या आहेत जगातील सर्वात लांब नद्या!
आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी वाचत असतो कि जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेऊया.
![]() |
जगातील सर्वात मोठ्या नद्या |
मानवी जीवन हे पाण्या भोवतालीच वसलेले आहे. कारण नदी म्हणजे मानवाची जीवनदायिनी आहे. सध्या जगात अनेक मोठ्या नद्या आहेत. अगदी पर्वतीय क्षेत्रापासून ते वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशापर्यंतच क्षेत्र नद्यांनी व्यापलं आहे. पण जगातील सर्वात मोठ्या नद्या कोणत्या माहित आहे का?
जगातील सर्वात मोठ्या नद्या :
1) नाईल नदी : आफ्रिका खंडातील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल नदीची एकूण लांबी 6650 किलोमीटर आहे. ही नदी इजिप्त, युगांडा, इथिओपिया, केनिया, टांझानिया, रवांडा, काँगो, इरिट्रिया, बुरुंडी, सुदान आणि दक्षिण सुदानमधून वाहते.
2) अॅमेझॉन नदी : अॅमेझॉन नदी जगातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी 6575 किलोमीटर एवढी लांब आहे. हे नदी ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वाडोर, व्हेनेझुएला, गयाना या देशांमधून वाहते.