11th Online Admission Time Table: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी,11वी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर.

11वी चे ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर. कशा आहेत तारखा जाणून घ्या..

11th Admission Time Table: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अकरावी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. 





या अगोदर अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा एक भाग भरला होता.आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा दुसरा भाग  भरायचा आहे. जाणून घेऊयात संपूर्ण वेळापत्रक : 


अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक।11th Online Admission Time Table



8 जून ते 12: जून रात्री 10 वाजेपर्यंत 

प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे आवश्यक असेल.


विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.


विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल / अलॉटमेंट केले जाईल, विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी त्यांचा फॉर्म भाग-2 लॉक करावा लागेल.



12 जून: प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे.


13 जून: तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.


13 ते 15 जून: विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे.


15 जून: अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे.


19 जून: सकाळी 10 वाजता - पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी वेबसाईट वर प्रदर्शित करणे.

विद्यार्थी लॉगीनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे.

संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्याथ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे.

फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)


19 ते 22 जून: विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक असेल.


23 जून: दूसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.

प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांच्या  तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाही.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने