इन्फॉर्मेशन अबाऊट द्रौपदी मुर्मू।Draupadi Murmu Marathi Information .
![]() |
द्रौपदी मुर्मू |
द्रौपदी मुर्मू बायोग्राफी इन मराठी.
भारताचे 2022 पासून नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या असून त्यांची माहिती आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.तर भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या असून द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत,आपल्याला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती माहिती असतीलच,तर पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या होत्या.
भारताच्या 15 व्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहेत,तर व्यक्तीमध्ये 16 व्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जातात.कारण डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी सलग दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले असल्याने व्यक्तींचा विचार करता द्रौपदी मुर्मू या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जातात.
- द्रौपदी मुर्मू यांचा जन्म- मयूरभंज ,ओरिसा ,भारत.
- द्रौपदी मुर्मू यांच्या वडिलांचे नाव -बिरांची नारायण टुडू.
- पती-श्याम चरण मुर्मू.
- द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण - बी ए ( BA ).
द्रौपदी मुर्मू यांना एनडीएने भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून सादर केले आहे. द्रौपदी मुर्मूचा जन्म 1958 मध्ये भारतातील ओरिसा राज्यातील मयूरभंज भागातील आदिवासी कुटुंबात 20 जून रोजी झाला होता.
द्रौपदी मुर्म या झारखंडच्या 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.द्रौपदी मुर्मू यांनी राज्यमंत्री म्हणून ओडिसा राज्याचा दोन वेळा पदभार स्वीकारला, तसेच द्रौपदी मुर्मू या ओडीसा विधानसभा वर आमदार म्हणून रायनपुर मतदार संघातून निवडून आल्या होत्या. द्रौपदी मुर्म यांचे शिक्षण रमादेवी महिलादेवी विद्यापीठ मधून त्यांनी बीए ही पदवी शिक्षण पूर्ण केल.
आदिवासी कुटुंबात, ( समाजातील ) आणि ओरिसा राज्यात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मूची नुकतीच भारतीय जनता पक्षाने भारताच्या पुढील म्हणजेच जुलै 2022 पासून राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्यामुळेच द्रौपदी मुर्मू आजकाल इंटरनेटवर चर्चेत आहे.
बी ए चे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ओडिशा सरकारमध्ये विद्युत विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. 1979 ते1989 पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. त्यानंतर 1994 मध्ये त्यांनी रायरंगपूर येथील अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले. 1997 पर्यंत त्यांनी हे काम केले.
झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला राज्यपाल आहेत.सन 2002 ते 2004 या काळात ओरिसा सरकारचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय खातेही सांभाळले आहे.
सन 2002 ते 2009 पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.सन २००६ ते २००९ या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एसटी मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवले.
एसटी मोर्चासोबतच ते सन 2013 ते सन 2015 या काळात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होत्या.
सन 2015 मध्ये त्यांना झारखंडचे राज्यपालपद 2021 पदावर राहिल्या.द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा विधानसभेने सन 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीलकंठ पुरस्कार त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.