श्रावण महिना: माहिती, वैशिष्ट्ये, अध्यात्मिक महत्व.
श्रावण महिना हा आषाढ महिन्याची आषाढी अमावास्या/दर्श अमावास्या संपताच सुरु होतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांग व भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना असतो.या पाचव्या महिन्यात चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्याने या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे.
![]() |
श्रावण महिना |
श्रावण महिना मराठी माहिती,श्रावण महिन्याचे वैशिष्ट्ये.
श्रावण महिना सुरु होतच, दीपपूजन केले जाते.श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो.हा महिना इंग्रजी महिना जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो.श्रावण महिना पावसाळा ऋतू मध्ये येतो.शाळेत सुद्धा श्रावण महिना मराठी निबंध लिहिण्यासाठी सांगितला जातो.म्हणून आपण श्रावण महिना माहिती मराठी मध्ये घेणार आहोत.
Join : Whats App Channel
श्रावण महिना हा मराठी महिन्यांपैकी एक महत्वाचा महिना समजला जातो.श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात.कारण हिंदू धर्मातील बरचसे स्रियांचे सन याच महिन्यात येतात.तसेच श्रावण महिन्यात हिंदू धर्मात विविध मंदिरे,धार्मिक स्थळे याठिकाणी सप्ताह,पूजापाठ,कीर्तने,उपवास केले जातात.
श्रावण महिना हा चातुर्मासाचा महिना असून हा महिना पवित्र महिना असतो.भगवान शंकराची आराधना,पूजा पाठ या महिन्यात केला जातो.
श्रावण महिन्याला हिंदू पुराणात विशेष अध्यात्मिक महत्व असून, श्रावण महिना पवित्र महिना समजला जातो.श्रावण महिना उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो.श्रावण महिन्यात सतत पावसाची रिमझिम सुरु असल्याने या महिन्यात निसर्गाचे एक अनोखे रूप पाहायला मिळत असते.
श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन व विविध रूपे:
श्रावण महिना हा पावसाळ्यातील महिना असल्याने सर्व ठिकाणी पाऊस पडून सर्वत्र रानावनात पाणवठे पाण्याने भरलेले असतात,माळराने,डोंगर,दऱ्या मध्ये पशु,पक्षी,यांना अन्न धान्याची उपलब्धता निर्माण झालेलं असल्याने सर्व ठिकाणी सुख,शांती,प्रसन्नता पसरलेली असते.
राने गवताने झाकून गेलेली असतात.त्यामुळे भूमातेने आपल्या अंगावर हिरवा शालू परिधान केल्यासारखे वाटते.मान प्रसन्न करणारे पाण्याचे प्रवाह पावसाने प्रवाहित झालेले असतात.निसर्गाचे मनमोहक रूप श्रावण महिन्यात सगळीकडे पाहायला मिळते.
श्रावण महिना हा क्षणात उन तर क्षणात पाउसाच्या सरीवर सरी कोसळत असतात,तर क्षणात उन पडते,असा निसर्गाचा उन पावसाचा खेळ आपल्याला श्रावणात पाहायला मिळत असतो.
श्रावण महिन्यातील या उन पावसाचे खेळ पाहून मनाला प्रसन्न वाटत असते.सप्तरंगी इंद्रधनुष्य आकाशात एक वेगळा देखावा निर्माण करत असते.या महिन्यात मोरांचे नाच पाहायला मिळतात,जणू पौसाचे कलेकले गर्द ढग मोराला नाचण्यासाठी आव्हान करताना दिसतात. रानात मोर आपला पिसाचा पिसोरा फुलवून थुई थुई नाचताना पाहताना जे दृश्य असते ते अविस्मरणीय असते.
श्रावण महिन्यात झाडे,वेली,गवत कुठे हिरवेगार,तर कुठे पोपटी,कुठे वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा पाहायला मिळत असतात.सर्व सृष्टीत नवचैतन्य निर्माण झालेले दिसते.
शेतकऱ्यांचे अनेक कामे शेतात पडलेली असतात,ते आपल्या कामात मग्न असतात,कारण शेतात सर्व पिके दिलाताना आपल्याला पाहायला मिळतात.शेतकर्याच्या चेहऱ्यावर त्यामुळे आनंद निर्माण झालेला असतो.पशु,पक्षी यांना सर्व ठिकाणी मुबलक अन्न उपलब्ध असल्याने ते सुखावलेले असतात.
श्रावण महिन्याचे अध्यात्मिक महत्व:
श्रावण महिना हा प्राचीन काळापासून एक अध्यात्मिक दृष्टीने महत्वाचा,आणि पवित्र महिना समजला जातो.तसेच श्रावण महिन्यात संपूर्ण महिना उपवास करण्याची प्रथा आहे.त्यालाच महारष्ट्रात श्रावण पाळणे असे म्हणतात.
श्रावणात सोमवार आणि शनिवार या दिवशी उपासाचे अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे.श्रावणी शनिवार आणि सोमवार या दिवशी उपवास केल्याने महादेव किवा भगवान शंकराची आराधना केल्याचे फायदे मिळतात.प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळावर भक्त मंडळींची गर्दी जमा होते.
श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर दुध,तूप,बेलाचे पाने फुले वाहून अभिषेक केल्यावर त्याचे पुण्य मिळते.असे सांगितले जाते.त्यामुळे भगवान शंकराचे व ज्याठिकाणी महादेवाची पिंड असेल त्या ठिकाणी श्रावण महिन्यात खूप गर्दी पाहायला मिळते.तसेच काही ठिकाणी यात्रा भरतात.
श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत.श्रावण महिन्यात हिंदू धर्मात पवित्र आणि देवाची आराधना करण्याचा महिना असल्याने मांसाहार वर्ज्य असतो,तसेच महाराष्ट्रात पुरुष मंडळी डोक्याचे केस,दाढी करत नाहीत.पायात चप्पल परिधान करत नाहीत.त्यालाच श्रावण पाळला असे म्हटले जाते. या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त वेळ देवाचे नामस्मरण आणि आराधना करण्यात घातला जातो.
श्रावण महिन्यातील सणाची माहिती:
श्रावण महिन्यात नागपंचमी चा सन,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,मंगळागौरी,बैलपोळा असे सन येतात.हे सर्व सन हिंदू महिलांचे सन म्हणून ओळखले जातात.या श्रावण महिन्यात त्यामुळे महिला आनंदी आणि प्रसन्न असतात.
नागपंचमी चा सणाला नागाच्या पूजेबरोबरच,झोके खेळायाला मिळतात.मंगलगौरी व नागपंचमीच्या सणाला विशेष महत्व आहे.या सणाला मंगळागौरी चे स्वागत अरुण महिला फुगडी,झिम्मा,फेर,टिपऱ्या,असे विविध खेळ खेळतात.महाराष्ट्रात या महिन्यातील सणाला खूप महत्व असते.
श्रावण महिन्यातील सणाला महिला नवीन अलंकार परिधान करतात,नवीन नवीन वस्रे परिधान करतात, देवाची पूजा पाठ करतात.या महिन्यात घरात वेगवेगळे गोड धोड पदार्थ केले जातात.
श्रावण महिन्यातील उपवास करण्याचे शास्रीय महत्व आणि फायदे:
Shravan Mahina Upvas In Mrathi - श्रावण महिन्यात पाऊस पडत असतो.अशा वेळी अनेक साठीचे आजार पसरण्याची शक्यता असते.कारण या दिवसात वातावरणात आद्रता जास्त असल्याने दमटपणा असतो.पचनक्रिया मंदावलेली असते,जड अन्न खाल्यास पचत नाहीत. तसेच या दिवसात आजारी असणाऱ्या लोकांचा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते.म्हणून आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
या दिवसात हलके अन्नपदार्थ आहारात समावेश केल्याने फायद्याचे ठरते,तसेच अनेक जन मांसाहार वर्ज्य करतात. अनेक जन उपवास करतात.त्यामुळे आजारी पडत नाहीत.वातावरणातील बदलामुळे सहारावन महिन्यात अनेक खाण्यापिण्याचे पथ्य पाळले जातात.ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतात.
Join : Whats App Channel