नाणेघाट माहिती मराठी।नाणेघाट ट्रेकिंग पोइंट।नाणेघाट धबधबा प्रेक्षणीय स्थळ.

प्रसिद्ध धबधबा: नाणेघाट धबधबा.

नाणेघाट माहिती मराठी।नाणेघाट ट्रेकिंग पोइंट।नाणेघाट धबधबा
नाणेघाट माहिती मराठी

नाणेघाट प्रेक्षणीय स्थळाविषयी माहिती मराठी.

इसवी सन पूर्व 250 साली सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पहिल्या शतकात संपूर्ण डोंगर फोडून देश आणि कोकण यांना यांना जोडण्यासाठी जो मार्ग तयार करण्यात आला,त्याच मार्गाला नाणेघाट असे म्हणतात.नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जात असे.

नाणेघाटाविषयी ऐतिहासिक माहिती व महत्व.

मौर्य राजाच्या अस्तानंतर सातवाहन राज्याच्या काळात हा घाट तयार करण्यात आला.हा भाग पुणे जिल्ह्यातील जुन्नर या सध्याच्या तालुक्यात कोकणच्या बाजूला आहे.हा नाणेघाट सातवाहन वंशाची राणी नागनिका च्या काळात तयार करण्यात आला.

कल्याण पासून नाणेघाट 40 मैल आहे.तर जुन्नर पासून 20 मैल आहे.तर पुण्यापासून 90 कि.मी. आहे. नाणेघाट ची लांबी 3 मैल आहे.तसेच सातवाहन काळात जुन्नर येथील प्रसिद्ध प्राचीन घाट म्हणून नाणेघाट ओळखला जातो.

नाणेघाट तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे व्यापार करणे होय.व्यापाऱ्यांसाठी हा एकच मार्ग होता.नाणेघाट ला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.नाणेघाट या ठिकाणी लेणी असून या लेणीत शिलालेख कोरलेले आहेत. 

सातवाहन काळात पैठण म्हणजे त्यावेळी प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती.एका बाजूला लढाई करणे आणि दुसऱ्या बाजूला व्यापार व उद्योगधंदा वाढवणे हा त्यांचा उद्देश होता. 

त्यामुळे नाणेघाट लेणीत सापडलेला शिलालेख ब्राम्ही लिपीत कोरलेला आहे.

शिक,पैठण,जुन्नर शहरे भरभराटीला आली.सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा मुख्य मार्ग समजला जात असे.

नाणेघाटाविषयी अनेक दंत कथा सांगितल्या जातात.नाना नावाच्या ठेकेदाराने या घाटाचे काम पूर्ण केले म्हणून या घाटाला नाणेघाट नाव पडले असेही सांगितले जाते.

हा घाट जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.जुन्नर ते मुरबाड रस्ता या घाटातून जातो.जीवधन किल्ल्यावरून या नाणेघाट वर नियंत्रण ठेवता येत होते.

नाणेघाट या ठिकाणी असणार्या गुहेत सातवाहन वंशजांचे पुतळे आहेत,तसेच घाटाच्या पायथ्याशी वैशाखखेडे गाव आहे.हे गाव व्यापारी व त्यांचे नोकर यांच्या सोयीसाठी तयार केलेले होते.

नाणेघाटात रांजण असून ते दगडी रांजण जकातीसाठी वापरले जायचे,टोल आकारण्याची जुनी पद्धत यावरून दिसून येते.

नाणेघाट मार्गाने रोम वरून येणारा माल सोपारा या ठिकाणी उतरवला जात असे,सोपारा आणि कल्याण हि सातवाहन काळातील व्यापारी शहरे म्हणून प्रसिद्ध होते.सोपारा या ठिकाणाहून कल्याण-नेवासा मार्गे पैठण या सातवाहनाच्या राजधानीपर्यंत माल पोहोच होत असे.

नाणेघाटात दगडातील कोरीव लेणी आढळून येते.तसेच गणेशमूर्ती,महादेवाची पिंड,हनुमान मूर्ती,घाटातील गुहा,प्राचीन शिलालेख,जकातीचे पैसे साठवण्याचे रांजण,पाणी साठवण्यासाठी खडकात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या,इ गोष्टी आढळून येतात.

Trekking Point: नाणेघाट धबधबा.

नाणेघाट धबधबा उलटा वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे,कारण पाणी खाली कोसळताना वाऱ्यामुळे हे पाणी परत उलटे वाहताना दिसते.त्यामुळे नाणेघाट धबधबा उलटा वाहतो कि काय असा भास होतो. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे हे दृश्य निर्माण होते. 

नाणेघाटात प्रसिद्ध धबधबा असून हा निसर्गाची अनुभूती देणारा धबधबा समजला जातो. पावसाळ्यात नाणेघाट पाहण्यासाठी खूप पर्यटक जातात.हा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. कारण पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे हा धबधबा प्रवाहित होतो.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने