Yoga Teacher: पात्रता आणि भविष्यातील करिअर संधी.

Yoga Teacher Training information in Marathi.

योगा शिक्षक होण्यासाठी आवश्यक मराठी माहिती
योगा शिक्षक 

योगा शिक्षक Yoga Teacher होण्यासाठी आवश्यक माहिती.

योगा आपल्या शरीरासाठी इतका खूप फायदेशीर आहे. योगा हा एका व्यायामाचा प्रकार आहे.योगा ऋषीमुनींच्या काळापासून म्हणजेच पूर्वीपासून योगाला महत्व आहे,तसेच आयुर्वेदात सुद्धा योगाला विशेष महत्व दिले गेले आहे.

आज वेगवेगळे आजार उद्भवत असताना योगाचे महत्त्व वाढतच चालले आहे. कारण आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे निरोगी ठेवायचे असेल तर, सध्याच्या काळात योगा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. 

आपल्या रोजच्या व्यस्त कामाच्या  वेळापत्रकामुळे बहुतेक लोकांना योगा करता येत नाही.त्यामुळे त्यांच्या शरीरात आणखी समस्या निर्माण होऊ लागतात.त्यामुळे योग शिक्षक बनून आपण आपले योगा टीचर मध्ये करियर करू शकतो.तसेच आपले स्वत:चे शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याचा फायदा होईल. 

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.म्हणजे योगाचे महत्व भारतातच नाही तर संपूर्ण जगाला समजले आहे.

Yoga Teacher होण्यासाठी काय करावे लागते,योगा शिक्षकासाठी आवश्यक पात्रता याविषयी काही खालील मुद्दयाच्या आधारे माहिती घेऊया.जगात दरवर्षी 21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. 

योगाचे आरोग्यासाठी फायदे आणि महत्व.

Benefits and Importance of Yoga for Health खालीलप्रमाणे.

  • योगा नियमित केल्याने शरीराला लवचिकता प्राप्त होते. 
  • योगामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 
  • योगा लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्ती पर्यंत केल्या जाऊ शकतात. ठराविक आसने आणि प्रणायम यांचा वापर करून योगा करू शकतो. 
  • योगामुळे शरीर निरोगी ,मन प्रसन्न आणि आनंदी राहण्यास मदत होते. 
  • शरीरातील वेगवेगळ्या व्याधीपासून ,आजरापासुन मुक्ति मिळण्यास मदत होते. 
  • योगाची अनेक आसने आहेत ज्याद्वारे तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहन्यास मदत होते. 
  • योगाची प्रक्रिया सध्याच्या काळापासून नाही तर प्राचीन काळापासून सुरुवात केली आहे,ज्यामुळे लोक पूर्णपणे निरोगी राहतात. 
  • योगामध्ये सर्व शरीराचा व्यायाम होतो,तसेच यात कोणत्याही औषधांचा प्रयोग किंवा वापर केला जात नाही.
  • योगा हे पुर्णपणे मोफत आहे. 

योगा शिक्षक कसे व्हावे।How to become a yoga teacher.

  • Yoga Teacher होण्यासाठी तुम्हाला योगाची संबंधित सर्व माहिती मिळायला हवी आणि त्याचबरोबर योगाची आवड असणे महत्वाचे आहे. 
  • त्यानंतर तुम्ही चांगले योग शिक्षक बनू शकता.यासोबतच योग शिक्षक होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातून बीएड चा कोर्स करावा लागेल.
  • योगासाठी आवश्यक असणारा बीपीएड (B.P. e d) हा अभ्यासक्रम जवळपास सर्वच विद्यापीठातून चालवला जातो.  
  • बीपीएड या अभ्यासक्रमाची मान्यता संबंधित महाविद्यालयांना दिली जाते,त्यामुळे बीपीएड करणारे उमेदवार संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बीपीएड संपूर्ण कोर्स करू शकतात आणि योगा टिचर बनू शकतात.

योगा शिक्षक होण्याचे फायदे काय आहेत।Benefits of being a yoga teacher.

योगा शिक्षक होण्याचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत त्यातील महत्त्वाचे फायदे आपण पुढील प्रमाणे बघूया.

  • योगा शिक्षक झाल्याने तुम्हाला तुमच्या करियर सोबत समाज कार्य करण्याची संधी मिळते, समाजात आदर्श जीवन जगण्याची संधी मिळते. 
  • योगा टिचर झाल्यावर तुमची शारिरीक लवचिकता निर्माण करण्यात मदत होते. 
  • योगा मुळे  तुमचा सराव व तुमच्या स्नायूची ताकद वाढण्यास मदत होते. 
  • योगामुळे तुमची जीवनशैली निरोगी होण्यास मदत होते. 
  • तुम्हाला मनाची शांती मिळते व तणावातून आराम मिळतो. 
  • योगा शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे?
  • बीपीएड मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • उमेदवारांनी शारीरिक शिक्षणात 25 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी लागते. 
  • बीपीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार एक शिक्षकासाठी अर्ज करू शकतो.

Yoga Teacher होण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या?

  • Yoga Teacher होण्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सक्षम असावे लागते. 
  • योगा शिक्षक होण्यासाठी आपले स्वत: चे शरीर फिट असावे. 
  • नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
  • विद्यापीठातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी शारीरिक शिक्षण आणि आरोग्य या अभ्यासक्रमाचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे . 
  • प्रवेश परीक्षा संबंधित प्रश्नांची चांगली माहिती मिळवा.
  • प्रवेश परीक्षेत यश मिळवण्यासाठी केंद्र सरकारमधील कायदामंत्री आणि विविध प्रकारचे क्रीडा स्पर्धा ची माहिती तुमच्याकडे असायला हवी, कारण या सर्व गोष्टींशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. 

What career opportunities in the future after becoming a yoga teacher.

  • Yoga instructor म्हणून करिअर संधी उपलब्ध.
  • योगा सल्लागार,रोग तज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
  • योगा शिक्षक  होता येईल.
  • योगा व्यवस्थापक होता येईल.
  • योगा आरोग्य केंद्र उभारता येईल.
  • सरकारी रुग्णालये,दवाखाने इतर ठिकाणी करियर संधी उपलब्ध होतात. 
  • या पोस्ट मधून आपण योगा शिक्षक याविषयी संपूर्ण माहिती घेतली जर आपल्याकडे या विषयाची अधिक काही माहिती असेल तर आम्हाला संपर्क करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने