राज्यात कृषी अभ्यासक्रमांसाठीची (Agriculture Course Admission 2023) प्रवेश प्रक्रिया सुरु ; पहा महत्वाच्या तारखा . .
A(caps)griculture Course Admission 2023 : राज्यातील कृषी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमधील 9 पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे.
कृषी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया विषयी माहिती.
कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्यात एकूण 12 हजार 690 जागांवर प्रवेश देण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांना 9 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
राज्यातील कृषी विद्यापीठांमधील खालील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
कृषी पदवी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता :
1. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान 16 वर्षे असणे गरजेचे आहे.
2. पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता 12 वी विज्ञान) खुल्या गटातील उमेदवारास 50 % पेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास 40% पेक्षा कमी गुण नसावे. तसेच सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना किमान गुण शुन्य पेक्षा जास्त असणे गरजेचे आहेत.
काही महत्वाच्या तारखा
राज्यात कृषी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया PDF
Join : Whats App Channel