Mission Zero Dropout 2022।शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!
Mission Zero Dropout म्हणजे काय ? तर,शाळाबाह्य,अनियमित व स्थलांतरीत मुलांसाठी सर्वेक्षण गाव,वाडी वस्ती स्तरावर सर्वेक्षण करून त्यांना शाळेच्या,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे होय. हा नुकताच शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कधी आणि कोठे करण्यात येणार आहे.
1 एप्रिल 2010 पासून बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 राज्यात लागू करण्यात आलेला आहे. यामध्ये 6 ते 14 वर्षे वयोगट असलेले सर्व बालकांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे.
6 ते 18 वर्षे वयोगट असलेले सर्व मुले शाळेच्या, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहावे,तसेच कोणीही सर्वसामान्य अथवा दिव्यांग मुले शिक्षणापासून वंचित अथवा शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. त्यातीलच महत्वाचा उपक्रम म्हणजे "Mission Zero Dropout" होय. यामध्ये 6 ते 18 वर्षे वयोगट असलेले सर्व मुले शाळेच्या पटावर नोंदवले जावे हा उद्देश आहे.
🔰शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण का करण्यात येणार ?
मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते. यात प्रामुख्याने शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरीत झालेले कुटुंब तसेच रोजगारासाठी स्थलांतरीत कुटुंब ,शेतमजूर ,उसतोडणी कामगार,वीटभट्टी कामगार,बांधकाम व्यावसायिक,जिनिंगमिल,कोळसाखाण,दगडखाण कामगार,अशा स्थलांतरीत कुटुंबातील बालके यांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबू नये.
तसेच ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करून घेण्याचे काम या मधून केले जाणार आहे.मग यामध्ये दिव्यांग मुलांचा देखील समावेश असून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
🔰शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कधी आणि कोठे करण्यात येणार आहे
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण म्हणजे "Mission Zero Dropout" हा कार्यक्रम 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
Mission Zero Dropout कार्यक्रम प्रत्येक घरोघरी,खेडी,गाव,वाडी,वस्ती,शहरे,रेल्वेस्टेशन,बसस्थानक,वीटभट्टी परिसर,दगडखाणी,साखर कारखाने,बाजारतळ, मोठे मॉल,हॉटेल,अशा ठिकाणी शाळाबाह्य ,कामगार बालके,तसेच दिव्यांग मुले यांचे सर्वेक्षण करून त्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची माहिती व माहितीचे संकलन करण्यासाठी शासनाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे,त्यात प्रपत्र अ,ब,क,ड विकसित करण्यात आलेले आहे. "Mission Zero Dropout" या शासनच्या शैक्षणिक कार्यक्रमात महसूल,ग्रामविकास,नगरविकास,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,महिला व बालकल्याण विभाग,कामगार विभाग,आदिवासी विकास,अल्पसंख्यांक विकास तसेच सार्वजनिक आरोग्य गृह विभाग यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सहभागी करून हे मिशन राबवण्यास मान्यता दिली गेली आहे.
🔰Mission Zero Dropout शासनाचे परिपत्रक
शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी अ,ब,क,ड प्रपत्र खालील परिपत्रकात दिलेले आहे,तसेच Mission Zero Dropout ची कार्यपद्धती कशी असेल याची माहिती त्यात समाविष्ट करण्यात आलेली आहे.