आता शाळांमध्ये स्काऊट गाईड होणार अनिवार्य..!
Educational News : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक असल्याने, त्यासाठी व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्याधरित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये स्काऊट गाईड अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
शाळांमध्ये स्काऊट गाईड अनिवार्य होणार ..!
![]() |
शाळांमध्ये स्काऊट गाईड होणार अनिवार्य..! |
यापुढे शिक्षण मराठीतूनच होणार असल्यामुळे पालकानी आता इग्लिश मिडीयम शाळांचा हव्यास आता सोडवावा अशी भूमिका त्यांनी मांडली. खाजगी शाळातील प्रत्येक उपक्रमात पलकाना आर्थिकदृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये कमीपणाची भावना निर्माण होते.
वाचा: शाळा सुरू होताच शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या 40 योजनांची होणार अंमलबजावणी!
खाजगी शाळांमध्ये शिकवले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये. यापुढे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. पालकांनी आता इंग्रजी माध्यमाच्या हट्ट सोडायला हवा खासगी प्राथमिक शिक्षणाला शक्य तेवढी शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा: शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पदव्युत्तर-पदवी अभ्यासक्रमात राबवणार श्रेयांक प्रणाली!