जागतिक अपंग, दिव्यांग दिन विषयी संपूर्ण माहिती।International Disability Day in Marathi.

3 डिसेंबर जागतिक अपंग, दिव्यांग दिनाचे महत्व.

3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग, दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी समाजात दिव्यांगाबाबत समाजात जन जागृती होण्यासाठी, दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. तसेच त्यांच्याबाबत  समाजात आदर,सहानुभूती,सन्मान निर्माण होईल, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांच्या अडचणीवर सहजतेने मात करता येईल. यासाठी जागतिक दिव्यांग दिन सर्वत्र जगभर साजरा केला जातो.


3 डिसेंबर जागतिक अपंग, दिव्यांग दिनाचे महत्व.3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिन का साजरा करतात?
जागतिक अपंग, दिव्यांग दिन 


RPWD ACT 2016 नुसार दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम नुसार अपंग या शब्दाच्या ऐवजी दिव्यांग हा शब्द उच्चारला जावा असे सांगण्यात आलेले आहे. 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग, दिव्यांग दिन  साजरा करण्यामाघे महत्वाचे उदिष्ट म्हणजे समाजातील सर्वच घटकापर्यंत दिव्यांगाविषयी जनजागृती व्हावी, त्यांना न्याय मिळावा,तसेच त्यांच्या जीवनातील अडथळे दूर व्हावे, त्यांना त्यांचे हक्क माहिती व्हावे. 


वाचा :  Content Writing करून पैसे कमवण्याची संधी!


शाळा स्तरावर सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाचा हक्क,समान संधी मिळावी त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्व स्तरावर शासन आता प्रयत्न करत आहे.


3 डिसेंबर जागतिक अपंग दिन का साजरा करतात?

20 सप्टेंबर 1959 रोजी बेल्जियम येथे असणाऱ्या मोठ्या कोळशाच्या खाणीत अनेक लोक काम करत होते. अचानक या खाणीत मोठा स्पोट होऊन अनेक लोक मृत्यू पावले,तसेच अनेक लोक जखमी आणि कर्णबधीर झाले. तसेच अनेकांची दृष्टी गेली, अनेकांचे हात पाय निकामी होऊन अपंगत्व आले. हजारो लोक कोळशाच्या खाणीत गाडले गेले. 


बेल्जियम सरकारने या लोकांना तातडीने मदत आणि नुकसान भरपाई दिली. मात्र जे लोक कायमचे अपंग झाले त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. अपंगत्वामुळे त्यांचा रोजगार गेला आणि अपंगत्वामुळे बेरोजगार झाले. या सर्वांनी मिळून खाण मालकाच्या विरोधात एकत्र येऊन आंदोलं केले. 


जे लोक अपंग झालेले आहेत त्यांना विमा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी सर्वणी मागणी केली हा सर्वात पहिला लढा मानला जातो जो दिव्यांग बांधवासाठी महत्वाचा ठरला.


खाण मालक व शासनाला या सर्व मागण्यांची दखल घ्यावी लागली. त्यांना त्यांचा मोबदला द्यावा लागला. हे आंदोलन दिव्यांग बांधवांचे सर्वात पहिले आंदोलन ठरले. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. याच कोळसा खाणीत अपंगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांसाठी तसेच जगभरातील सर्वच दिव्यांगांसाठी जागतिक आरोग्य संघटना  WHO यांनी 1962 या वर्षापासून जागतिक अपंग दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले. 


मार्च महिन्यात तिसरा रविवार हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रथम तो दिवस स्मृती दिन म्हणून साजरा केला जात असे. नंतर काही जगभरातील सर्व दिव्यांग बांधवांचे एकत्रीकरण झाले. 


वाचा :  फायबरयुक्त पदार्थ म्हणजे काय?


त्यांच्या काही वेगवेगळ्या मागण्या आणि त्यांच्या उद्धारासाठी व हक्कासाठी आंदोलने होऊ लागले. बेल्जियम मधील घडलेल्या कोळसा खाण दुर्घटना यामुळे सर्व जगभरातील दिव्यांग बांधव एकत्रित झाले. 


दिव्यांग अपंगांसाठी विविध योजना असाव्यात असे या संघटनेला वाटू लागले,त्यानंतर जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या. आपल्या वेगवेगळ्या मागण्या मांडू लागल्या म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने 1981 हे वर्ष जागतिक अपंग वर्ष जाहीर केले. त्यानंतर 1992 मध्ये राष्ट्रीय अपंग पुनर्वसन परिषद यांनी अपंग पुनर्वसन परिषद कायदा पास केला. 


जागतिक अपंग दिन मार्च महिन्यात वेगवेगळ्या तारखेला येत असे, म्हणून सन 1994 मध्ये जागतिक आरोग्य परिषद आणि संयुक्त राष्ट्र संघ यांच्या पुढाकाराने ३ डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक अपंग,दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.म्हणजेच 1994 पासून ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


जागतिक दिव्यांग, अपंग दिनाचे घोषवाक्य.

हातात हात द्या,दिव्यांगाना साथ द्या.

सर्वांचा निर्धार दिव्यांगांचा स्वीकार.

दिव्यांगाना देऊ संधी, वाहील विकासाची नांदी.

हक्क देऊ संधी देऊ, दिव्यांगाना संधी देऊ.

ऊठ दिव्यांगा जागा हो, समजाचा धागा हो.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने