Maharashtra State Mega Bharti 2023।राज्यात होणार 75000 पदांची मेगाभरती! मेगा भरतीचा कृती आराखडा तयार

राज्य सरकार करणार 75 हजार जागांची मेगा भरती!

Maharashtra State Mega Bharti 2023
75000 पदांची मेगाभरती

Maharashtra State Mega Bharti 2023: राज्य शासनाच्या 43 विभाग अंतर्गत तब्बल पावणेतीन लाख  पदे रिक्त आहेत. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाचे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्वी म्हणजेच एक जून ते 15 ऑगस्ट या अडीच महिन्यात 75 हजार पदाचे मेगा भरती केली जाणार असून भरतीच्या प्रतीक्षेत हजारो तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत असल्याने या पार्श्वभूमीवर आता मेगा भरतीचा कृती आराखडा शासनाने तयार केला असल्याची माहिती सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळची बोलताना दिली.

20 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षा बाहेरील गट ब, क आणि गट ड पद भरतीसाठी  टीसीएस ,आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात करण्याचा निर्णय झाला.

सध्या महसूल ,कृषी ,शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य व गृह जलसंपदा ,पाटबंधारे, महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय ,पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त पदे वाढले आहेत.

दरम्यान कोरोना नंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरती सध्या कोणती अडचण राहिली नाही, दुसरीकडे आगामी स्वराज्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सह लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राजकीय सद्यस्थिती राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगा भरती करावी लागणार आहे, असे स्पष्ट चित्र दिसून येते, त्या दृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आलेल्या असल्याचे समजले आहे.

राज्यात होणार 32000 शिक्षकांची भरती:

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सह खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची 67 हजार पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची 30 ते 32 हजार पदे ऑगस्ट 2023 पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित पन्नास टक्के पद भरती होईल. असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकार मार्फत गेल्या दोन-तीन वर्षापासून केवळ भरतीची घोषणा केली जात असून आता सर्व उमेदवाराचे लक्ष हे भरती प्रक्रियेकडे लागलेले आहे.


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया सुरु


आमचा What's Group Join  करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने