संत नरहरी सोनार माहिती मराठी.

 

संत नरहरी सोनार : महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, किर्तन,भजन, आणि दिंडी, इत्यादी शब्द आपल्या कानावर पडले कि आपल्याला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज इत्यादी संतांची आठवण येते. त्याच प्रमाणे संत नरहरी सोनार हे सुद्धा एक थोर संत होते. त्यांच्या जीवनाविषयी काही माहिती,तसेच त्यांनी केलेले कार्य याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया.


Join : Whats App Channel (medium-bt)


संत नरहरी सोनार यांचा जन्म:

कितीतरी शतके अगोदर द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी भक्त पुंडलिकाच्या निमित्ताने बालरूप धारण करून विटेवर उभा राहिला होता. 28 युगे त्याचे हात कमरेवर आणि दृष्टी समचरण होती. तेराव्या शतकात पांडुरंगाला प्रेमळ भक्त मानले ज्यांनी जनतेला आत्मवृत्तिची दिशा दाखवली व त्यांचा परमार्थाचा मार्ग सुलभ केला.


संत भक्त नामस्मरण, भजन, कीर्तन यांची लयलुट या सर्व गोष्टीमुळे जरतारी वैभव लाभलेल्या पांडुरंगाचे वास्तव्य असणाऱ्या पंढरपूर मध्ये संत नरहरी सोनार या भक्ताचा जन्म झाला.


वारकरी सांप्रदायामधील प्रथम शैव पंथी संत नरहरी सोनार यांचा जन्म इस 1313 शके 1915 च्या सुमारास श्रावण शुद्ध त्रयोदशीला पंढरपूर येथे सोनार कुळात झाला. त्यांचे मूळ आडनाव महामुनी होते. संत नरहरी हे वडिलोपार्जित सुवर्ण काम करत असल्याने पुढे त्यांचे आडनाव सोनार झाले.


ज्या कुळात शिवोपासना पूर्वापार चालत होती. अशा कुळातील संत नरहरी महाराज यांच्या घराण्याची वंश परंपरा ही रामचंद्रदास- कृष्णदास- हरिप्रसाद- मुकुंदराज-मुरारी- अच्युत आणि नरहरी असे सांगण्यात येते.


चौदाशे वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी महाराज यांना आशीर्वाद दिला होता की हा मुलगा हरी हराचा विठ्ठल-शंकर समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल.


संत नरहरी सोनार यांचा विवाह:

वयाच्या अठराव्या व विसाव्या दरम्यान संत नरहरी सोनार यांचा विवाह गंगा नावाच्या संस्कार मुलीशी झाला. ती ही ईश्वरभक्त होती. कालांतराने त्यांना नारायण व मालू अशी आपत्ये झाली.


संत नरहरी यांचे वडील थोर शिवभक्त होते. त्यांच्या अंतकरणात शिवपार्वती शिवाय कसलाच विचार नव्हता.


शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ...


या नियमाप्रमाणे त्यांना आपल्या शिवभक्तीच फळ नरहरी यांच्या रूपाने मिळाले.


लहानपणापासूनच नरहरी यांच्यावर घरात असलेल्या शिवभक्तीचे संस्कार होऊ लागली होते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या अंगी असणाऱ्या संतांची लक्षणे स्पष्ट दिसून येत होती. कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने लहानपणीच त्यांना अनेक शिवस्रोत पाठ करण्यात आनंद वाटत असे. रोज शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराची नित्यनेमाने पूजा करणे त्यांना आवडत असे. तेही मनोभावे शिवभक्ती करू लागले. लहान वयातच ते थोर शिवभक्त झाले.


संत नरहरी महाराजांच्या वयाच्या सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा उपनय संस्कार संपन्न झाला.नाथ संप्रदायातील गहीनाथ महाराज नरहरी यांना गुरु म्हणून लाभले. त्यांच्याकडून गुरुपदेश नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला.


जसे जसे मोठे झाले तसे त्यांनी शिवभक्तीवर आधारलेले सर्व ग्रंथ वाचून काढले.तेव्हापासून शिवपार्वतीचे महत्त्व त्यांच्या नजरेत वाढू लागले. त्यांची शिवशंकरावर खूप भक्ती होती. त्यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला होता. त्यांचे अंतकरण म्हणजे शिव मंदिराचे जणू जिथे शिवपार्वती विराजमान आहेत. ते इतर देवतांचे दर्शन घेण्यासाठी जात नसत. त्यांचे या वृत्तेमुळे काही जणांना त्यांचा राग येत असे.


संत नरहरी सोनार हे एकनिष्ठ शिवभक्त होते.पंढरपुरात राहूनही पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घेतले नव्हते. संत नरहरी सोनार हे पंढरपुरातील त्या वेळी उत्तम कारागीर होते.


एकदा एका विठ्ठल भक्त सावकाराने पांडुरंगाला केलेले नवस पूर्ण करण्यासाठी कमरेची सोनसाखळी बनवण्यासाठी नरारी सोनारांना सांगितले पण नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला. कारण त्यांचा पण होता की शिवशंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते पाहणार नाहीत.


त्यावेळी उपाय म्हणून सावकार यांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी सुंदर सोनसाखळी तयार केली व ती वीतभर जास्त झाली पुन्हा त्यांनी बरोबर माफ आणायला सांगून त्याप्रमाणे साखळी करून दिली. परंतु विठ्ठलाला सकाळी घातल्यावर पुन्हा माफ जास्त झाले यामुळे ते गोंधळले.


अखेर त्यांनी स्वतः मंदिरात जाऊन माफ घेण्याचे ठरवले मात्र मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठल मूर्ती समोर गेले व जेव्हा ते सोनसाखळी कमरेला बांधू लागली तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चरणी लागली सोनाराचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेषनाग असल्याचे जाणवली.


त्यांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि फक्त तर समोर विठ्ठलाची मूर्ती उभं होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली पुन्हा तेच घडले अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंगा परमात्माच भगवान शंकर आहे शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत. हे सर्व देव विठ्ठलाचा सामावलेले आहेत त्यानंतर त्यांचे लक्ष व्यवसायाकडे कमी आणि भक्तीमध्ये जास्त झाले ते पांडुरंगाला त्यांच्या अभंगातून म्हणतात.


"देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार."


या साक्षात करा नंतर नरहरी महाराजांचा मनात असलेला हरी हाराचा वाद मिटला आणि समाजात वेगवेगळ्या पंथांमध्ये असलेला वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.


संत नरहरी सोनार यांची समाधी:

माघ वद्य तृतीया शके 1235 मध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करता करता नरहरी सोनार समाधीस्थ झाले पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे.


संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी:

संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी महोत्सव माघ कृष्ण तृतीयेला परळी वैजनाथ आणि अन्य ठिकाणी होतो.


संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी दरवर्षी सर्वत्र साजरी केली जाते या वर्षी म्हणजे 2023 मध्ये संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी 8 फेब्रुवारी या दिवशी आहे.


Join : Whats App Channel (medium-bt)


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने