Vinoba App Download।विनोबा शैक्षणिक ॲप चा वापर करण्याचे फायदे.

Vinoba Android App चे उद्दिष्ट्ये आणि फायदे.

Vinoba Android app काय आहे, त्याचा वापर आणि फायदे याविषयी या पोस्ट मधून आपण संविस्तर माहिती घेऊया.

Vinoba App Download।विनोबा शैक्षणिक ॲप चा वापर करण्याचे फायदे.



Vinoba Android app हे एक उत्तम शैक्षणिक ॲप आहे. याचा वापर शिक्षक आपले दररोज चे शैक्षणिक कामकाज करण्यासाठी उपयोग करू शकतात.

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!


Vinoba App वापरण्याचे शैक्षणिक फायदे.

  • Vinoba  App मुळे शिक्षणात नाविन्यता आणण्यासाठी उपयोग होतो.
  • शिक्षकांचे काम सोपे आणि सुलभ होण्यासाठी विनोबा ॲप मदत करते.
  • शैक्षणिक काम इतरांना शेअर करण्यासाठी विनोबा ॲप ची मदत होते. 
  • एकमेकांना प्रेरित करण्यासाठी तसेच इतरांशी संवाद साधण्यासाठी शिक्षकांमधील चर्चा घडून आणण्यासाठी तसेच शिक्षकांमध्ये ऑनलाईन समुदाय तयार करण्यासाठी विनोबा ॲप मदत करते. 
  • शिक्षकांचे नवीन उपक्रम इतरांशी शेअर करण्यासाठी तसेच विद्यार्थी Success Story, विद्यार्थ्यांचे प्रकल्प पोस्ट करू शकतात. 
  • शिक्षक एकमेकांच्या पोस्ट ला लाईक आणि कमेंट सुद्धा करू शकतात.
  • शिक्षकांना आठवड्याचे नियोजन TLM साहित्य, प्रशिक्षण, दिनदर्शिका इत्यादी उपयुक्त साहित्य या Vinoba App वर सहज उपलब्ध होते. 
  • Vinoba App वर महत्त्वाच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. 
  • शिक्षक व शाळा यांचा डेटा संकलन करण्याचे काम यावर करू शकतो. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचतो.
  • Vinoba App वर शिक्षकांनी केलेले सर्व पोस्ट त्यांचा पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करते. 
  • शिक्षकांच्या पोस्ट इतरांशी शेअर करण्यासाठी सार्वत्रिक करण्यासाठी मदत होते. 
  • शिक्षक एकमेकांशी सहज संवाद साधू शकतात. 
  • इतर शिक्षकांचे कामकाज पाहून आपल्या कामांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतात.
  • Vinoba App चे वैशिष्ट्य म्हणजे हे वापरण्यासाठी सोपे आणि सुरक्षित आहे. 
  • Vinoba App ने मूल्यांकन करणे शिक्षकांना सहज सोपे होते. 
  • शिक्षकांची नोंदणी करण्यासाठी अध्यापन समृद्धी करण्यासाठी अध्यापनाची स्रोत शोधण्यासाठी शिक्षकांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी शिक्षकांच्या गरजा काय आहेत याचा शोध घेण्यासाठी हे ॲप मदत करते. 
  • शिक्षकांचे अभिप्राय आणि त्यांच्या गरजा लक्षात घेण्यासाठी हे Vinoba App मदत करते. 
  • Vinoba App प्रभावी शिक्षण संवाद आठवड्याचे अध्यापन नियोजन, शिक्षकांचे वार्षिक प्रशिक्षण, शालेय विषयक अभ्यासक्रमाबाबत माहिती नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी Vinoba App ची मदत होते.
  • अध्यापनासाठी उपयुक्त विविध फोटो व्हिडिओ यांचा वापर सहजपणे करता येतो. अ
  • ध्यापनामध्ये नाविन्यपूर्णता आणण्यासाठी Vinoba App मदत होते. 
  • अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी तसेच NAS FLN सर्वे बाबत शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम, कृती संशोधन इत्यादींची माहिती घेण्यासाठी वापर केला जातो. 
  • तसेच शिक्षकांची विविध उपक्रम त्यांचा संवाद घडून आणण्यासाठी Vinoba App मदत करते.


Vinoba App Download करून Registration कसे करावे?

  • सर्वात प्रथम आपल्याला आपल्या Android Mobile मधील Google Play Store मध्ये जाऊन Vinoba App असे सर्च करावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला ते Download करून Install करून घ्यावे लागेल. सर्व प्रोसेस इतर app प्रमाणे आहे.
  • त्यांनतर Registration Option वर click करून, आपले नाव आणि मोबाईल नंबर/ इमेल आय डी भरावा लागतो.
  • आपल्याला आपल्या मोबाईल वर OTP येईल. 
  • शक्यतो इमेल पेक्षा मोबाईल नंबर चा वापर करावा म्हणजे OTP लवकर येतो.
  • त्यानंतर खाली आपल्या शाळेचा यू डायस नंबर भरावा. 
  • आपल्याला Registration चा OTP पाठवला जाईल, आपण जो मोबाईल नंबर भरला त्याच नंबर वर OTP  पाठवला जातो हे लक्षात घ्यावे.
  • त्यानंतर आपण लॉग ऑउट करून परत लॉग इन करावे. त्यावेळी आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबर आणि शाळेचा यू डायस नंबर भरावा लागेल. 
  • आपले Registration आणि लॉग इन पूर्ण होईल.


Vinoba App Download Link.


वरील लिंक वरून आपण Vinoba App सहज download करून घेऊ शकता.

वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने