हे आहेत जगातील सर्वात उंच पर्वत!
आपल्याला नेहमी जनरल नॉलेज मध्ये जगातील सर्वात मोठा पर्वत कोणता हा प्रश्न विचारला जातो. तर या पोस्ट मध्ये आपण जगातील सर्वात जास्त उंच पर्वत याविषयी माहिती घेऊया.
![]() |
जगातील सर्वात मोठे पर्वत |
जगातील सर्वात मोठे पर्वत म्हटलं की, सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर हिमालय उभा राहतो. पण जगातील सर्वात मोठे पर्वत कोणते, तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊयात...
जगातील सर्वात मोठे पर्वत :
1) माउंट एवरेस्ट : नेपाळमधील माउंट एवरेस्ट हा पर्वत जगातील सर्वात उंच पर्वत आहे. याची उंची 8,850 मीटर एवढी आहे.
2) के2 : पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे के2 हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 ची उंची 8,911 मीटर एवढी आहे.
3) कंचनजंघा : भारतातील सिक्किम आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान कंचनजंघा हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8,586 मीटर एवढी आहे.
4) ल्होत्से : ल्होत्से हा पर्वत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पर्वत असून हा पर्वत कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. तसेच याची उंची 8,516 मी एवढी आहे.
5) मकालू : माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. याची उंची 8,485 मीटर एवढी असून हा पर्वत नेपाळ आणि चीन यांच्या सीमे लागत आहे.