लता मंगेशकर यांची मराठी माहिती.
![]() |
लता मंगेशकर बायोग्राफी मराठी |
भारताची गानकोकिळा ,भारतरत्न लता मंगेशकर यांची संपूर्ण जगभर एक प्रसिद्ध भारतीय गायिका म्हणून ओळख आहे. लता मंगेशकर यांचा आवाज अद्वितीय आणि जगातील सर्वोत्तम आवाजाच्या मानकरी म्हणून ओळखल्या जातात.
सात दशकांपासून आपली संगीत विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी गायिका समजली जाते. लता मंगेशकर यांना लता दीदी या टोपणनावाने ओळखले जाते.भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये एक हजार पेक्षा जास्त चित्रपट मध्ये गायन केले होते.
- लता मंगेशकर यांचा जन्म - 28 सेप्टेंबर 1929 ,इंदौर ,मध्यप्रदेश ( भारत )
- आईचे नाव -शेवंती मंगेशकर
- वडिलांचे नाव - दीनानाथ मंगेशकर
- भाऊ - हृदयनाथ मंगेशकर
- बहिण - उषा मंगेशकर,अशा भोसले,मीना खडीकर
- आवड - सायकल चालवणे,क्रिकेट पाहणे
- कार्य - भारतीय संगीतामध्ये पार्श्व गायिका
- मृत्यू - 6 फेब्रुवारी 2022 ,मुंबई येथे झाला.
लता मंगेशकर यांच्या करिअर ची सुरवात.
लता मंगेशकर यांनी आपल्या करिअर ची आपल्या वडिलांसोबत एक नाटकामध्ये सहभागी होऊन 5 वर्षाच्या असतानाच केली होती. त्यानंतर त्यांनी आपला सराव सुरु केला. लता मंगेशकर १३ वर्षाच्या असताना त्यांनी एका सिनेमासाठी गाणे गायले होते.
त्यांनी गायलेले गाणी काही करणामुळे सिनेमातून रद्द करण्यात आले,त्यामुळे लता मंगेशकर खूप नाराज झाल्या होत्या. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.काही आजारीपणामुळे त्यांचे वडिलांचे निधन झाले. लता दीदी या आपल्या सर्व भावांडापैकी मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांचे पहिले गाणे मराठी चित्रपटात 1943 मध्ये गायले गेले.
लता मंगेशकर या मुंबईत आल्यावर त्यांनी 1947 मध्ये "आप कि सेवा में" या चित्रपटात देखील गाणे गायले. १९४९ मध्ये लता मंगेशकर यांनी सलग चार सिनेमात आपले गाणे गायले आणि आपली हिंदी चित्रपट सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. बरसात,दुलारी,अंदाज,महल असे चित्रपटात गायन करून महल चित्रपटातील गाणे प्रसिद्ध झाले.
- लता मंगेशकर यांना कोणते पुरस्कार मिळाले.
- पद्मभूषण -1969
- दादासाहेब फाळके पुरस्कार -1989
- पद्मभूषण - 1999
- भारतरत्न - 2001
- फिल्म फेअर अवार्ड- 6 वेळा मिळाला
यासोबत त्यांना त्यांच्याजीवनात असे अनेक पुरस्कार देऊन भारत सरकार कडून सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण,महाराष्ट्र रत्न हे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. अनेक गोल्ड्मिडल आणि अनेक बक्षिसे त्यांना मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी जवळजवळ जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्माते आणि निर्देशक व कलाकार यांच्या सोबत काम केलेले आहे.
लता मंगेशकर यांनी 1960 मध्ये एका मागून एकच चार चित्रपटांना गायन केले होते.त्यामध्ये मुगल ए आजम, दिल अपना प्रित पराई,गाईड, ज्वेल थीप या चित्रपटामध्ये गायन केले गेलेले गाणे खूप प्रसिद्ध झाले.आजही हे गाणे खूप प्रसिद्ध आहेत.लता दीदींनी असे अनेक हिट गाणे देऊन प्रसिध्दी मिळवली.जगभरात भारतीय गायिका म्हणून देशाचे स्थान उंचावले.देशभक्ती पर 'ये मेरे वतन के लोगो..' हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे.
लता मंगेशकर यांचा मृत्यू.
लता मंगेशकर यांना श्वास घेण्याला त्रास होऊ लागला.म्हणून मुंबई येथील ब्रीच क्यांडी येथे उपचारासाठी दाखल केले परंतु वय खूप झाले होते,शरीराने त्यांना साथ दिली नाही , 6 फेब्रुवारी 2022 रोजी उपचारादम्यान लता मंगेशकर यांचा मृत्यू झाला.
लता दीदींनी आपल्या गाण्यातून जगात वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या गाण्यामुळे त्या अमर झालेल्या आहेत.आजही जगभरात त्यांच्या गाण्याला प्रसिध्दी मिळत आहे.त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी खूप मोठे समाजकार्य केलेले असून.त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम.