Blindness Information in Marathi.
21 दिव्यांग प्रकारांपैकी अंधत्व किंवा अंध Visually Impaired हा एक अपंगत्वाचा प्रकार असून,या प्रकाराविषयी आपण संविस्तर माहिती घेणार आहोत. अंधत्व कमी करण्यासाठी तसेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम 1976 पासून हाती घेतला आहे.
![]() |
अंधत्व म्हणजे काय? |
Table Of Content :
अंध कोणाला म्हणावे।अंधत्व या अपांगत्वाविषयी माहिती मराठी.
Visually impaired peoples शोधून काढणे आणि त्यांच्या समस्या कमी करणे,प्रत्येक जिल्हयात नेत्र सुविधा निर्माण करणे इ.वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
Visually impaired peoples किंवा शाळेतील अंध मुलांसाठी अंधांसाठी असणारे साहित्य साधने यांचा वापर करून हे अंधत्व हे अपंगत्व कमी करता येते. Louis Braille लुईस ब्रेल याची ब्रेल लिपी Braille scriptही अंधांसाठी खूप मोठे वरदान ठरले आहे.
अंधत्वाची व्याख्या,Visually Impaired Definition.
अंधत्वाची व्याख्या लिहण्याअगोदर अंधत्व हे दोन प्रकारचे असते.अंधत्वाचे दोन प्रकार पैकी पहिला प्रकार पूर्णत:अंध (Blindness) आणि दूसरा प्रकार अंशत:अंध (Low Vision) होय.
1.पूर्णत:अंध (Blindness) ची व्याख्या :-
दृष्टीचा पुर्णपणे अभाव असणारे किंवा चांगल्या डोळ्याची दृष्टितीक्ष्णता 10/200 किंवा 3 ते 60 स्नेलन पेक्षा कमी आहे.तसेच दृष्टिक्षेत्र मर्यादा 10 डिग्री अंश पेक्षा कमी दृष्टीकोनाचे क्षेत्र असणे म्हणजे पूर्णत: अंध (Blindness) होय.
2.अंशत:अंध (Low Vision) ची व्याख्या :-
एक डोळा निकामी असणे किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टि कमी असणे तसेच जवळचे आणि लांबचे न दिसणे या प्रकारातील दृष्टीदोष म्हणजे अंशत:अंध (Low-Vision) होय.
अंधत्व येण्याचे मुख्य कारणे कोणते?
अंधत्व किंवा दृष्टिदोषाचे वेगवेगळे कारणे असून आपण खलील मुद्याच्या आधारे अंधत्व किंवा दृष्टिदोषाचे कारणे काय आहेत याविषयी माहिती घेऊया.
1.अंधत्व येण्याचे जन्मापूर्वीचे कारणे.
अंधत्व येण्याचे अनुवांशिकता हे एक कारण असू शकते.अंधत्व पूर्वी आपल्या वडिलांच्या अथवा आईच्या कुटुंबात कोणी अंध असेल तर पुढील पिढीत सुद्धा अंधत्व येण्याची शक्यता असू शकते.
अकाली म्हणजे पूर्ण दिवस भरण्याआधीच प्रसूती होणे.
गर्भावस्थेत असताना मातेला गोवर,कांजण्या,गंभीर स्वरूपाचे आजार,योग्य आहार न मिळाल्याने अंधत्व हे अपंगत्व येऊ शकते.
जवळच्या नात्यात लग्न करणे.
2.अंधत्व येण्याचे जन्मावेळीचे कारणे .
अंधत्व येण्याचे जन्मावेळीचे कारण म्हणजे तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शन न घेता प्रसूती होणे.
प्रसूती वेळी डोळ्याला अथवा डोक्याला इजा होणे.
प्रसूती होताना जास्त काळ लागणे.
प्रसूती झाल्यावर बाळ न रडणे अथवा उशीरा रडणे.
3.अंधत्व येण्याचे जन्मानंतर चे कारणे.
अंधत्व येण्याचे जन्मानंतर चे कारणे म्हणजे डोळ्याला इजा होणे.
डोळ्याला खुपर्या होणे.
