शाळा सुरू होताच शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या 40 योजनांची होणार अंमलबजावणी!

शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या 40 योजनांची होणार अंमलबजावणी!

शासन स्तरावरून शासकीय शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे ही पालकांकडून विहित सादर केले जात नाही. कारण पालकांना त्या विषयी काही माहिती नसते परंतु या वेळी तसे होणार नाही.



यावेळी शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शासन स्तरावरून शिक्षण विभागामार्फत पालक, शिक्षक यांना वेगवेगळे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करून सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे, त्यासाठी शासनाने कालबद्ध जागर कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतील यांची माहिती दिली जाईल.तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्र पूर्तता पालकांना करण्यास शाळा स्तरावरून सांगण्यात येईल.


विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तयारी केली जात आहे. जवळजवळ 40 वेगवेगळ्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना यामधून मिळणार आहे. शिक्षण संचालनाकडून प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणी पार पाडण्यासाठी पालक विद्यार्थी यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यासाठी विविध प्रशिक्षण व कार्यशाळा यांचे नियोजन सुरू असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व शाळा स्तरावर आवश्यक ती माहिती व सूचना देण्यात येत आहेत. 


शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या 40 योजना:

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना 
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान 
मुलींना उपस्थिती भत्ता 
शालेय पोषण आहार 
लेखन साहित्य व गणवेश 
मोफत पाठ्यपुस्तके 
प्राथमिक पुस्तक पिढी 
जिल्हा बालभवन 
दहावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण 
बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण 
पालकांचे एक लाखापर्यंतचे उत्पन्न असलेल्या मुलींना फी माफी 
स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती 
आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन 
शिक्षकांच्या पाल्यांना विशिष्ट दराने सानुग्रह अनुदान अवर्षण ग्रस्त विद्यार्थ्यांना फी माफी 
माध्यमिक पुस्तक पीडी 
विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शैक्षणिक सवलत 
अध्यापक विद्यालयातील मुलींना मोफत शिक्षण 
राजमाता जिजाऊ सायकल वाटप 
शैक्षणिक सैनिकी महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती पाचवी व आठवी शिष्यवृत्ती 
कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खुली व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती 
दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती 
संस्कृत शिष्यवृत्ती 
मुलींना माध्यमिक स्तरावर वर प्रोत्साहन भत्ता 
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती 
साक्षर भारत आणि नवभारत साक्षरता कार्यक्रम 
मराठी भाषा फाउंडेशन 
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती 
अल्पसंख्यांक संस्था व शाळांसाठी पायाभूत विकास मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण  इत्यादी..

याव्यतिरिक्त आणखी काही योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत.


शिक्षण संचानालय योजना:


G. R. चे वाचन करू शकता.


आमच्या What's App group मध्ये सामील होऊ शकता,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने