ब्रेल लिपी चा शोध: Louis Braille जीवन परिचय, अंधांची लिपी, ब्रेल पाटी, ब्रेल लिपीची मराठी माहिती.

लुई ब्रेल यांचा जीवनप्रवास व ब्रेल लिपी विषयी मराठी माहिती.

Louis Braille Information In Marathi.

 

लुई ब्रेल Louis Braille यांना ब्रेल लिपीचे जनक असे म्हणतात. 


कारण अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध (Braille research for the blind) लुई ब्रेल यांनी लावला. त्यामुळे Blind व्यक्तींना लिहाण्या वाचण्याची सोय झाली. 


लुई ब्रेल (Louis Braille Life introduction) यांचा जीवन परिचय:

लुई ब्रेल यांचा जन्म कुपव्रे या खेड्यात 4 जानेवारी 1809 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन रेने ब्रेल हे एक कातडी च्या वस्तु तयार करणारे कारागीर होते.लुई ब्रेल यांच्या आईचे नाव मोनिक ब्रेल होते.कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी सायमन यांना खूप कष्ट करावे लागत असे.


जेव्हा लुई फक्त तीन वर्षाचा होता,तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्याला आपल्यासोबत कामावर घेऊन गेले. त्याठिकाणी लुई चे वडील कातडी शिवण्याचे काम करत असत.घोड्याचे खोगीर बनवण्याचे काम करत असत. 


इ.स.1816 मध्ये त्यांच्या गावात एक शिक्षक आले त्यांचे नाव एयबे जॅक पाद्री पेलू असे होते.त्यांनी लुईला शिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वेगवेगळ्या वस्तूंची ओळख शिकवली.


लुई ब्रेल लहान असल्याने तो त्याच्या जवळ असणार्‍या वस्तूंशी खेळत होता. जसे त्याचे वडील कामासाठी लोखंडाचे तुकडे,घोड्याचे नाल,कठीण लाकूड,दोर्‍या,चाकू,सुई इत्यादी. लुई लहान असल्याने तो त्या वस्तूंशी खेळत असत.  


एकदा असेच खोगीर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी टोकदार आरी खेळताना लुईच्या डोळ्यात घुसली.डोळ्यातून रक्त येऊ लागले. त्याचावर जवळच्या डॉक्टर कडे उपचार केले परंतु डोळ्याला संसर्ग झाला,एका डोळ्याचा संसर्ग दुसर्‍या डोळ्याला झाला. लुई दृष्टिहीन झाले. 


लुई ब्रेल लहानपणी पासून हुशार होता. त्याला त्याच्या आई वडील यांच्याकडून नेहमी प्रोस्तहान मिळत असे. लुई स्पर्श आणि वासाच्या सहय्याने अनेक वस्तु सहज ओळखत असे. 


पुढे लुईला सामान्य शाळेत पाठवण्यात आले. केवळ श्रवण करून त्याने आपल्या अभ्यासात प्रगती गाठली. पुढे दोन वर्षांनंतर लुईला प्यारीस मध्ये शाळेत घालवण्याचे लुईच्या शिक्षक यांनी ठरवले. 


लुई अत्यंत शांत ,संयमी,हुशार,होता. त्याचे त्या शाळेत घनिष्ट नाते जोडले गेले. त्याने आपले आयुष्यभर शिक्षण देण्याचे करी केले.लुई यांचे अंध व्यक्तींसाठी खूप मोठे कार्य केलेले असून ,आजही लुई ब्रेल यांची अंधासाठी वापरण्यात येणारी ब्रेल लिपि संपूर्ण जगभर वापरण्यात येत आहे.


इ.स. 1821 साली अंधांना लिहाण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीचा शोध लावणारे पहिले शस्र्ज्ञ म्हणून लुई ब्रेल यांची जगभरात वेगळी ओळख आहे. 


लुई ब्रेल यांच्या ब्रेल लिपी (Braille Script Information) ची माहिती.

  • लुई ब्रेल यांनी अंधांना लिहण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपीचा शोध 1821 मध्ये लावला. त्यामुळे लुई ब्रेल यांच्या नावावरून या लिपीला ब्रेल लिपी असे नाव दिले गेले. 
  • लुई ब्रेल यांना ब्रेल लिपीचे जनक म्हणतात. 4 जानेवारीला संपूर्ण जगत जागतिक ब्रेल दिन साजरा केला जातो. कारण 4 जानेवारी हा दिवस लुई यांचा जन्मदिन आहे.
  • लुईचे शिक्षक पाद्रे यांनी लुईला प्यारीस येथे अंध मुलांच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. जगातील पहिली अंध मुलांची शाळा असलेली लुई सर्वात लहान विद्यार्थी होता.इतिहास,भूगोल,ग्रीक,संगीत,गणित,इ. विषय लुई सहजपणे शिकला. त्याच शाळेत शिक्षण घेऊन तेथेच शिक्षक म्हणून रुजू झाला. 
  • अंध व्यक्तींना वाचण्यासाठी आणि लिहण्यासाठी ब्रेल लिपी हे एकमेव साधन आहे. 15 व्या वर्षी अंध झालेल्या लुई यांनी हाताच्या स्पर्शाने जाणवणार्‍या चिन्हांची निर्मिती केली. 
  • हाताने जाणवणार्‍या चिन्हाची पुढे ब्रेल लिपी तयार केली. 1854 मध्ये ब्रेल लिपीचा प्रचार आणि प्रसार झाला. 
  • भारत सरकारने लुई ब्रेल यांच्या जन्म शताब्दी च्या दिवशी 2009 मध्ये लुई ब्रेल यांचे नाणे प्रसिद्ध केले. ब्रेल लिपीमध्ये एकूण 6 ठिबक्यांचा सेट असतो. खोलगट आणि पुगिर ठिबक्यांच्या सहय्याने हे चिन्ह बनवले जातात,त्याचा हाताला स्पर्श जाणवतो. 
  • हे ठिबके कधी कागदाच्या वरील बाजूला तर कधी खालील बाजून जाणवतात. बेल लिपी लिहण्यासाठी ब्रेल पाटी विकसित करण्यात आलेली आहे. 
  • आता अंध किंवा दृष्टिहीन मुले ब्रेल पाटीच्या सहाय्याने ब्रेल लिपी लिहायला आणि वाचायला शिकतात. ब्रेल लिपी लिहायला आणि वाचायला खूप सोपी असून त्यावर अंक लेखन सुद्धा केले जाते. ब्रेल लिपी च वापर खूप सोपा आहे. 
  • लुई ब्रेल  यांचे अंध आणि दृष्टिहीन लोकांसाठी हे खूप महत्वाचे कार्य असून,लुई ब्रेल हे जगप्रसिद्ध व्यक्ती होऊन गेले लुई ब्रेल यांचा मृत्यू इ.स. 6 जानेवारी 1852 मध्ये झाला. 
अशा प्रकारे आपण लुई ब्रेल Louis Braille यांच्या विषयी माहिती घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने