सारथी (SARTHI Scholarship) कडून 'या' विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती, असा करा अर्ज..
SARTHI Scholarship 2023-24 : छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती (सारथी) ही इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी मधील नियमित शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. सारथी शिष्यवृत्ती छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संशोधन पुणे (सारथी पुणे) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेद्वारे विद्यार्थ्यांसाठी सन 2023 24 करिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
पात्र शाळा व संवर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्य द्वारे सारथी स्कॉलरशिपसाठी अर्ज दाखल करायचे असून या छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप 2023 24 विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मधून घेणार आहोत.
सारथी शिष्यवृत्ती 2023-24 अर्जप्रक्रिया सुरू..
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती ही इयत्ता नववी, दहावी आणि अकरावी मध्ये नियमित शिक्षण घेणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या गटातील विद्यार्थ्यांना दिली जाते.
या विद्यार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज भरून घेऊन सादर करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना सूचना जारी करण्यात आले असून सारथी पुणे संस्थेकडून वरील चार लक्षित गटातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते अकरावीपर्यंत प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्येक महिन्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
संबंधित शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना मुख्याध्यापकाची शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यायचा सूचना सोबत जोडण्याचे कागदपत्रे विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी परिपत्रक वाचन करून अर्ज सादर करणे सोयीचे ठरेल.
सारथी शिष्यवृत्ती चा उद्देश
छत्रपती राजाराम महाराज सारथी स्कॉलरशिप सुरू करण्यामागे महत्त्वाचा उद्देश म्हणजे मराठा,कुणबी, कुणबी -मराठा ,मराठा -कुणबी या समाजाच्या चार आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे हे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती चे मुख्य उद्देश आहे.
सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा कलावधी
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी हा 30 जुलै 2023 पर्यंत शाळा स्तरावर हार्ड कॉपी आणि ऑनलाईन लिंक भरून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक असेल.
तसेच 30 ऑगस्ट 2023 या दिनांक पर्यंत गटशिक्षणाधिकारी स्तरावर संबंधित अर्जाची छाननी आणि पडताळणी करून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक असेल.
शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सर्व अर्ज सारथी कार्यालयात 6 सप्टेंबर 2023 अखेर जमा करणे बंधनकारक असेल.
सारथी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
- सारथी स्कॉलरशिप साठी आवश्यक पात्रता खालील प्रमाणे असेल.
- विद्यार्थी इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गात शिकणारा असावा.
- विद्यार्थी मराठा, कुणबी कुणबी-मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातीलच असावा.
- राज्यामधील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे शाळेत विद्यार्थी प्रवेशित असावा.
- विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहित, ज्युनिअर कॉलेज, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वस्तीग्रह, किंवा सैनिकी शाळेतील विद्यार्थी अपात्र ठरवले जातील.
- NMMS ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त असलेल्या तसेच नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वरील लक्षित गटातील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती 2023 24 साठी पात्र ठरवण्यात येतील.
- एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यास सारथी शिष्यवृत्ती 2023 24 साठी घेण्यात येऊ नये.
- इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख 50 हजार पेक्षा कमी तर दहावी व अकरावी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी असाव.
- इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वरील लक्षित गटातील विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये किमान 55 टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
- इयत्ता अकरावी मध्ये शिकत असलेल्या वरील लक्षीत गटातील विद्यार्थी हा इयत्ता नववी मध्ये किमान 60 टक्के गुणांसह वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.
इयत्ता निहाय सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना आणि फॉर्म लिंक
सारथी शिष्यवृत्ती अर्ज करताना जोडवायची कागदपत्रे
- शिष्यवृत्तीसाठी विहित नमुन्यातील मागणी अर्ज
- मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे शिफारस पत्र विहित नमुने सादर करणे आवश्यक असेल.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार यांच्या स्वाक्षरीचे असावे.
- विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड सत्यप्रत केलेली असावी. विद्यार्थ्यांचे बँक खाते पासबुक पहिले पान जोडणे आवश्यक असेल.
- मागील वर्षाची गुणपत्रिका सत्यप्रत केलेली असावी.
- एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका निकाल व अनावश्यक कागदपत्रे जोडू नयेत.
- सारथी शिष्यवृत्ती साठी अपूर्ण, चुकीचे अर्ज, अपूर्ण कागदपत्रे जोडलेले, अर्ज विहित नमुना नसणे व मुदत बाह्य अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.