कशी ठरवली जाते ग्रॅच्युइटी (Gratuity) रक्कम ? ग्रॅच्युइटी काढण्याचे सूत्र ..
Gratuity formula 2023 : ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी सरकारने कोणते प्रकारचे मानके ठरवले आहेत? याविषयी प्रत्येक कर्मचाऱ्यांना माहिती असायला हवी. कारण अनेकजण एखाद्या कंपनीमध्ये ठराविक कालावधीसाठी काम करत असतात. बरेच जण आपली नोकरी बदलत असतात. बहुतेक जणांना आपल्या ग्रॅच्युइटी मिळेल अशी अपेक्षा ठेवतात. परंतु ग्रॅच्युइटी कधी, कोणाला, कशी, केव्हा मिळते? याविषयी माहिती नसते. तर या पोस्ट मधून आपण ग्रॅच्युइटी म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
Table Of Content
Table Of Content(toc)
ग्रॅच्युइटी (Gratuity) म्हणजे कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीकडून नोकरी सोडताना देण्यात येणारी रक्कम होय. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेतले जात नाही. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल म्हणून ही रक्कम दिली जाते.
ग्रॅच्युइटी विषयी महत्त्वाचे मुद्दे :
एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या भल्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले असेल, त्यात कंपनीचा फायदा झाला असेल, सलग पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कंपनीमध्ये काम केले असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी पात्र समजले जाते.
तसेच त्या बदल्यात कंपनी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सुरक्षित सेवा देते. ते एक प्रकारचे कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस समजले जाते. कधी कधी कर्मचाऱ्यांना किती ग्रॅच्युइटी मिळेल हे सूत्रानुसार ठरवले जाते.
कंपनीच्या इच्छेचा भाग म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. नियमानुसार ग्रॅच्युइटी वीस लाखापेक्षा जास्त नसावी. ग्रॅज्युएटी पाच वर्षानंतर नोकरी सोडल्यावर अथवा निवृत्तीनंतर दिली जाते.
ग्रॅच्युइटी पेमेंट कर्मचाऱ्याला त्याच्या नियमित नोकरी दरम्यान ऑफर केलेल्या लाभांशाच्या एक प्रकार असतो आणि तो त्याला निवृत्तीनंतर दिला जातो.
ग्रॅच्युइटीच्या गणनेच्या उद्देश लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या महिन्याच्या सरासरी मासिक पगाराचे पंधरा दिवस नियमित सेवानिवृत्ती कालावधीच्या आधारावर दिला दिले जातात. त्यासाठी कमाल रक्कम मर्यादित असून ती दहा लाख रुपये इतकी आहे.
ग्रॅच्युईटीचे सूत्र।gratuity formula in Marathi
(शेवटचा पगार) × (कंपनीत काम केल्याच्या वर्षाची संख्या) × (15/26)
यामध्ये शेवटचा पगार म्हणजे शेवटच्या दहा महिन्यांच्या पगाराची सरासरी, या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता व कमिशन यांचा समावेश असतो. याच आधारेने गणना केली जाते.
कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त वीस लाख रुपये पर्यंत ग्रॅच्युइटी देऊ शकते. म्हणून मिळणारे रक्कम करमुक्त असते. हे नियम सरकारी नोकऱ्या व खाजगी नोकरी दोन्हीसाठी लागू असतात.