भारतात Content Writing मध्ये करिअरची सुरुवात करण्यासाठी महत्त्वाच्या टिपा.
भारतासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये लेखन करण्यासाठी खूप संधी आहे. कारण भारतात अनेक वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तसेच लेखन करण्यासाठी वेगवेगळे Online Offline Platform उपलब्ध आहेत.
![]() |
Content Writing करून पैसे कमवण्याची संधी. |
कन्टेन्ट रायटिंग Content Writing Job कुठे आणि कसे करतात?
- Freelancer
- Blogger
- Journalistic writing
- Copy Writing
- Company employee इत्यादी.
- Content Writing करण्यासाठी आवश्यक Skill.
वाचन Reading.
वाचन म्हणजे काय हे सर्वात प्रथम आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या अगोदरच या ब्लॉगवर वाचन म्हणजे काय वाचनाचे प्रकार याविषयी लेख लिहिलेला आहे. कोणत्याही गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान समजून घेण्यासाठी वाचन कौशल्य चांगले असावे लागते.
वाचण्याची नियमित सवय असावे लागते आणि वाचनाची आवड असणे गरजेचे असते. लेखन आणि वाचन हे एका नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. वाचनामध्ये विविध लेखकांचे ब्लॉग, वेबसाईट, वर्तमानपत्र हे नियमित वाचन करावे.
कारण त्यांनी आपल्याजवळ असणारे संपूर्ण ज्ञान त्यात घातलेले असते. त्यामुळे तुमचे भाषिक प्रभुत्व निर्माण होण्यास मदत होते. त्याचबरोबर शब्दसंग्रह शब्द संपत्ती वाढण्यास मदत होते.
लेखन Writing.
आपण आपली डायरी नियमित लिहिण्याची सवय ठेवावी. त्यामुळे आपले लेखन कौशल्य सुधारण्यास मदत होते. नवीन कल्पना सुचतात आणि आपल्याला ज्ञानात भर पडते. दररोज किमान 200 ते 500 शब्द नियमित लिहिले तर लेखन कसे करावे? याविषयी शंका राहणार नाही.
आपले लिहिण्याची सवय ही लिहिण्याची आवड वाढवून आपले Writing Skill वाढवण्यामध्ये मदत करते. त्यामुळे नियमित लेखनाचा सराव असणे आवश्यक आहे.
भाषाशैली Language style.
आपली language style चांगली असावी त्यामुळे लेखन चांगले दर्जाचे होते. आपली भाषा सुधारण्यासाठी वर सांगितलेले दोन मुद्दे ला महत्वाचे आहेत. वाचन आणि लेखन या दोन गोष्टीकडे आपण नियमित लक्ष देऊन नियमित सराव केला तर आपली भाषाशैली सुधारण्यास मदत होते.
रायटिंग करताना कोणाची कॉपी करू नये त्यामुळे आपल्या लेखनाला किंमत राहत नाही. कोणतेही कंटेंट लिहा परंतु ते युनिक असणे गरजेचे आहे. युनिक लेखनाला सध्या जास्त महत्त्व दिले जाते आणि त्याचे सर्वत्र कौतुक सुद्धा केले जाते. त्यामुळे लिहिताना मुद्देसूत आणि त्यामध्ये लिहिण्याची भाषा शैली चांगली असणे गरजेचे आहे. जेणेकरून वाचन करणाऱ्याला आपण काय लिहिले आहे ते सहजपणे समजू शकेल.
संशोधन Research.
कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधनाला खूप महत्त्व असून ते तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये फार उपयुक्त ठरते. तुम्हाला ज्या विषयाचे Research करायचे आहे, त्याची तपशीलवार अचूक माहिती घेणे आवश्यक असते. एखाद्या गोष्टीची माहिती घेताना त्याची मुद्देसूद मांडणी आणि ते विषय संबंधी वेगवेगळे प्रश्न लक्षात घेणे आवश्यक असतात.
संशोधनासाठी आपण वेगवेगळे लेखकांचा लेख तसेच सोशल साईट इत्यादी ठिकाणी रिसर्च करू आपली Content Writing मध्ये सुधारणा घडवून आणू शकता.
सर्टिफिकेशन Certification.
भारतात Content Writing career करण्यासाठी आपल्याकडे सर्टिफिकेशन असणे महत्त्वाचे असते. ऑनलाइन सामग्री किंवा Online content writing अभ्यासक्रम ऑफर करणाऱ्या अनेक संस्था असतात त्यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क करून आपण आपले सर्टिफिकेशन कंटेंट रायटिंग सर्टिफिकेशन प्राप्त करून घेऊ शकता.
Content writing jobs साठी आवश्यक असणारे कौशल्य.
Content writing jobs किंवा Career साठी सर्वप्रथम आपला Resume तयार करा त्यामध्ये आपली प्रोफाइल चांगल्या दर्जाची आणि आपल्या विषयी माहिती देणारी प्रोफाइल तयार करून ठेवा.
Niche
Content writing करताना नीच सिलेक्ट करणे हे खूप महत्त्वाचे असते. एकाच विषयावर लेखन केल्याने तुमच्या लेखनाचा किंमत वाढते. तसेच लेखनाचा दर्जा चांगला करता येतो. कंटेन रायटिंग मध्ये करिअर करण्यासाठी संधी खालीलप्रमाणे असू शकतात.
स्वतःची वेबसाईट सुरू करू शकता.
- Intership.
- E-Book Writing.
- Social media content writer.
- E-mail and newsletter writer.