स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती 2023।Vinayak Damodar Savarkar Jayanti
![]() |
विनायक दामोदर सावरकर जयंती 2023 |
ने मजसी ने,परत मातृभूमीला..सागरा,प्राण तळमळला..
वरील शब्द कानावर पडले की आपल्याला आठवण येते ती सावरकर यांची. सावरकर यांची जयंती दरवर्षी 28 मे रोजी संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. सावरकरांविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया.
विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी माहिती.
संपूर्ण नाव: विनायक दामोदर सावरकर
जन्म: 8 मे 1883 रोजी झाला
जन्म ठिकाण: भगूर, जिल्हा नाशिक ,महाराष्ट्र
शिक्षण: बॅचलर ऑफ आर्ट्स, फर्ग्युसन कॉलेज ऑफ पुणे.
कार्य:भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे कार्य केले.
पत्नी: यमुनाबाई
मुले: प्रभाकर ,विश्वास ,मुलगी- प्रभात चिपळूणकर.
सावरकर यांचे बालपण त्यांच्या मूळ गावी झाले. 9 वर्षाचे असतानाच त्यांची आई राधाबाई यांचा मृत्यू कॉलराच्या साथीत झाला. त्यानंतर सात वर्षानंतर प्लेगची साथ आल्यानंतर त्यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत सावरकर होते.
त्यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश सावरकर यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण केले. विनायकराव सावरकरांचे मॅट्रिक ची परीक्षा नाशिक मधून शिवाजी हायस्कूल इथून उत्तीर्ण झाले.ते लहानपणापासून वाचक आणि एक वक्ते होते.त्यांचे पुढील त्यांचे पुढील शिक्षण प्रदूषण कॉलेज पुणे येथे पार पडले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत नावाचे क्रांतिकारी संघटना स्थापन केली. बंगालच्या फाळणीच्या वेळी 1905 मध्ये विदेशी कपड्यांची पुण्यामध्ये होळी केली. 10 मे 1907 मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना लंडन येथे केली. ते एक वाचक लेखक आणि एक वक्त होते. इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी भारतात चळवळ उभा केली. विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या दमदार भाषणातून 1857 चा संघर्ष हा विद्रोह नसून भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असल्याचे सिद्ध केले.
'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस' या पुस्तकाची छपाई करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अडचणी वर मात करून त्यांनी हे पुस्तक हॉलंड मधून प्रकाशित केले. या पुस्तकात ब्रिटिश सरकार विरुद्ध शिपाई यांचे वर्णन केलेले आहे. इंग्रज सरकारने 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर पुन्हा 31 जानेवारी 1911 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिश सरकारने त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली ही जगाची इतिहासातील पहिली अनोखी शिक्षा होती .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोलाचे असून त्यांचे अनेक लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्र तसेच वेगवेगळे पुस्तके वाचण्यासारखे आहेत. त्यांनी पूर्ण भारतभर आपल्या लेखणीतून राष्ट्रवादी चळवळ उभा केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य असून त्यांना स्वातंत्र्यवीर अशी पदवी घेण्यात आली आहे.