वाचन म्हणजे काय।वाचन करण्याचे महत्व।वाचनाचे प्रकार।वाचनाची आवड कशी निर्माण करावी.

 Reading Skills Information In Marathi : वाचन हे भाषा विकासातील हे एक महत्वाचे कौशल्य असून,ते ऐकणे आणि बोलणे या कौशल्यावर आधारीत आहे.तसेच वाचन करण्यासाठी अगोदर ऐकणे,बोलणे हे कौशल्य योग्य प्रकारे विकसित होणे महत्वाचे आहे.

वाचन म्हणजे काय।वाचन करण्याचे महत्व।वाचनाचे प्रकार।वाचनाची आवड कशी निर्माण करावी.


वाचन करणे म्हणजे फक्त लिहलेले डोळ्याने पाहून ओळखणे म्हणजे वाचन नसून दिलेल्या ओळींचा किंवा लिहलेल्या मजकूरचा अर्थबोध होणे आवश्यक असते.

Join : Whats App Channel

वाचन म्हणजे काय।What is Reading In Marathi.

वाचन म्हणजे काय।वाचन करण्याचे महत्व।वाचनाचे प्रकार।वाचनाची आवड कशी निर्माण करावी.

आपण सर्वजण नेहमी वेगवेगळ्या विषयांचे लेख नेहमी शालेय जीवनापासून वाचन करत आलेलो आहेत. वाचन म्हणजे नेमके काय? 

वाचन म्हणजे डोळ्या खालून भरभर पुस्तके वाचून न काढता, वाचलेल्या भागाचे प्रत्यक्ष आकलन होणे किंवा वाचलेल्या भागाचा प्रत्यक्ष अर्थ समजणे म्हणजेच वाचन होय.

वाचन फक्त आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महत्त्वाचे नसून,आयुष्यभरासाठी वाचन महत्त्वाचे असते. आयुष्यात वाचनाला खूप महत्व असून एक सर्जनशील व्यक्ती होण्यासाठी, आपले आयुष्य प्रेरणादायी होण्यासाठी वाचन हे खूप महत्त्वाचे असते.वाचनाची सवय लावून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. 

वाचनाचे महत्व व फायदे।Importance of Reading.

वाचनाचे महत्व खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया.

वाचन ही एक आपल्या जीवनाला आकार देणारी बाब आहे.वाचनाने माणूस सुसंस्कृत आणि बुद्धिमान होतो.

वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते.

वाचन ही अशी गोष्ट आहे की,त्यामुळे आपल्या शब्दसंपत्ती मध्ये भर टाकत असते.

वाचनाने नवीन विषयाचे आकलन होते.

जीवन जगताना अनेक ठिकाणी आपल्याला वाचनाचा उपयोग होतो.

वाचन केल्याने माणूस विचारी होतो,तसेच बुध्दीला चालना मिळते.

वाचन केल्याने आपले मनोरंजन होते.

वाचनाची आवड असणारे लोकांना समाजात,तसेच आपल्या अवती भोवती चालणाऱ्या वेगवेगळ्या घटनाची माहिती 

मिळते.

आपली एकाग्रता वाढण्यासाठी वाचनाचा उपयोग होतो.

तान तणावापासून वाचनामुळे आपण मुक्त होऊ शकतो.

अनेक नोकरीच्या संधी वाचनामुळे उपलब्ध होतात त्यामुळे आपले करियर चांगले होण्यास मदत होते.

वाचनामुळे आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते त्यामुळे आपण अनेक स्पर्धा परीक्षा देऊन त्यामध्ये यश मिळू 

शकतो.तसेच आपल्या अनुभवात भर पडते. 

वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा अंतर्बाह्य विकास होण्यास मदत होते.

वाचनामुळे भाषा वाढ व विकास होतो.संस्कृती व समाजाची आवस्था वाचनातून लक्षात येते. 

सतत वाचन केल्याने ज्ञानामध्ये भर पडत राहते.कल्पना शक्ति वाढते. विपुल प्रमाणात वाचन केल्याने आपल्या वकृत्व व भाषेत भर पडते. 

वाचनाचे प्रकार।Types of Reading

प्रकट वाचन (Manifest Reading)

अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजात रूपांतर करून केलेल्या उचलणार्‍या प्रकट वाचन असे म्हणतात.

थोडक्यात प्रकट वाचन म्हणजे एखाद्या आशयाचे मोठ्या आवाजात स्पष्टपणे केलेले वाचन होय.

प्रकट वाचन हे शिक्षक,वकील,वृत्तनिवेदक ,वक्ता करताना आपण पाहतो.

मुकवाचन म्हणजे काय?

लिहिलेले अक्षर रुपी ग्रहण करणे म्हणजेच मुख वाचन होय. 

मुकवाचान मनात केले जाते.

मुकवचन केल्याने गोंगाट व उच्चारणासाठी लागणारा वेळ व शक्ति खर्च होत नाही. 

मुकवाचन हे अर्थग्रहणासाठी खूप उपयोगी आहे.

मनातल्या मनात वाचन करणे म्हणजे मुकवाचन होय. 

वाचन प्रभावी होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी.

सुस्पष्ट आवाज.

प्रत्येक शब्द किंवा अक्षर वाचताना त्याचा उच्चार स्पष्टपणे होणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण बोललेले एखादा शब्द किंवा वाक्य हे समोरच्याला सहजपणे समजेल किंवा आकलन होणे अपेक्षित असते.

आवजातील चढ.

चढ उतार आपण वाचन करत असताना वाचनामध्ये चढ उतार होणे आवश्यक असते. योग्य ठिकाणी आवाज वाढवणे योग्य ठिकाणी आवाज कमी करणे हे वाचणे प्रभावी होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. 

जोर थांबे.

आशय वाचताना योग्य ठिकाणी योग्य शब्दावर जोर देणे योग्य त्या ठिकाणी थांबे,स्वल्पविराम,पूर्णविराम, या गोष्टी वाचन करत असताना लक्षात येणे आवश्यक आहे.

वाचनाची गती.

वाचनाची गती ही जास्त भरभर ही असून चालत नाही किंवा खूप मंद गतीने वाचन केले तर ते परिणाम कारक होत नाही.म्हणून वाचनाची गतीही योग्य ठेवणे आवश्यक आहे. 

वाचन हे वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतो एखाद्या पाठाचे वाचन किंवा एखादी कविता किंवा काव्याची वाचन करत असताना त्यामध्ये योग्य गती असणे आवश्यक आहे. 

त्यामुळे आपले वाचन ही आकर्षक आणि समोरच्या व्यक्तीला कानाला ऐकावसे वाटेल अशा पद्धतीची असणे गरजेचे असते.

चेहऱ्यावर हावभाव.

वाचन करताना चेहऱ्यावरील हावभाव बदल होणे आवश्यक आहे त्यामुळे वाचन ही प्रभावी ठरू शकते.एखाद्या दु:खद प्रसंग असतानाचे वाचन , आनंदी प्रसंगाचे वाचन करताना आपल्या चेहर्‍यावर तसे भाव दिसणे आवश्यक असते हे प्रभावी वाचनासाठी महत्वाचे आहे . 

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी 10 मुद्दे.

वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुढे काही मुद्दे आहेत. 

1.आपली स्वतः वाचन कौशल्य विकसित करा. 

2.वेगवेगळ्या आपल्याला आवडतील अशी सामग्री जमा करून वाचन करण्याचा हळूहळू प्रयत्न करा. 

3.दररोज थोडा थोडा वेळ वाचन करून वेळ वाढवत जाऊन वाचण्याची सवय लावून घ्या. 

4.माहिती नसणारे शब्द माहिती करून घेण्यासाठी वेगवेगळ्या डिक्शनरीचा वापर करा. त्या शब्दाचा अर्थ जाणून घ्या . 

5.बाजारामध्ये उपलब्ध बसणार्‍या कादंबऱ्या खरेदी करा किंवा मोफत हवे असल्यास लायब्ररीमध्ये सदस्यत्व घेऊन पुस्तके वाचायला मिळतील. 

6.वाचन करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा.

7.विविध विषयावरील मासिके ,वेगवेगळी पुस्तके, कादंबऱ्या वाचण्याची सवय लावा. 

8.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना गूगल ,टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, चा आधार घ्या.

9.तसेच वाचण्यासाठी साहित्य निश्चित करा.आणि वेगवेगळ्या ऑनलाईन टूल्स चा वापर करा. जसे की वेगवेगळे मोठे मोठे ब्लॉग, वेबसाईट यांचा वाचनात वापर करा.

10.वाचन करताना आशयातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा, याने तुम्हाला वाचनाची आवड निर्माण होईल. मुलांना वेगवेगळे गोष्टीचे पुस्तके वाचायला द्या. 

अशा प्रकारे आपण या पोस्ट मधून वाचन म्हणजे काय,वाचनाचे फायदे,वाचनाचे प्रकार,वाचनाचे महत्व या विषयी माहिती घेतली.माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने