भौतिकउपचार, फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम उपचार म्हणजे काय?

भौतिकउपचार Physiotherapy व्यायामाचे फायदे.



फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार म्हणजे काय
फिजिओथेरपी (Physiotherapy)


Table Of Content:
Table Of Content(toc)


फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार पद्धती चे फायदे.

आजच्या काळात अनेक वेगवेगळ्या व्याधी आणि आजार उद्भवत आहेत,कामाचा ताण तणाव बदलती जीवनशैली पाहता रोज नवीन नवीन आजार निर्माण होऊ लागले आहेत.या आजारांवर मात करण्यासाठी नवीन नवीन संशोधन केले जात आहेत. 


वेगवेगळ्या औषधांचा वापर केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होताना आपण पाहत आहोत.परंतु या पोस्ट च्या माध्यमातून आपण औषधांव्यतिरिक्त केला जाणारा उपचार म्हणजे फिजिओथेरपी (Physiotherapy) याविषयी माहिती घेणार आहोत. 


फिजिओथेरपी (Physiotherapy) ला मराठीमध्ये भौतिकउपचार असे म्हणतात. 


अस्थिरोगतज्ञ किंवा फिजिओथेरेपिस्ट हे अस्थिव्यंग रुग्णांना शरीराच्या ज्या भागात व्यंग आहे.त्या भागाला फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम देतात त्यालाच फिजिओथेरपी (Physiotherapy) असे म्हणतात.


फिजिओथेरपी (Physiotherapy) म्हणजे हा एक व्यायाम आहे,परंतु हा व्यायाम शरीराच्या ज्या भागात व्याधी किंवा व्यंग आहे. त्या भागाला मेडिकल असेसमेंट करून व्यायाम किंवा थेरेपी दिली जाते.फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार ही औषधव्यतिरिक्त दिली जाते. 


फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम कोणाला दिला जातो?

फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम हा ज्या लोकांना अस्थिव्यंग हे अपंगत्व आलेले आहे, त्यांना दिले जाते. अस्थिव्यंग हे 21 दिव्यांग प्रकारापैकी एक अपंगत्व असून त्यावर फिजिओथेरपी (Physiotherapy) सारख्या व्यायामाने सहज औषधाशिवाय  किंवा शस्रक्रियाशिवाय उपचार केला जातो. 


अस्थिव्यंग व्यक्ती,ज्यांना हाडांचे दुखणे आहे ,सतत हात,पाय दुखत असतात,तसेच इतर शारीरिक आजार,व्याधी असणार्‍या लोकांना फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार केला जातो. 


लहान मुलांमध्ये एखाद्या अवयवला व्यंग किंवा हाडाची रचना सर्वसामान्य नसेल म्हणजे हात,पाय यांचे हाड वाकलेले असेल तर ते पुढे अपंगत्व वाढत जाऊ शकते आणि हालचालीवर नियंत्रण येऊ शकते,म्हणून फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम करून घेतल्याने हे अस्थिव्यंग हे अपंगत्व टाळता येते.


मेंदूचा पक्षघात (सेरेब्रल पाल्सी) हे अपंगत्व असणार्‍या लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना  फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार केला जातो.ज्यामुळे हे व्यक्ती एकाच जाग्यावर पडून असल्याने त्यांचे हाडांना ताठरता आलेली असते ति  फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार करून कमी करता येते . 


पाठीचे दुखणे,किंवा दररोज चे कामे करत असताना अचानक साधी पाठीची शिर भरली किंवा चालतना पाय दुमडला तरी आपण उपचार घेण्यासाठी अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर कडे जातो तेव्हा ते थोड्या दिवस  फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम उपचार देऊन औषध न देता आपल्यावर उपचार करतात. 


अपघात झालेल्या व्यक्ती यांना हाडाचे दुखणे झाले असेल तर थोड्या दिवसात  फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार घेतल्यावर समस्या कमी करता येते. 


लहान मुलांमध्ये हाताला किंवा पायाला जर अस्थिव्यंग असेल तर फिजिओथेरेपीस्ट हे त्या मुलांना  फिजिओथेरेपी देऊन  त्यांना अपंगत्व येण्यापासून टाळू शकतात,लहान असताना नियमित फिजिओथेरेपी व्यायाम केल्याने अस्थिव्यंग हे अपंगत्व टाळता येते. 


हातापायला कंप,हाताला पायाला सतत मुंग्या येणे,मानेचे किंवा मनक्याचे दुखणे, Pirellis सारख्या गंभीर आजार कमी करण्यात यश येते. 


फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायामाचे फायदे. 

  • फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम हा फिजिओथेरपीस्ट देतात ते त्या क्षेत्रात तज्ञ असतात. 
  • फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम हा मेडीकल असेसमेंट करून दिला जातो. 
  • फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम हा औषधांशिवाय दिला जाणारा उपचार आहे. 
  • फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम नियमित केल्याने मोठ मोठ्या शस्रक्रिया टाळता येतात.
  • फिजिओथेरपी (Physiotherapy) व्यायाम नियमित केल्याने अस्थिव्यंग हे अपंगत्व टाळता येते. 
  • फिजिओथेरपी (Physiotherapy) उपचार घेतल्याने शरीरातील वेगवेगळ्या व्याधी ,जुने दुखणे कमी करता येतात. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने