मोफत गणवेश योजना : दोन्हीही गणवेश वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर..
मोफत गणवेश योजना: राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समान गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर मागे घेतला असून आता दोन्ही गणवेशनाची जबाबदारी पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आले आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश योजना अंतर्गत राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याची घोषणा केली होती.
परंतु अनेक शाळांनी गणवेश वाटपाची प्रक्रिया सुरू केल्याने नव्या शासकीय योजनेमुळे त्यात अडचणी निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली.
त्यानंतर शासनाकडून दोन गणवेशा ऐवजी एक गणवेश देण्याचा निर्णय झाला. दुसरा गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने देण्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून तीनशे रुपयांचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती देईल असा आदेश काढला.
शासन स्तरावरून सूचना मिळाल्यानंतर उर्वरित एका गणवेशबाबत पुढील कार्यवाही करणेबाबत स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या दुसऱ्या गणवेशबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने परत नवा शासन निर्णय प्रसिद्ध करून गणवेशाच्या बाबत अंमलबजावणीचे निर्देश दिले असून समग्र शिक्षा अभियान उपक्रमांतर्गत सन 2023- 24 शैक्षणिक वर्षांमध्ये पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेश लाभ शाळा व्यवस्थापन समिती मार्फतच करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.
त्यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांनी वितरित करणे आवश्यक असून मोफत गणवेश योजनेअंतर्गत अनेक शाळांनी आणि कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय सन 2023- 24 या वर्षासाठी गणवेश तयार केले.
तयार गणवेशामुळे संबंधितांच्या आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समिती उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून सन 2023 24 शैक्षणिक वर्षात एक गणवेश एक शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानंतर उपलब्ध करून द्यावा.
विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेशही स्काऊट आणि गाईड विषयास अनुसरून शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात यावा. स्काऊट आणि गाईड या विषयाच्या तासिका आठवड्यातून दोन दिवस असतात त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी स्काऊट गाईड आणि विषयास अनुसरून उपलब्ध करून देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक असेल.
तसेच उर्वरित सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आलेले असून आता संपूर्ण गणवेशाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये मोफत गणवेश योजनेची स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे सांगण्यात आलेलं आहे.