School Uniform Updates: शालेय विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अंतर्गत शालेय गणवेश योजना 2023-24

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश योजनेच्या मार्गदर्शक सूचना जारी!


दरवर्षीप्रमाणे शाळा स्तरावर शालेय गणवेशासाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावा म्हणून करावयाच्या कार्यवाहीबाबत समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मुंबई यांचे दि. 29 मे 2023 चे एक परिपत्रक देण्यात आलेले आहे. त्याविषयी माहिती खालीप्रमाणे




School Uniform Guidelines: समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदापत्रक सन २०२३- २४ भारत सरकार यांचे प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) बैठकीत दि. २४ एप्रिल २०२३ रोजी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रक एकूण ३७,३८,१३१ लाभार्थ्याकरीता रु.२२४,२८,६९,०००/- लक्ष चा प्रस्तावास भारत सरकारकडे मंजूरी मिळाली आहे.



शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेमधून कायम स्वरुपी वगळण्यात आला असून, याकरिता सदर शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी, याकरिता प्रति लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर तरतूद रु.६००/- याप्रमाणे तरतूद मंजूर आहे. 


तथापि,शासनाने निर्गमित केलेल्या सूचना नुसार एक गणवेश याकरिता प्रति विद्यार्थी रु.३००/- प्रमाणे निधी या आदेशाद्वारे निर्गमित करण्यात येणार आहे. परिपत्र लिंक खाली देण्यात आलेली आहे.


शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश पात्र लाभावी विद्याथ्र्यांना एक गणवेश संच उपलब्ध करून देण्यात यावा. अशा सूचना परिपत्रकात दिल्या गेल्या आहेत.


तसेच जिल्हा परिषद (महानगरपालिकानिहाय भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद कळविण्यात येत आहे. सदर तरतूदीच्या अधिन राहून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करण्यात यावा. अशा स्पष्ट सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.


तसेच उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासन निश्चित करेल त्याप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबंधितांना शासनाच्या पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कळविण्यात येईल. असे पत्रात सांगण्यात आलेले आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजना (सन २०२३-२४) विषयी मार्गदर्शक सूचना 


गणवेश योजना कोणासाठी लागू असेल?

भारत सरकारच्या समग्र शिक्षा अंमलबजावणी आराखडयातील नमूद निकषानुसार मोफत गणवेश योजना ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनु जाती मुले, अनु जमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे. 


समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२३-२४ करिता भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) दि. २४ एप्रिल २०१३ रोजीच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे.


तरतूद खर्च करण्याचा स्तर:- 


चालू आर्थिक वर्षात प्रती लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर असलेला निधी रु.६००/- याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यापैकी एक गणवेश संचासाठी रक्कम रु.३००/- या दराने दरवर्षीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने विद्यार्थ्याना गणवेश देण्यात यावा. उर्वरित एका गणवेशाचा लाभ देणेबाबत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यावी.

शालेय गणवेशाबाबत महत्वाच्या सूचना:


शालेय गणवेशाबाबत समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण मुंबई यांचे दि. 29 मे 2023 चे एक परिपत्रक देण्यात आलेले असून त्यातील सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश राज्य प्रकल्प संचालक यांनी दिले आहेत.

संपूर्ण सूचना  व  परिपत्रक वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने