Ramai Awas Gharkul Yojana 2023: अंतर्गत लाभ आणि ऑनलाईन अर्ज
Ramai Awas Gharkul Yojana: प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे वाटते. तर आता रमाई आवास घरकुल योजना ही एक सरकारी घरकुल योजना असून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागामध्ये ही योजना राबविण्यात येते.
रमाई घरकुल आवास योजना दिला जाणारा लाभ:
रमाई घरकुल योजना मार्फत ग्रामीण भागात सर्वसाधारण क्षेत्रात एक लाख वीस हजार रुपये व नक्षलग्रस्त डोंगराळ भागात एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिले जाते. शहरी भागात असेल तर त्या ठिकाणी दोन लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाते.रमाई योजनेमध्ये मनेरगा अंतर्गत 90 ते 95 दिवस व कुशल मनुष्य दिवसांची मंजुरी व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये दिले जातात. हे अनुदान लाभार्थी व्यक्तीच्या थेट खात्यावर जमा केले जाते.
रमाई घरकुल आवास योजना कोणासाठी, आणि का राबवली जाते?
रमाई घरकुल योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यात साठी त्यांचे स्वतःचे घर असावे म्हणून ही योजना राबवली जाते.शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येते या रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना 269 चौरस फुटाचे घराचे बांधकाम करून दिले जाते.
रमाई घरकुल योजनेच्या अटी:
लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध असणे आवश्यक आहे.लाभार्थी महाराष्ट्रातील किमान पंधरा वर्षे रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये तर महानगर व नगरपालिका भागात तीन लाख रुपये मर्यादा असते.
लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे किमान 269 स्क्वेअर फुट जागा अथवा कच्चे घर असणे आवश्यक असते.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ दिला जातो, कुटुंबातून कोणीही इतर गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी असेल तर ही योजना त्या कुटुंबाला लागू नसते.
या योजनेची लाभार्थी निवड जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडून होते, पालकमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतात.
रमाई आवास योजने साठी ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईटरमाई घरकुल आवास योजना शासन निर्णय
PDF (पीडीएफ)आमच्या What's App group मध्ये सामील होऊ शकता,