UDID Card : दिव्यांगांसाठी विना पास मिळणार प्रवास सवलत; एसटीमध्ये UDID Card चालणार..
U(caps)nique Disability ID Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग व्यक्तीच्या प्रवासामध्ये सवलत मिळावी म्हणून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दिव्यांग व्यक्ती व त्याच्या सोबत मदतनीस म्हणून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अनुक्रमे 75 % व 50 % सवलत देण्यात येते. यासाठी आता केंद्र सरकारद्वारे वैश्विक कार्ड (Unique Disability ID) कार्ड प्रवासादरम्यान वापरता येणार आहे.
दिव्यांग व्यक्ती व त्याच्या साथीदारास प्रवास सवलत
Table Of Contents:
Table Of Contents(toc)
RPWD Act 2016 कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता 21 दिव्यांग प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने देशातील सर्व दिव्यांग एकाच प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच Unique Disability ID देण्यास सुरुवात केली आहे. या एका दिव्यांग ओळखपत्राचा वापर करून दिव्यांग व्यक्ती सर्व योजनाचा लाभ घेऊ शकतो.
यासंदर्भात एसटी बस मध्ये दिव्यांग व्यक्तींना व त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीस गृह विभागाच्या दिनांक 9 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार 40 टक्के तसेच त्यापेक्षा जास्त दिव्यांग (अपंगत्व असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या तसे निमआराम बसेसमध्ये 75 टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून 65 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्याच्या साथीदारास 50 टक्के प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
तसेच दिव्यांग लाभार्थ्यांस व त्याच्या सोबत असणार्या साथीदार असेल त्यांना शिवशाही बसमध्ये अनुक्रमे 70% व 45% सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
एसटीमध्ये केंद्राचे दिव्यांग UDID Card चालणार...
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID Card) व अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. परंतु सदरचे देण्यात येणारे वैश्विक ओळखपत्र प्रवासादरम्यान सवलतीकरीता ग्राहय धरण्यात येत नसल्याचे तक्रारी प्राप्त होत होत्या.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिनांक 22 जून 2023 रोजी सर्व विभाग नियंत्रक यांना कळविले आहे की दिव्यांग लाभार्थ्याना प्रवास सवलतीसाठी केंद्र शासनाने देण्यात येणारे UDID कार्ड ग्राह्य धरण्याचे कळवले आहे.
सदर कार्ड वर आगार प्रमुखांचा सही शिक्का मारणे शक्य नसल्याने 65 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यास प्रवासात मदतनीस आवश्यक आहे, अशा लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांस विहित नमुन्यात कागदी पासचा दाखला देण्यात येतो.
परंतु असा देण्यात येणारा कागदी पास हाताळणे अवघड असल्याने तसेच सदरचा कागदी पास खराब होणे शक्यता असल्याने सदर दिव्यांग लाभाच्यांच्या साथीदारास पूर्वी रा.प. महामंडळाद्वारे देण्यात येणा-या कागदी पासाशिवाय दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्रावर नमूद अपंगत्वाच्या टक्केवारीच्या आधारे रा.प. महामंडळ यांनी प्रवासभाड्यात सवलत अनुज्ञेय करण्याबाबत कळविले आहे.
एसटीमध्ये दिव्यांगांसाठी UDID Card प्रवास सवलतबाबत देण्याबाबत परिपत्रक.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.