होमिओपॅथी डॉक्टर Homeopathy Doctor होण्यासाठी आवश्यक पात्रता.
सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती होताना दिसून येत आहे.नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. डॉक्टर होण्यासाठी तरुणांचा कल दिसून येत आहे. तसेच कोरोंना सारख्या महाभयंकर विषाणू मुळे संपूर्ण जगात वैद्यकीय क्षेत्राला विशेष महत्व प्राप्त होत आहे.
![]() |
होमिओपॅथी डॉक्टर |
होमिओपॅथी म्हणजे काय तर होमिओपॅथी ही एक Allopathy पर्यायी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते.
होमिओपॅथी चे महत्व वाढताना दिसून येत आहे,कारण या होमिओपॅथी उपचार पद्धती मध्ये साईडेफेक्ट कमी प्रमाणात आहेत,त्यामुळे अनेक लोक आता होमिओपॅथी उपचार पद्धतीला प्राधान्य देऊ लागले आहेत.
त्यामुळे अनेक तरुण होमिओपॅथी डॉक्टर कसे व्हावे याविषयी माहिती घेताना दिसून येतात. या पोस्ट मधून आपण होमिओपॅथी डॉक्टर (Homeopathy Doctor) कसे व्हावे याविषयी संविस्तर माहिती घेणार आहोत.
होमिओपॅथी डॉक्टर म्हणजे काय तर ज्या प्रमाणे Allopathy Doctor असतात,तसेच आउर्वेदिक डॉक्टर असतात, ते ज्या प्रकार आपल्या पेशंट वर उपचार करतात त्याच प्रमाणे होमिओपॅथी डॉक्टर उपचार करत असतात.
फरक फक्त एवढाच असतो की होमिओपॅथी उपचार पद्धती ही जरा वेगळ्या प्रकारची असते. होमिओपॅथी मध्ये रुग्णावर शस्रक्रिया केली जात नाही.
होमिओपॅथी मध्ये उपचार करण्याची प्रोसेस लांब असते,परंतु या उपचार पद्धतीत जुनाट आजार कायमचे बरे होतात. होमिओपॅथी उपचार पद्धतीविषयी अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टर यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Homeopathy Doctor कसे व्हावे?
आजच्या काळात असे अनेक तरुण आहेत त्यांना डॉक्टर बनायचे आहे तर होमिओपॅथी डॉक्टर हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना होमिओपॅथी डॉक्टर बनायचे आहे त्यांना खालील प्रमाणे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
- होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी बी एच एम एस ची पदवी प्राप्त करावी लागते.
- 12 वी मध्ये जीवशास्र विषयाचा अभ्यास करावा लागतो.
- इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे लागते.
- होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी नीट चा अभ्यास कारवा लागतो.
- होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी विशेष डिप्लोमा कोर्स करून पुढे जाता येते.
- इलेक्ट्रो होमिओपॅथी मधील डिप्लोमा कोर्स.
- होमिओपॅथी कोर्समध्ये मास्टर ऑफ डॉक्टर.
- होमिओपॅथी मेडिसीन आणि सर्जरी डिप्लोमा करता येतो .
- होमिओपॅथी डॉक्टर (Homeopathy Doctor) होण्यासाठी 12 वी सायन्स सह चांगल्या गुणांसह उत्तीर्ण असावे लागते.
- जर तुम्हाला होमिओपॅथी माध्यमातून कोणताही स्पेशलायझेशन केआरएस करायचा असेल,तर तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता जसे मनसोपचार,त्वचा रोग तज्ञ ,बालरोगतज्ञ इ .
Homoeopathic Medical College list.
- बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठ फरीदकोट.
- National institute of homeopathy, Kolkata.
- नेहरू होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल,नवी दिल्ली .
- सरकारी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज ,बंगलोर.
- गुरु गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ,दिल्ली .
- कानपुर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज ,कानपुर .
- होमिओपॅथी डॉक्टर होण्यासाठी किती खर्च येतो ?
- जर तुम्हाला होमिओपॅथी डॉक्टर व्हायचे असेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी अथवा खाजगी मेडिकल कॉलेज मधून तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता.
जर तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरकीचा अभ्यास सरकारी महाविद्यालयातून पूर्ण केला तर वार्षिक 1 लाख रुपया च्या आत खर्च सध्या येऊ शकतो,कालांतराने यात बदल होऊ शकतो. तसेच खाजगी महाविद्यालयातून पूर्ण केला तर वार्षिक पाच लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.
Future opportunities upon completion of the Homeopathy Diploma Course.
जर तुम्ही Homeopathy Doctorate Degree घेतली असेल तर,सरकारी कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते.
- स्वत: च दवाखाना उघडू शकता.
- होमिओपॅथी सल्लागार म्हणून काम करू शकता.
- होमिओपॅथी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून जॉब करू शकता.
- सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ म्हणून काम करू शकता.
- खाजगी व्यावसायिक होण्याची संधी मिळते.
- होमिओपॅथी संशोधक होऊ शकता.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.