PMMVY YOJANA 2023 : महिलांसाठी सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना या सरकारी योजनेअंतर्गत महिलांना 5000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जात असून, या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया..
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत महिलांना मिळणार 5000 रुपये..
सरकारची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्रीय महिला बालविकास विभागाच्या दिनांक 14 जुलै 2022 च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार व अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे दिनांक 19 मे 2023 च्या पत्रानुसार नव्या अटी सह लागू करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट म्हणजे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होते. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची थोड्या फार प्रमाणात भरपाई मिळावी म्हणजे पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजनेचा लाभ दोन टप्प्यात रुपये पाच हजार देण्यात येईल.
गर्भवती स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेअंतर्गत गर्भवती असताना त्यांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर ही रक्कम दोन टप्प्यात पाच हजार रुपये तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ लाभार्थ्याच्या आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये ज्या महिला असतील त्यांना सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने समान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
एखाद्या लाभार्थी दुसऱ्या गरोदरपणात जुळतील किंवा चार आपत्ती झाल्यास आणि त्यापैकी एक मुलगी किंवा अधिक मुली असतील तरी देखील दुसऱ्या मुलीसाठी चा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना साठी आवश्यक कागदपत्रे
नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थीकडे लाभ घेण्यासाठी वरीलपैकी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक असेल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक इतर कागदपत्रे
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कोठे व कसा कराल?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती आरोग्य सेविका किंवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच नागरी आरोग्य केंद्र येथे संपर्क साधणे आवश्यक असते.
फॉर्म मध्ये नोंदणी करून कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यावर विना अडथळा फॉर्म मान्य झाल्यास लाभार्थीच्या बँक खात्यात थेट डीबीटी द्वारे रक्कम जमा केली जाते.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी वेबसाईट : https://pmmvy.nic in/
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.