One State One Uniform Scheme : राज्यातील सर्व सरकारी शाळेतील 1ते 8 वी मधील विद्यार्थी एक सारख्याच गणवेशात दिसण्याची शक्यता?

सर्व सरकारी शाळेतील 64.28 लाख विद्यार्थी दिसणार एकच गणवेशात?

एक राज्य एक गणवेश!

राज्य एक गणवेश: आता चालू शैक्षणिक वर्षात सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एक सारखाच गणवेश देण्यात येणार आहे, असे समजले जात आहे. तसेच राज्य सरकारने 


"एक राज्य एक गणवेश!" 

 

या योजनेचे अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. जवळजवळ 64.28 लाख विद्यार्थी हे आता एकाच सारख्याच गणवेशात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने 2023 24 चा अर्थसंकल्पात मोफत गणवेशाची तरतूद केलेली असून शाळेचे शिक्षण विभाग सर्व विद्यार्थ्यांना एकच गणवेश आणण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. आतापर्यंत विद्यार्थिनींना व आदिवासी भटके विमुक्त प्रवर्ग आणि दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत गणवेश पुरवत होते. 


यापुढे राज्यातील पहिली ते आठवीच्या सरकारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकच गणवेश असू शकतो. अशी माहिती मिळत आहे. यामुळे सर्व ठिकाणी चर्चेला उधाण आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक बदल दिसून येत आहेत ,आता शाळा व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यमापनासाठी श्रेयांक पद्धत सुद्धा वापरली जाणार आहे. शाळेचा युनिफॉर्म हा आकर्षक आणि आधुनिक असावा असे मत व्यक्त करण्यात येत आहे.


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने