मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे काय?
![]() |
मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे काय |
मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे काय?
मेडिकल सर्टिफिकेट Medical Certificate कसे काढावे?
Medical Certificate काढण्यासाठी तुम्हाला सबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र डॉक्टर यांना लेखी अर्ज करावा लागेल,त्यात तुम्हाला मेडिकल प्रमाणपत्र कशासाठी व कोठे वापरायचे याची माहिती द्यावी लागेल.
मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासाठी शक्यतो सरकारी दवाखान्यातील मेडिकल ऑफिसर किंवा एम बी बी एस डॉक्टर यांच्याकडून काढावे.कारण हे दोघेही मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असतात.
Medical Certificate काढण्यासाठी तुम्हाला सबंधित पात्र डॉक्टर यांच्याकडून तुमची आरोग्याची तपासणी केली जाईल,तुम्हाला असणाऱ्या आजार किंवा होणार्या त्रासाविषयी सर्व उल्लेख प्रमाणपत्रात नोंद करून त्याचा वापर कुठे व कशासाठी करावयाचा याची माहिती घेऊन डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट देतील.
मेडिकल सर्टिफिकेट ज्या तारखेला दिले जाते त्या दिवसाची तारीख त्या ठिकाणी नमूद केली जाते.
मेडिकल सर्टिफिकेट Medical Certificate चा वापर,उद्देश,महत्व.
- नोकरीच्याठिकाणी तसेच प्रवासात बऱ्याच वेळा आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट ची गरज पडते.
- मेडिकल सर्टिफिकेट च्या मदतीने तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी रजा मिळत नसेल तर ती प्रमाणपत्र सादर करून मिळवता येते.
- आपल्याला विश्रांती घेण्याची गरज असेल तेव्हा तुम्ही हे प्रमाणपत्र सादर करून सुट्टी घेऊ शकता.
- मेडिकल सर्टिफिकेट बऱ्याच वेळा दीर्घ मुदतीच्या रजेवर जाण्यासाठी Medical Certificate सादर करावे लागते.
- Medical Certificate हे नेव्ही किंवा आर्मी मध्ये बऱ्याच दिवस सुट्टीवरून परत कामाच्या ठिकाणी हजर होताना द्यावे लागते.
- सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेताना,किंवा सरकारी योजना मध्ये लाभार्थी असाल त्या त्या वेळी Medical Certificate मागितले जाते.
- एखाद्या महाविद्यालयात देखील मेडिकल सर्टिफिकेट मागितले जाते.
- एखाद्या व्यक्तीला परदेशात प्रवास करण्यासाठी जायचे असेल अशा वेळी मेडिकल सर्टिफिकेट ची आवश्यकता पडते.
- सरकारी अथवा खाजगी नोकरीच्या ठिकाणी हजर होताना हे प्रमाणपत्र मागितले जाते.