जागतिक लोकसंख्या दिन मराठी निबंध
World Population Day 2023 : दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या समस्या याकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. 11 जुलै 1990 हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त देशात साजरा करण्यात आला होता.
सध्या लोकसंख्यावाढ हि जागतिक समस्या निर्माण झाली असून कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो. अनियंत्रित लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या डोके वर काढत आहेत. भारतासारख्या देशात बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे.
जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात कधी झाली?
जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिल ने 1989 मध्ये केली होती. जगाची लोकसंख्या 5 अब्जावर पोहचली होती त्यामुळे संयुक्त राष्ट्र यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांमध्ये कुटुंब नियोजन जनजागृती करण्याच्या हेतूने जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जाऊ लागला.
भारताची वाढती लोकसंख्या आणि वाढती बेकारी, बेरोजगारी हि भीती देशाला भेडसावत आहे. कारण भारताची 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ( जनगणना न झाल्याने निश्चित संख्या उपलब्ध नाही.) त्यामुळे देशासमोर काही आव्हाने निर्माण होत आहेत. त्यात संसाधनावर ताण येणे. पायाभूत सुविधा ,बेरोजगारी,दारिद्रय आणि विषमता,पर्यावरणाशी सबंधित आव्हाने निर्माण होत आहेत.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचे उदिष्ट्ये
मुले आणि मुली या दोन्ही तरुणांचे समान संरक्षण करणे.
तरुण तरुणींना आपल्या लैंगिक जबाबदाऱ्या काय आहेत हे समजावून सांगणे.संततीनियमन विषयी जनजागृती करणे आणि तसे साधने वापरणे तसेच परिपूर्ण शिक्षण देणे.
लैगिक संबंधातून संक्रमित होणारे आजार याविषयी माहिती देणे.
मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.
तसेच लोकसंख्या वाढीचे परिणाम देशाच्या विकासाला कसे बाधक ठरतात याविषयी जनजागृती निर्माण करणे आवश्यक असते.