मल्टीटास्किंग म्हणजे काय? मल्टीटास्किंगचे फायदे, तोटे..

मल्टीटास्किंग।Multitasking म्हणजे काय? मल्टीटास्किंगचे फायदे तोटे..


मल्टीटास्किंग म्हणजे काय? मल्टीटास्किंगचे फायदे, तोटे..

Multitasking Work म्हणजे काय?

 
Multitasking work म्हणजे एकमेकांशी संबंधित असलेली किंवा नसलेली दोन अथवा अधिक कामे एकाच वेळेस करणे.
 

काही महत्त्वकांक्षी व्यक्ती एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या जबाबदारी घेत असतात.त्या साऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या डेटलाइन एकाच वेळेस असतात. अशावेळी या व्यक्ती विविध कामात इतक्या वाकबगार असतात. की एक काम करत असताना त्यांना त्याच वेळेस दुसरे काम करायचे असते,इतर कामाचा विसर बिलकुल पडत नाही.



एकाच वेळी अनेक कामे (मल्टीटास्किंग) करण्याचे फायदे.


Multitasking work वेळ वाचवते.

Multitasking work तुम्हाला एकाच वे अनेक कामे पूर्ण करण्यास अनुमती देते.त्यामुळे यावेळी वेळ वाचण्यास मदत होते.उदाहरणार्थ तुळीम्ही एखाद्या व्यक्तीशी फोनवर संपर्क करून बोलत असाल तर अशा वेळी तुमच्या हातामध्ये एखादी क्युमेंटरी ची फाईल असेल अशा वेळेडॉस त्या डॉक्युमेंटरी च्या फाईल तुम्ही स्वाक्षऱ्या करणे शिक्के मारणे किंवा फाईल चाळून पाहणे इत्यादी कामे करू शकतात. 


Multitasking work ची सवय असेल तर कामामध्ये लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी त्रास म्हणून न बघता हिशोब करताना किंवा एखाद्या अशी महत्त्वाची चर्चा करताना दुसरा महत्त्वाचा कामाचा फोन घ्यावा लागण. या कौशल्याने एखादं काम एखाद्या टप्प्यावर रेंगाळत असेल तर दुसरे काम सुरू करून मधला वाट पाहण्याचा वेळ वाचतो.दोन्ही कामात प्रगती होत जाते. 


ही सर्व कामं एकाच वेळेस पूर्ण होतात.काम करताना सभोवताली गोंधळाचं वातावरण असेल,आजूबाजूला तुम्हाला त्रास होईल, अशी स्थिती निर्माण झाली असेल तरी तुम्ही तुमची काम सुरळीत आणि यशस्वी करण्याची क्षमता दाखवू शकता. 


एकाच वेळेस अनेक कामांची डेडलाईन उपस्थित होते. तेव्हा एक काम केल्यास तुम्ही वेळ जास्त घेतात. अशा वेळी मल्टिटास्किंग कौशल्य असल्यास ती सर्व कामे तुम्ही ती डेड लाईन पळून पूर्ण करू शकता.


Multitasking Work ने पैसे वाचतात.

एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या मल्टिटास्किंग क्षमता असलेल्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवले तर अधिक कर्मचारी कामावर ठेवणे आवश्यक नसतात आणि त्यांना पगार देण्याची गरज पडत नाही म्हणून एखादा चांगला      मल्टिटास्किंग कामे करणारा कर्मचारी ऑफिसमध्ये कामावर ठेवल्यावर आपल्याला तेवढ्याच पगारामध्ये र्मचार्‍यांकडून काम करून घेता येते.


मल्टिटास्किंगने उत्पादकता वाढते.

कमी वेळेत जास्त काम होते.त्यामुळे उत्पादकता वाढते.तुम्ही दिवसभरात जेवढे जास्त काम कराल तेवढे तुमचे उत्पादन क्षमता जास्त असेल.

मल्टिटास्किंगने विलंब कमी करते.

मल्टिटास्किंग लोकांना अधिक सिद्धी अनुभवण्यास मदत करते कारण ते एका वेळी एकापेक्षा जास्त कार्य पूर्ण करू शकतात. उत्पादकतेची ही भावना प्रेरणा वाढते आणि लोकांना त्यांचे कार्य करत राहण्याचा प्रोत्साहित करते .

मल्टिटास्किंगने कामाचे नियोजन केल्यास अधिक फायदा.

मल्टिटास्किंग पद्धतीने कामे करताना प्रथम कामाची यादी बनवणे त्यानंतर महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे तसेच आपण करत असलेल्या कामाचं प्रगतीचे निरीक्षण करून कामे पार पाडणे वेळेचे नियोजन करून कामे पूर्ण केल्यास मल्टिटास्किंग पद्धतीने कामे करण्याचे खुप फायदे आहेत.


मल्टिटास्किंग करण्याचे काही तोटे.

  • मल्टिटास्किंग कामात कमालीची एकाग्रता लागते.मल्टिटास्किंगने कामे केल्यास मन लागत नाही थकवा आल्यासारखे होते. 
  • अशी एकापेक्षा जास्त कामे एकाच वेळेस करायला गेल्यास सर्व कामांचा दर्जा कमी होतो. 
  • तुमची विशेष कौशल्य कोणत्या कामात दिसून येत नाही.
  • ठरलेल्या अनेक कामं त्या त्या कामाला द्यायच्या वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळावे लागते. 
  • मल्टिटास्किंग मध्ये सारी कामं उरकली जातात.दोन व्यक्तींमधले प्रत्यक्ष संपर्क साधनाचा वापर करून वेळ वाचला जातो.उदाहरणार्थ मीटिंग साठी किंवा कार्यक्रमाचा निरोप प्रत्यक्ष देण्याऐवजी ईमेल किंवा व्हाट्सअप ग्रुप मेसेज टाकून भागवल्या जातात. 
  • सहाजिकच या कामांमधील साघिक भावना कमी होते.मल्टिटास्किंग च्या नावाखाली एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊन आणि तेही काही धडपणे पूर्ण केले जात नाही आणि एकदा काम पुढे ढकलण्याची सवय लागते. 
  • मल्टिटास्किंग मध्ये निरनिराळी कामे एकाच वेळेस करताना मेंदूला शीण येण्याची शक्यता असते.त्यामुळे निर्णय चुकला कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. 
  • कायम अनेक विधी कामात गुंतून राहण्यात मानसिक तणाव वाढून उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार यांचा त्रास होतो आणि आधीपासून ते असल्यास नक्कीच बळावू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने