मोफत गणवेश योजना : राज्यातील सर्व मुलांना आता गणवेशासोबत मिळणार बूट आणि पायमोजे मोफत..
मोफत गणवेश योजना : शालेय शिक्षण विभागाने आता 6 जुलै 2023 रोजी झालेल्या शासन निर्णयात आता सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि त्यासोबत बूट व पायमोजे देण्यासाठी मंजुरी दिली आहे.
आता सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासोबत बूट आणि पायमोजे मिळणार मोफत
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान या महत्वाच्या उपक्रमांतर्गत मोफत गणवेश योजना हा एक महत्वाचा उपक्रम असून या गणवेश योजनेतून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्था च्या शाळा मध्ये 1 ली ते 8 वी च्या सर्व मुली,अनुसूचित जाती आणि जमातीचे सर्व मुले यासोबत दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.
सध्या उपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ मिळत नाही. सदर विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच , मोफत गणवेश योजनेतून सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि दोन जोडे पायमोजे यांचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.
त्यामुळे शासन निर्णयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये 1 ली ते 8 वी च्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना दरवर्षी दोन मोफत गणवेशाचा लाभ देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील १ ली ते ८ वी तील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
हा लाभ चालू शैक्षणिक वर्ष २०२३ २४ पासून द्यायचा असल्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय वाचन करावा. पुढील शैक्षणिक वर्षात यासाठी नवीन लेखाशीर्ष मान्यता देण्यात येणार आहे. मोफत गणवेश योजना शासन निर्णय खालील प्रमाणे आहे. (एका राज्य एका गणवेश योजना)