अ जिवनसत्वयुक्त आहारात नसणे.
भाज्या,फळे,इत्यादी सकस आहार नसणे.
डोळ्यात अंकुचिदार वस्तु घालणे.
डोळ्यात चुकीच्या पद्धतीने घरगुती उपचार केल्याने अंधत्व येते.
अंधत्व अपंगत्व टाळण्यासाठी काय उपाययोजना करावे?
गरोधर मातेला समतोल आहार मिळवा.
जवळच्या नात्यातील लग्न टाळावे.
गर्भवस्थेत गर्भाचे संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करणे.
अ जिवनसत्व असलेला आहार बाळाला द्यावा.
डोळ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रसूती वेळी तज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.
गर्भवस्थेत असताना डॉक्टर यांचे वेळीवेळी मार्गदर्शन व तपासण्या कराव्यात.
डोळ्याची काळजी व निगा ठेवावी.
डोळ्यावर घरगुती उपचार करणे टाळावे.
अंधत्व किंवा दृष्टिदोष असण्याचे लक्षणे
अंधत्व किंवा दृष्टिदोष असण्याचे विविध लक्षणे आहेत,ते पुढीलप्रमाणे.
डोळ्यातून नेहमी पाणी येणे.
डोळ्याला नेहमी खाज किंवा जळजळ,डोळे सतत लाल,किंवा डोळे सतत सुजणे .
एक किंवा दोन्ही डोळ्याचे बुब्बळ आत जाने किंवा बाहेर येणे.
कोणतीही वस्तु वाकून किंवा जवळून पाहणे.
रातांधळेपणा असणे.
लहान अक्षरे वाचण्यात अडथळा.
ऐकण्यावर जास्त भर असणे.
स्पर्श करून वस्तूंची ओळख करून घेण्यावर जास्त भर देणे.
शाळेतील मूल असेल तर फलकावरील लिखाण वाचन न करता शेजारी असणार्या मुलांच्या वहीत पाहून लिहणे.
अंधत्व आल्यानंतर करावयाच्या उपाययोजना.
डोळा हा मानवाचा खूप महत्वाचा इंद्रिय आहे.अंधत्व आलेले असेल तर सर्वात प्रथम हे अपंगत्व स्वीकारणे आवश्यक आहे.
अंधत्व आलेल्या व्यक्तीचे पुनर्वसन कसे करता येईल यासाठी त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन व सहकार्य करणे
आवश्यक असते. अंधत्व आल्यानंतर खालील काही उपाययोजना करणे आवश्यक असते.
अंधत्व हे किती प्रमाणात आलेले आहे याची तपासणी करून घेणे.
अल्पदृष्टी दोष असेल तर त्यावरील शस्रक्रिया करून घेता येते.
पूर्ण अंधत्व असेल तर ते स्वीकारणे आणि त्यावर मात करणे याशिवाय पर्याय नाही.
अंशत: अंधत्व असेल तर चष्मा वापरता येतो.
लहान वयात अंध शाळेत किंवा समावेशित शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
अंधत्व आले असेल अंध लोकांसाठी उपयुक्त लिपी Braille script चा वापर लहान वयात शाळेत करणे, तसेच
स्पर्श ज्ञान विकसित करणे .
अंध व्यक्ती स्वावलंबी कशा होतील यावर भर देणे.
अंधांसाठी किंवा दृष्टिदोष (कमी दिसणार्या लोकांसाठी) साहित्य साधने.
अंधांसाठी किंवा दृष्टिदोष असणार्या व्यक्तींना साहित्य साधने वापरुन अंधत्व या अपंगत्वावर मात करता येते.अंध
लोकांसाठी ब्रेलपाटी,अंधकाठी ,ब्रेलबुक,लो व्हिजन किट,ब्रेल लिपी Braille script,स्पर्श साधने,चष्मा,लार्ज प्रिंट,ऑडिओ साधने. इत्यादी.
अशा प्रकारे आपण अंधत्व म्हणजे काय।अंधत्व या अपंगत्वाविषयी माहिती, उपाययोजना,करणे लक्षणे याविषयी माहिती घेतली.
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.