शिलालेख कशाला म्हणतात?
शिलालेख : आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यासाठी जातो. वेगवेगळी किल्ले,लेण्या,मंदिरे,अथवा शहरे त्याठिकाणी आपल्याला अनेक जुनी दगडावर कोरलेले अक्षरे,वाक्ये,किंवा चित्रे आढळून येतात.शिलालेख म्हणजे काय
Table Of Content :
शिलालेख म्हणजे काय?
दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेल्या लेखी मजकूराला शिलालेख असे म्हणतात.
अशा वेळी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, पूर्वी हे दगडावर का लिहिले असेल? तसेच यामध्ये काय लिहिले आहे? त्यावेळी कोणती भाषा वापरली जात होती? दगडावर लिहून ठेवण्याचा उद्देश काय असेल? दगडावर लिहून ठेवले जात होते त्याला काय म्हणतात?
तर आपण शिलालेख म्हणजे काय आणि शिलालेखाचे वैशिष्टे याविषयी माहिती घेऊया.
भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यात शिलालेख आढळून आलेले आहेत. सर्वात जास्त शिलालेख हे ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेण्यात सापडतात.
ठाणे जिल्ह्यातील सापोरा या ठिकाणी तसेच विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात देवटेक येथे मौर्य अशोकाचे शिलालेख सापडले असून हे सर्वात प्राचीन शिलालेख आहेत असे सांगितले जाते. मगध राज्याचा सम्राट अशोक यांचे अनेक शिलालेख प्रसिद्ध आहेत.
शिलालेखाचे वैशिष्ट्ये:
पूर्वीच्या काळात काही महत्वाची माहिती अथवा मजकूर जास्त काळ टिकून राहावा यासाठी शिलालेख लिहिले जात होते.पुरातत्व शास्रात या शिलालेखाला पुराभिलेख असे म्हणतात.
ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने शिलालेख खूप उपयोगी पडतात.
शिलालेखातील व्यक्तींच्या नावावरून,अक्षराच्या वळणावरून,लिपीवरून त्या शिलालेखाचा काळ ठरवता येतो.
शिलालेख हे इतिहासाच्या अभ्यासाचे एक महत्वाचे साधन म्हणून ओळखले जाते.
शिलालेखामुळे ऐतिहासिक घटनाचा मागोवा घेण्यात येतो.
शिलालेखामुळे प्राचीन संस्कृती,धार्मिक,सामाजिक,माहिती मिळते.
भारतात आढळून येणारे शिलालेख.
2.कान्हेरी लेणी चे शिलालेख.
3.हाथीगुंफा वरील शिलालेख.
4.जुनागड शिलालेख.
5.हलमीदी शिलालेख.
6.कलिंग शिलालेख.
7.मस्की शिलालेख.
8.नाणेघाट शिलालेख.
9.नाशिक मधील शिलालेख.
10.कलसी शिलालेख.
इत्यादी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे शिलालेख आढळून येतात.
आमचे Whats App ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
पदभरती,नोकरी जाहिरात | क्लिक करा |
सरकारी योजना | क्लिक करा | वाचन मित्र | क्लिक करा |