NFC विषयी माहिती.
 |
NFC |
आपल्याकडे स्मार्टफोन जवळजवळ सर्वांकडे आलेला आहे. आपल्या स्मार्टफोन मध्ये अनेक फीचर्स असतात. आपल्याला आपल्या स्मार्टफोन मधील सर्वच फीचर्स बद्दल माहिती नसते. कधी कधी काही फीचर्स आपल्याला माहिती सुद्धा नसतात.
असेच आपल्या स्मार्टफोन मध्ये NFC चे फीचर्स आहे. हे एन एफ सी चे फीचर्स आपल्याला माहिती असेल ,काहींना माहिती नसेल तर आपण या पोस्ट मधून NFC म्हणजे काय,एनएफसी चा उपयोग,या विषयी माहिती घेऊया.
मुद्दे:
- NFC म्हणजे काय?
- NFC चा Full From काय आहे ?
- NFC काय आहे?
- NFC चे प्रकार कोणते?
- NFC कसे काम करते ?
- NFC चे काम कसे केले जाते?
- NFC चे उपयोग काय आहेत?
- NFC वापरण्याचे फायदे?
- एन एफ सी चे तोटे काय आहेत?
NFC वायरलेस वर आधारीत आहे. एनएफसी च्या मदतीने आपण आपले डिवाइस जवळच्या डिवाइस ला जोडू शकतो. NFC उपयोग अनेक प्रकारचे तांत्रिक कामे करण्यासाठी होतो.
NFC चा Full From काय आहे?
NFC चा Full From Near Field Communication आहे.
NFC काय आहे?
NFC एक Advanced Wireless Technology आहे. या Technology चा वापर करून दोन डिव्हाइस एकमेकांना टच करून जोडू शकता,डेटा आदान प्रदान करू शकता. NFC दोन डिव्हाइस जोडण्यासाठी Electromagnetic Radio Field च वापर करतो. एनएफसी चा वापर दोन डिव्हाईस मध्ये दोन ते चार सेंटीमीटर अंतरावरून केला जातो.
@@@@@@
एन एफ सी चा डेटा ट्रांसपर स्पीड 106 KBPS ते 420 KBPS पर्यंत असतो. NFC चा जास्तीत जास्त उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो. एनएफसी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी समोरील डिव्हाइस पण NFC सपोर्ट करणारे असावे लागते. NFC दोन्ही डिव्हाइस एकमेकांना टच केल्यावरच माहिती ट्रांसपर करतो.
NFC चे प्रकार कोणते?
एनएफसी चे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे.
1. Active NFC Device
Active NFC Device हे डेटा चे आदान आणि प्रदान दोन्ही कामे करते. Active NFC Device इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी सक्षम असते. यासाठी फक्त विद्युत पुरवठा करावा लागतो.
2. Passive NFC Device
Passive NFC Device फक्त सूचना पाठवण्यासाठी कामात येत असते. हे Active NFC Device सारखे डेटा आदान प्रदान करण्यासाठी सक्षम नसते. यात विद्युत पुरवठा करणे आवश्यक नसते. Passive NFC Device ला कनेक्ट होत नाही. Passive NFC Device चा उपयोग Transmitter ,Tags किंवा Interactive Signs साठी केला जाऊ शकतो.
NFC कसे काम करते?
आपण कधी वाय फाय किंवा ब्ल्युटुथ वापरले असेल त्याच प्रकारे एनएफसी काम करते. NFC डेटा शेयरिंग करण्याचे काम करतो. NFC Radio Frequency Identification चे काम करते. आपण विमानतळ ,मोठे शॉप,मोठे मोठे मॉल्स याठिकाणी आपले समान,बॅग,पिशव्या तपासण्यासाठी यंत्र पहिले असेल,ते सुद्धा Radio Frequency Identification चे कामं करते.
NFC चे कार्य:
एनएफसी चे काम खालील तीन स्तरावर केले जाते.
1. Peer to Peer Mode
जास्तीत जास्त डिव्हाइस मध्ये Peer to Peer Mode वापरले जाते. Peer to Peer Mode आपल्या मोबाईल मध्ये वापरले जाते. यात डेटा पाठवणार्याचा Active Mode आणि डेटा प्राप्त करणार्या डिव्हाइस हे Passive mode वर असणे आवश्यक असते.
2.Reader-Writer
एनएफसी च मोड one way data transmission वर आधारित असतो. याचा उपयोग दोन्ही डिव्हाइस मधील डेटा Read करण्यासाठी केला जातो.
@@@@
3.Card Emulation
हा मोड NFC supported डिव्हाइस ला स्मार्ट कार्ड प्रमाणे उपयोग करण्यासाठी सक्षम करतो. या मोड चा उपयोग Transection करण्यासाठी केला जातो.
NFC चे उपयोग.
आपल्याला आतापर्यंत अंदाज आलेला असेल की एनएफसी कसे काम करते,याचा नेमका उपयोग कसा केला जातो. एनएफसी च उपयोग आणखी कशासाठी होतो याची माहिती खलील मुद्द्याच्या आधारे घेऊया.
1. डेटा शेयरिंग.
NFC चे मुख्य काम हे डेटा ट्रांसपर करण्यासाठी केला जातो,आपण कोणत्याही एनएफसी सपोर्टेड डिव्हाइस मध्ये एनएफसी च्या माध्यमातून डेटा शेअर करू शकता.
2.स्मार्ट कार्ड .
एनएफसी फीचर्स चा उपयोग स्मार्ट कार्ड च्या साह्याने पेमेंट करण्यासाठी केला जातो. यात अनेक स्मार्ट कार्ड चा सहाय्याने दैनंदिन पेमेंट करण्यासाठी उपयोगी पडते.
3.शिपिंग सर्व्हिसेस.
NFC तंत्रज्ञानाचा उपयोग Shipping companies सामान ला ट्रॅक करण्यासाठी केला जातो.
4.डिजिटल पेमेंट .
आजच्या काळात वाढते डिजिटल व्यवहार त्यासाठी एनएफसी चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरण्यात एनएफसी चा उपयोग होतो,म्हणजे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी E wallets चा समावेश यात होतो. फोन पे,गुगल पे, इ.
NFC वापरण्याचे फायदे.
- एन एफ सी वापरायला सोपे आहे.
- एन एफ सी चा फायदा म्हणजे तुमचे काम एका क्लिक मध्ये होते.
- एनएफसी तंत्रज्ञान केवळ पेमेंट सिस्टीम मध्येच नाही तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वापरले जाते.
- NFC हे हॉटेल आरक्षण, तिकीट बुकिंग, मोबाईल बॅंकिंग, रियल टाइम टेबल ट्रेक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.
- NFC या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकतो,त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल आणि ब्रँड ची लोकप्रियताही वाढेल.
एन एफ सी चे तोटे?
- एन एफ सी चे फायदे तसे तोटेही आहेत,असे तंत्रज्ञान वापरणे काही व्यवसायांसाठी महाग असू शकते.
- एनएफसी हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी कंपनीला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये गुंतवणूक करावी लागणार असते.
- याशिवाय आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक असते .
- अशा परिस्थितीत सर्वांना खर्चिक तंत्रज्ञान वापरणे अल्प प्रमाणात कार्यरत असलेल्या कंपनीसाठी कठीण होऊ शकते.
- एनएफसी तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्यात सुरक्षितेसाठी थोडा धोका नक्कीच आहे,कारण तुमच्या फोनवर तुमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.तुमचा डेटा सुरक्षित ठेवणे तुम्हाला जमले पाहिजे.