पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमात राबवली जाणार श्रेयांक प्रणाली!
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा नुसार चालू शैक्षणिक वर्षापासून आर्ट, कॉमर्स, सायन्स साठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
![]() |
श्रेयांक प्रणाली |
या अभ्यासक्रमांमध्ये श्रेयांक प्रणाली राबवली जाणार आहे. कार्य प्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्प या दोन पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी 4 सत्रात 80 ते 88 श्रेयांक पूर्ण करावी लागणार आहेत.
एका वर्षाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासासाठी 40 ते 44 श्रेयांक पूर्ण करावी लागतील तर एक वर्षाचा पदवी उत्तर पदवी अभ्यासक्रम 2027 ते 2028 पासून सुरू करण्याबाबत स्पष्ट केले गेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉक्टर नितीन कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेल्या सुकाणू समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पदवीत्तर अभ्यासक्रमाने पीएचडी अभ्यासक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून या मार्गदर्शक सूचनाचे अंमलबजावणी करण्यात याबाबत स्पष्ट केलेले आहे.
या निर्णयानुसार तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थ्यांना पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. दोन वर्षाची पदव्युत्तर पदवी चार सत्रात मध्ये पूर्ण करता येणार आहे, प्रत्येक सत्र हे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी किमान 20 तर कमाल 24 क्रेडिट पूर्ण करावे लागतील.