.असे काही नाही की आज बेलाची पाने ची च माळ घालावी.. परंतु रोज ताजे पाणी घटामध्ये ओतून पानाफुलांची माळ नित्यनेमाने घालने तसेच नंदादीप बंद न  पडू देता, घटाची पूजा रोज होणे आवश्यक असते.


नवरात्रीचे नऊ रंग  कोणते असतात. 

नवरात्रीच्या नऊ दिवसाला नऊ वेगवेगळ्या रंगाचे विशेष महत्त्व दिले गेले आहे. या नऊ दिवशी देवी सुद्धा नऊ वेगळे वस्त्र परिधान करत असते. त्याचप्रमाणे हिंदू स्रीया सुद्धा या दिवशी नऊ वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करतात.तसेच देवीची मनोभावे आरती करत असतात.हे नऊ रंग पुढीलप्रमाणे आहेत.1.पिवळा रंग 2.हिरवा रंग 3.राखाडी रंग 4.नारंगी रंग 5.पांढरा रंग 6.लाल रंग 7.गडद निळा रंग 8.गुलाबी रंग 9.जांभळा रंग 


नवरात्रात कोणत्या नऊ देवीच्या रूपांची पूजा केली जाते.

  • दुर्गामाता 
  • संतोषीमाता 
  • कालिकामाता 
  • सप्तशृंगी 
  • रेणुकामाता 
  • तुळजा भवानी माता 
  • महालक्ष्मीमाता 
  • माहूरगड रेणुका माता 
  • चांदिकामाता


अशा प्रकारे आपण नवरात्र म्हणजे काय,नवरात्रीचा सणाचे महत्व,नवरात्र निबंध,नवरात्रिची पुजा,घटस्थापना कशी करतात,या सर्व विषयी माहिती घेतली.आवश्यक बदल करण्यासाठी कमेंट करू शकता. 

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने