Firefly Meaning in Marathi, Firefly a natural source of light.

काजवा (Firefly) मराठी माहिती.

फायरफ्लाय (काजवा) इन्फॉर्मेशन इन मराठी
फायरफ्लाय (काजवा)

काजवा (Firefly) हा एक रात्री प्रकाश निर्माण करणारा कीटक (Firefly a natural source of light) असून त्याला  इंग्रजीत त्याला Firefly असे म्हणतात.हा भुंग्याच्या जातीतील कीटक असून तो निशाचर आहे. 

🔰काजव्याचे वैशिष्ट्ये  

फायरफ्लाय (काजवा) अंटार्टिका खंड वगळता इतर जगभरात आढळून येतो.काजव्याच्या 2000 पेक्षा जास्त जाती आढळून येतात.काजव्याचा रंग काळसर,तांबडा,पिवळसर असून तो उंच गवतात,ओलसर जागेवर आढळून येतो.

फायरफ्लाय (काजवा) संध्याकाळ झाली कि आपला प्रकाश दाखवायला सुरुवात करतो.काजवे रात्री अधूनमधून चमकतात.काजवे हे इतर कीटक खातात.काजवे दिवसा गवतात लपून बसतात.तसेच मादीची हालचाल मंद असते. 

फायरफ्लाय (काजवा) या कीटक वर्गात मादीचे डोळे पूर्ण विकसित नसतात,परंतु नर जातीचे डोळे पूर्ण विकसित झालेले असतात. 

फायरफ्लाय (काजवा) का चमकतात तर काजवे आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी प्रकाश निर्माण करतात.प्रजनन काळात नर मादी ळा एकत्र आणण्यात प्रकाशाची मदत होते,प्रजनन संपल्यावर नर मरतात. मादी अळीसारखी असते. ती दमट ठिकाणी अंडी घालते.

काजव्याचा प्रकाशाचा कलर नीळा,पांढरा,तांबडा ,पिवळा असतो. काजव्याच्या उदराचे आवरण काचेप्रमाणे असते.

काजव्याच्या प्रकाशपेशी मध्ये ल्युसिफेरीन नावाचे केमिकल असते. ऑक्सीजन बरोबर संयोग झाल्यावर प्रकाश पडतो.त्यामुळे काजवे चमकताना दिसतात.

फायरफ्लाय (काजवा) साधारण 5 ते ३० दिवस प्रौढावस्थेत असतात.प्रौधावास्तेत असताना त्यांना अन्न कमी लागते.

काजवे शक्यतो खेड्यात शहराच्या तुलनेत जास्त  दिसून येतात,कारण खेड्यात गवत जास्त प्रमाणात असते.

🔰फायरफ्लाय (काजवा) महोत्सव.

फायरफ्लाय (काजवा) इन्फॉर्मेशन इन मराठी
काजवा महोत्सव 
काजव्याचा देखील एक महोत्सव साजरा करण्यात येतो.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे काजवा महोत्सव मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. 

भंडारदरा अभयारण्य याठिकाणी देशभरातून पर्यटक काजवा महोत्सव पाहण्यासाठी येतात.तेथे खूप मोठ्या प्रमाणात काजवे असून त्यांच्या प्रकाशाने काळी कुट्ट रात्र प्रकाशमय होते,ते निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे येतात. 

काजव्याविषयी जनजागृती व्हावी,तसेच कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे काजवा ही जात संपुष्टात येते की काय याची भीती निर्माण होत चालली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने