Special Educator Course information in Marathi.

Special Educator Teacher Jobs information in Marathi.

ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार अध्यापन करण्यासाठी  प्रशिक्षण दिले जाते. त्याठिकाणी Special Educator विशेष शिक्षक म्हणून नोकरी करता येते.


विशेष शिक्षक (स्पेशल टिचर) कसे व्हावे।विशेष शिक्षक होण्याचे फायदे
विशेष शिक्षक होण्याचे फायदे

Table Of Content :
Table Of Content(toc)


विशेष शिक्षक Special Educator म्हणजे काय?

 

दिव्यांगविद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैली नुसार अध्यापन करण्यार्‍या शिक्षकांना विशेष शिक्षक (Special Teacher) असे म्हणतात.तसेच त्यांना रिसोर्स टिचर असेही म्हटले जाते. 

 

विशेष शिक्षणामध्ये विशेष गरजा असणार्‍या (CWSN) विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या अध्ययन शैली नुसार अध्यापन विशेष शिक्षक करतात. 


शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 21 वेगवेगळे अपंगत्वाचे (दिव्यांग) प्रकार पडतात. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो,त्यामुळे या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षक यांची गरज पडते. विशेष शिक्षक हे विशेष शिक्षणातील तज्ञ असतात. ते विद्यार्थ्यांची अध्ययन शैली ओळखून अध्यापन करतात. 


Special Educator होण्यासाठी आवश्यक पात्रता.

  • विशेष शिक्षक होण्यासाठी आपल्याला विशेष शिक्षणातील डि.एड.,बी.एड .करणे आवश्यक असते. 
  • विशेष  डि.एड.,बी.एड. मध्ये  आपण अपंगत्वानुसार वेगवेगळे विषय निवडू शकतो म्हणजे आपल्याला कर्णबधिर मुलांना शिकवण्याची आवड असेल तर आपण कर्णबधिर  विशेष डि.एड.,बी.एड. करू शकता. 
  • याचप्रमाणे अंधांचे  डि.एड.,बी.एड.,मतिमंद चे  डि.एड.,बी.एड. करू शकता. हे आपण आपल्या आवडी नुसार फॉर्म भरतेवेळी ठरवायचे असते. 
  • विशेष शिक्षक (Special Teacher) होण्यासाठी आपल्याला 12 वी किंवा कोणत्याही शाखेतील (कला,वाणिज्य विज्ञान) पदवी शिक्षण 40 ते 50 % गुणांसह पूर्ण करणे आवश्यक असते.  
  • विशेष डी.एड.,बी.एड.साठी सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 
  • विशेष शिक्षक होण्यासाठी स्पेशल डि.एड,बी.एड किंवा स्पेशल एम.एड करणे आवश्यक असते.
  • विशेष शिक्षणातील डि.एड.,बी.एड किंवा स्पेशल एम.एड करण्यासाठी ज्या प्रमाणे नॉर्मल डि.एड,बी.एड किंवा एम.एड करतो त्याच प्रमाणे आपल्याला प्रोसेस पूर्ण करावी लागते. 
  • ज्यावेळी आपण डि.एड,बी.एड किंवा एम.एड करण्यासाठी महाराष्ट्र सीईटी परीक्षा साठी अर्ज करता त्या ठिकाणी नॉर्मल आणि स्पेशल असे दोन पर्याय आपल्यासमोर दिलेले असतात त्याच ठिकाणी आपण स्पेशल हा पर्याय निवडणे आवश्यक असते. 
  • स्पेशल टिचर होण्यासाठी आपल्याला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी विशेष महाविद्यालयातून स्पेशल डि.एड,बी.एड किंवा स्पेशल एम.एड करणे करता येते. 
  • स्पेशल डि.एड,बी.एड किंवा स्पेशल एम.एड शिक्षण पूर्ण केल्यावर आपण कोणत्याही स्पेशल स्कूल मध्ये विशेष शिक्षक म्हणून काम करू शकता. 
  • स्पेशल डि.एड,बी.एड किंवा स्पेशल एम.एड पूर्ण करण्यासाठी  2 ते 3 वर्षे इतका कालावधी लागतो. 
  • स्पेशल डि.एड,बी.एड किंवा स्पेशल एम.एड पूर्ण झाल्यावर आपल्याला RCI (आरसीआय) नोंदणी करावी लागते. 
  • RCI (आरसीआय) प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर तुम्ही नोकरी साठी अप्लाय करू शकता. 
  • विशेष शिक्षक होण्यासाठी आपल्याला विशेष शिक्षण किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांविषयी आदर,काम करण्याची आवड असणे आवश्यक आहे. 
  • विशेष शिक्षक होण्यासाठी अभ्यास करण्याची तयारी असावी लागते.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची क्षमता असावी लागते. 


विशेष शिक्षक Special Educator होण्याचे फायदे.

  • विशेष शिक्षक (Special Teacher) झाल्यावर आपल्याला सरकारी किंवा खाजगी स्पेशल स्कूल ( विशेष शाळेत ) विशेष शिक्षक (Special Teacher) म्हणून नोकरी करता येते. 
  • ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये शिकवले जातात,तसेच प्रशिक्षण दिले जाते. त्याठिकाणी विशेष प्रशिक्षक ( Special Educator) म्हणून नोकरी करता येते. 
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना व पालकांना तज्ञ मार्गदर्शक किंवा स्पेशल एज्युकेटर म्हणून काम करता येते. 
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक खाजगी विशेष शाळा आहेत,त्या ठिकाणी चांगला पगार दिला जातो.
  • शासनाच्या समग्र शिक्षा अभियान सारख्या महत्वपूर्ण योजनेत कंत्राटी स्वरुपात कमी मानधनावर का असेना, पण विशेष शिक्षक म्हणून नोकरी मिळते. या ठिकाणी मुद्दाम कंत्राटी शब्द वापरत आहे. कारण अनेक वर्षे दिव्यांग विद्यार्थी यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्याचे काम विशेष शिक्षक करत आहे.
  • कारण समग्र शिक्षा अभियानातील,समावेशित शिक्षण यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कठीण काम करणार्‍या विशेष शिक्षक यांना कंत्राटी आणि कमी मानधनावर काम करावे लागत आहे.असो, यात शासनाची दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत असलेली उदासिनता दिसून येते. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने