अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! अभियांत्रिकी चे 'Admission' साठी झाली नवीन वेबसाईट सुरु..!

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आज पासून झाली सुरुवात; 'Admission' साठी नवीन वेबपोर्टल ची सुरवात..! 


Engineering course: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आजपासून म्हणजे 1 जून 2023 पासून रुवात झाली असून ही प्रवेश प्रक्रिया आता एकदम सोपी करण्यात आली आहे. संविस्तर बातमी खालीलप्रमाणे..


अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! अभियांत्रिकी चे 'Admission' साठी झाली नवीन वेबसाईट सुरु

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येण्यासाठी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या वेब पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन करतेवेळी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते.



तंत्र शिक्षण संचालनायकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार रोज रोजगार भिमुख तांत्रिक शिक्षण मिळण्यासाठी आणि पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश जास्तीत जास्त सुलभ होण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in  वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच जास्तीत जास्त फायदा होणार आहे.


तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्यासाठी तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. 

चालू शैक्षणिक वर्षाकरिता (2023 - 24) दहावीनंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास 1 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी https://dte.maharashtra.gov.in  या वेबसाईट वरून ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी ही प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होणार आहे. 


तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर रोजगार मिळण्याची संधी जास्त असते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात वेगाने होणारे बदल आणि वाढत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर स्वतःचा करिअर करण्याची उत्तम संधी निर्माण होत असते. 



त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना सहजासहजी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा यासाठी तंत्र शिक्षण संचालनायकडून  विद्यार्थ्यांना हे वेब पोर्टल प्रवेशासाठी उपयोगी ठरणार आहे.





टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने