शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके..!
Free Textbook Scheme : समग्र शिक्षा या केंद्र्शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत सर्व 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. हि एक राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांपैकी एक योजना आहे,अशा शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना शासन स्तरावर राबवत असते. या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाचे ओझे कमी करण्याच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी पुस्तकात वह्यांची पाने जोडली आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 ची अंमलबजावणी आणि प्राथमिक शिक्षणाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून तरतूद करण्यात येते. महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे ही संस्था पाठ्यपुस्तक पुरवण्याचे काम करते.
विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके कुठे आणि कसे मिळतात?
शाळा सुरु होण्याच्या अगोदर हि सर्व विषयाची सर्व इयत्तेची (1 ली ते 8 वी) ची पुस्तके शाळास्तरापर्यंत पोहचवली जातात. तसेच शाळा जून महिन्यात सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येतात. यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळते, तसेच शिकण्यातील आनंद वाढतो. शासनाकडून त्यासंदर्भात प्रेस नोट सुद्धा जरी करण्यात येते. तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजनेचे परिपत्रक शाळा स्तरावर देऊन त्यापद्धतीने कार्यवाही करण्यात येते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत शालेय गणवेश योजना