सावित्रीबाई फुले सुधारित बाल संगोपन योजनेतील अनुदानात होणार वाढ आता दरवर्षी मिळणार 27,000 रुपये..

सावित्रीबाई फुले सुधारित बाल संगोपन योजना अनुदानात वाढ आता दरवर्षी मिळणार 27,000 रुपये..

बा(caps)लसंगोपन योजना 2023 : शासनाने सुरू केलेल्या बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ, बेघर, अतितीव्र व मतिमंद तसेच बहुविकलांग निराधार बालकांना महिन्याला 1100 रुपये मिळत होते. परंतु 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळामध्ये अनुदानात वाढ करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ही वाढ झालेली रक्कम 1 एप्रिल 2023 पासून देण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले सुधारित बालसंगोपन योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहूया.





Table Of Contents:
Table Of Contents(toc)

सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही एक शासनाची योजना असून ही योजना महिला व बाल विकास विभागांच्या अंतर्गत चालवली जाते.


महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या आसपास अशा अनाथ, बेघर, अतितीव्र व मतिमंदत्व असणाऱ्या बालकांना या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकता.


बाल संगोपन योजनेचे फायदे

बाल संगोपन योजना ही 2005 पासून सुरू करण्यात आलेली योजना असून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. 2013 मध्ये यात काही बदल करण्यात आले आणि 2021 पासून दर महिन्याला 1100 रुपये मुलगा आणि पालकांच्या खात्यात जमा केले जात होते. परंतु आता 2023 पासून दर महिन्याला 2250 रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यानुसार एका वर्षांमध्ये 27 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.




बाल संगोपन योजनेअंतर्गत पैसे किती वर्षापर्यंत मिळतात?

बाल संगोपन योजनेमधून वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 2250 रुपये लाभार्थी किंवा पालकाच्या खात्यात जमा केले जातात वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाले की ही योजना बंद केली जाते.


बाल संगोपन योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो

तीव्र मतिमंद असलेले बालके 

बहु विकलांग मुले 

दोन्ही पालक अपंगत्व आहेत अशी काही मुले 

अनाथ मुले ज्यांच्या पालकांच्या पत्ता लागत नाही अशी बालके जे बालके दत्तक घेणे शक्य होत नाही अशी बालके 

एक पालक असलेले बालके 

मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याक, अविवाहित मातृत्व , गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालकांना यांचा लाभ मिळतो. कुष्ठरोग्ण व 

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके 

एचआयव्हीग्रस्त बालके 

पालकांमधील तीव्र वैवाहिक वाद,अति हेटाळणी व दुर्लक्षित, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके 

शाळेत न जाणारे बालकामगार असलेली मुले यांना या योजनेचा लाभ मिळतो. अधिक माहितीसाठी खालील बालसंगोपन योजनेचा शासन निर्णय वाचू शकता .



बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

बाल संगोपन योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येतो बालसंगोपन योजना ऑनलाइन फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल शासनाचे अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे.




बाल संगोपन योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा 

खालील लिंक वर अर्ज आहे, तो डाऊनलोड करून आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून जिल्हा महिला बाल विकास या कार्यालयात जमा करने आवश्यक असते.


बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

बाल संगोपन योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात. 

आई-वडील व पाल्यांच्या आधार कार्ड
 कुटुंबाचा एकत्रित फोटो 
रहिवासी प्रमाणपत्र 
आई वडील मृत असल्याचे मृत्यूचे प्रमाणपत्र 
मुलांचे बोनाफाईड प्रमाणपत्र 
आई वडील यांचे बँक पासबुकचे झेरॉक्स 
उत्पन्नाचा दाखला 
दिव्यांग प्रमाणपत्र 
तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे.

बालसंगोपन फॉर्म कुठे जमा करतात?

वरील रीतसर जोडलेले कागदपत्र आणि फॉर्म भरून आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांमध्ये जमा करणे आवश्यक असते.


त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण समिती तपासणीसाठी मुलासह उपस्थित राहण्याविषयी तारीख निश्चित करून पडताळणी करते आणि त्यानंतर दरमहा 2250 रुपये आपण दिलेल्या बँक खात्यावर पैसे जमा करते.


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने