केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक केले जाहीर! नागरी सेवा पूर्व परीक्षा 26 मे रोजी.
![]() |
UPSC Exam Time Table |
अनेकांचा आवडता विषय असलेला नागरी सेवा पूर्व परीक्षा 26 मे 2024 रोजी तसेच मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना तयारी करणे शक्य होणार आहे.
या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी संभाव्य वेळापत्रक UPSC च्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येईल. या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असे UPSC यांनी सांगितले आहे.परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार अर्ज करण्याची अंतिम मूदत असा तपशील देण्यात आला आहे.
अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 18 फेब्रुवारी, सीडीएस परीक्षा (1)- 21 एप्रिल, नागरी सेवा पूर्व परीक्षा 26 मे, भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 26 मे,संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 14 जुलै,केंद्रीय सशस्र पोलीस दल परीक्षा 4 ऑगस्ट ला होणार आहे.
आमच्या What's App Group मध्ये सामील होण्यासाठी..