वकील कसे व्हावे.

वकील कसे व्हावे?

वकील कसे व्हावे
वकील कसे व्हावे 


Table Of Content:
Table Of Content(toc)

Lawyer Meaning In Marathi.

वकील या शब्दाला इंग्रजीमध्ये Lawyer असे म्हणतात.वकील हा कायद्याचा अभ्यास असणारा असतो,कायदा म्हणजे इंग्रजीत Low असे म्हणतात.म्हणून वकिलाला Lawyer असे म्हणतात. 


वकील करियर विषयी माहिती.

वकील हे विविध प्रकारचे असतात.ते कोणत्याही एक विषयातील तज्ञ असू शकतात. वकील व्यवसायात बिझनेस लॉंयर,कमर्शियल लॉंयर,कॉंट्रॅक्ट लॉंयर,टॅक्स कन्सल्टंट,प्रॉपर्टी लॉंयर,इत्यादी विविध प्रकारचे लॉंयर आहेत. 

भारतात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात नोकरी करणार्‍याला अॅडव्होकेट असे म्हणतात.इंग्लड सारख्या ठिकाणी ब्यारिस्टर पदवी पूर्ण केलेल्या वकिलाला ब्यारिस्टर असे म्हणतात. 

वकील होण्यासाठी तुम्हाला कायद्याची संबंधित माहिती मिळवण्यात रस असणे आवश्यक आहे या सोबतच लोकांच्या हक्कासाठी लढण्याची आणि युक्तिवाद करण्याची क्षमता तुमच्यात असणे आवश्यक आहे.तुमच्याकडे या सर्व वैयक्तिक गोष्टी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वकिली करू शकता आणि वकिली व्यवसाय मध्ये करिअर म्हणून यशस्वी होऊ शकता. 


वकील होण्यासाठी आवश्यक पात्रता.

  • वकील होण्यासाठी एल एल बी कोर्स करावा लागतो.
  • LLB कोर्स तीन वर्षाचा असतो. जो पदवी पूर्ण केल्यावर करता येतो. LLB ला प्रवेश घेण्यासाठी प्रथम परीक्षा द्यावी लागते. 
  • वकील होण्यासाठी दूसरा पर्याय म्हणजे 12 वी नंतर डायरेक्ट पाच वर्षाचा कोर्स करणे,वकील होण्यासाठी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.त्यानंतर तुम्हाला कॉमन टेस्ट मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पाच वर्षाच्या लॉं अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
  • जर तुम्ही 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही तीन वर्षाच्या कालावधीत कायद्याचा अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता.यासाठी तुम्हाला कॉमन लॉ टेस्ट बसावे लागेल आणि विद्यापीठे कायद्याचे अभ्यासक्रमाला स्वतंत्र परीक्षा किंवा गुणवत्ते द्वारे प्रवेश देतात,याद्वारे तुम्ही कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता.
  • इंग्रजी विषय मध्ये तुम्हाला पुरेसे ज्ञान असले पाहिजे.
  • तुम्हाला इंग्रजी किंवा मातृभाषेचे  व्याकरण आणि शब्दाची मांडणी व्यवस्थित करून आपले मत व्यक्त करता आले पाहिजे. 
  • सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला भारत आणि जगातील ताज्या घडामोडी ची माहिती ठेवावी लागते.सामान्य ज्ञानाच्या अत्याधुनिक पुस्तकांमधून तुम्हाला सामान्य ज्ञानाची माहिती मिळू शकते.
  • वृत्तपत्र वाचणे आणि नियमितपणे बातमी पाहण्यासाठी,गणित,इतिहास,भूगोल,राज्यशास्र यासारख्या  विषयावर अभ्यास करावा लागतो. 
  • कॉमन लॉ टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळणे अपेक्षित असते. 
  • वकील होण्यासाठी कायदेशीर पात्रता पूर्ण करव्या लागतात. 
  • वकील होण्यासाठी तुमच्याकडे कायदा समजून घेण्याची आणि समस्या निवारण करण्याची क्षमता असली पाहिजे.  प्रश्न समजून घेतल्यानंतर तार्किक निष्कर्ष काढण्याची क्षमता असावी लागते.
  • तुमच्याकडे शक्य तितके कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करण्याची क्षमता आणि आवड असणे गरजेचे असते. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने